ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
10 : 48

اِنَّ الَّذِیْنَ یُبَایِعُوْنَكَ اِنَّمَا یُبَایِعُوْنَ اللّٰهَ ؕ— یَدُ اللّٰهِ فَوْقَ اَیْدِیْهِمْ ۚ— فَمَنْ نَّكَثَ فَاِنَّمَا یَنْكُثُ عَلٰی نَفْسِهٖ ۚ— وَمَنْ اَوْفٰی بِمَا عٰهَدَ عَلَیْهُ اللّٰهَ فَسَیُؤْتِیْهِ اَجْرًا عَظِیْمًا ۟۠

१०. निःसंशय, जे लोक तुमच्याशी बैअत (अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे आज्ञापालन व अनुसरण करण्याचा वायदा ताकीदपूर्वक जाहीर करणे) करतात, ते निःसंशय, अल्लाहशीच बैअत करतात. त्यांच्या हातावर अल्लाहचा हात आहे, तेव्हा जो मनुष्य वचन भंग करील तर तो स्वतःवरच वचन भंग करतो, आणि जो मनुष्य तो वायदा पूर्ण करील, जो त्याने अल्लाहशी केला आहे, तर त्याला लवकरच अल्लाह फार महान मोबदला प्रदान करील. info
التفاسير:

external-link copy
11 : 48

سَیَقُوْلُ لَكَ الْمُخَلَّفُوْنَ مِنَ الْاَعْرَابِ شَغَلَتْنَاۤ اَمْوَالُنَا وَاَهْلُوْنَا فَاسْتَغْفِرْ لَنَا ۚ— یَقُوْلُوْنَ بِاَلْسِنَتِهِمْ مَّا لَیْسَ فِیْ قُلُوْبِهِمْ ؕ— قُلْ فَمَنْ یَّمْلِكُ لَكُمْ مِّنَ اللّٰهِ شَیْـًٔا اِنْ اَرَادَ بِكُمْ ضَرًّا اَوْ اَرَادَ بِكُمْ نَفْعًا ؕ— بَلْ كَانَ اللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ خَبِیْرًا ۟

११. ग्रामीणांपैकी जे मागे सोडून दिले गेले होते, ते आता तुम्हाला निश्चित म्हणतील की आम्ही आपल्या धन-संपत्ती व संततीतच व्यस्त राहिलो, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी माफीची दुआ-प्रार्थना करा. हे लोक आपल्या तोंडांनी ते बोलतात, जे त्यांच्या मनात नाही. तुम्ही उत्तर द्या की तुमच्यासाठी अल्लाहतर्फे एखाद्या गोष्टीचाही अधिकार कोण बाळगतो, जर तो तुम्हाला नुकसान पोहचवू इच्छिल किंवा तुम्हाला काही लाभ पोहचवू इच्छिल? किंबहुना तुम्ही जे काही करीत आहात, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
12 : 48

بَلْ ظَنَنْتُمْ اَنْ لَّنْ یَّنْقَلِبَ الرَّسُوْلُ وَالْمُؤْمِنُوْنَ اِلٰۤی اَهْلِیْهِمْ اَبَدًا وَّزُیِّنَ ذٰلِكَ فِیْ قُلُوْبِكُمْ وَظَنَنْتُمْ ظَنَّ السَّوْءِ ۖۚ— وَكُنْتُمْ قَوْمًا بُوْرًا ۟

१२. (नव्हे) किंबहुना तुम्ही तर असे गृहीत धरले होते की पैगंबर आणि मुसलमानांचे आपल्या घरांकडे परतणे अगदी अशक्य आहे आणि हाच विचार तुमच्या मनांमध्ये रुजला, तुम्ही दुराग्रह बाळगला होता (वास्तविक) तुम्ही लोक आहातच नष्ट होणारे. info
التفاسير:

external-link copy
13 : 48

وَمَنْ لَّمْ یُؤْمِنْ بِاللّٰهِ وَرَسُوْلِهٖ فَاِنَّاۤ اَعْتَدْنَا لِلْكٰفِرِیْنَ سَعِیْرًا ۟

१३. आणि जो मनुष्य अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर ईमान राखणारे नाही तर आम्ही देखील अशा काफिरांकरिता धगधगणारी आग तयार करून ठेवली आहे. info
التفاسير:

external-link copy
14 : 48

وَلِلّٰهِ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— یَغْفِرُ لِمَنْ یَّشَآءُ وَیُعَذِّبُ مَنْ یَّشَآءُ ؕ— وَكَانَ اللّٰهُ غَفُوْرًا رَّحِیْمًا ۟

१४. आणि आकाशांची व धरतीची राज्य-सत्ता अल्लाहकरिताच आहे तो ज्याला इच्छिल माफ करील आणि ज्याला इच्छिल अज़ाब (शिक्षा) देईल आणि अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
15 : 48

سَیَقُوْلُ الْمُخَلَّفُوْنَ اِذَا انْطَلَقْتُمْ اِلٰی مَغَانِمَ لِتَاْخُذُوْهَا ذَرُوْنَا نَتَّبِعْكُمْ ۚ— یُرِیْدُوْنَ اَنْ یُّبَدِّلُوْا كَلٰمَ اللّٰهِ ؕ— قُلْ لَّنْ تَتَّبِعُوْنَا كَذٰلِكُمْ قَالَ اللّٰهُ مِنْ قَبْلُ ۚ— فَسَیَقُوْلُوْنَ بَلْ تَحْسُدُوْنَنَا ؕ— بَلْ كَانُوْا لَا یَفْقَهُوْنَ اِلَّا قَلِیْلًا ۟

१५. जेव्हा तुम्ही (युद्धात हाती लागलेला) परिहार घेण्यास जाऊ लागला, तेव्हा त्वरित हे मागे सोडलेले लोक म्हणतील की आम्हालाही आपल्या सोबत येण्याची आज्ञा द्या. ते असे इच्छितात की अल्लाहचे कथन बदलून टाकावे (तुम्ही त्यांना) सांगा की, अल्लाहने या आधीच सांगून टाकले आहे की तुम्ही कधीही आमचे अनुसरण न कराल तेव्हा ते यावर उत्तर देतील की (नाही, नाही) किंबहुना तुम्हीच आमचा मत्सर करता. (खरी गोष्ट अशी की) हे लोक फार कमी समजतात. info
التفاسير: