ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
45 : 39

وَاِذَا ذُكِرَ اللّٰهُ وَحْدَهُ اشْمَاَزَّتْ قُلُوْبُ الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ ۚ— وَاِذَا ذُكِرَ الَّذِیْنَ مِنْ دُوْنِهٖۤ اِذَا هُمْ یَسْتَبْشِرُوْنَ ۟

४५. आणि जेव्हा एकमेव अल्लाहचे वर्णन केले जाते तेव्हा त्या लोकांची हृदये तिरस्कार करू लागतात, जे आखिरतवर ईमान राखत नाहीत, आणि जेव्हा त्याच्याखेरीज (इतरां) चे वर्णन केले जाते, तेव्हा त्यांची हृदये स्पष्टतः आनंदित होतात.१ info

(१) होय. जेव्हा असे म्हटले जाते की अमुक अमुक देखील उपास्य आहे, किंवा ते देखील अल्लाहचे नेक सदाचारी दास आहेत. ते सुद्धा काही हक्क राखतात, तेही संकट दूर करणारे आहेत, गरजपूर्ती करणारे आहेत, तेव्हा हे अनेकेश्वरवादी खूश होतात. मार्गभ्रष्ट लोकांची आज हीच अवस्था आहे, जेव्हा त्यांना सांगितले जाते की, केवळ ‘हे अल्लाह, मदद’ असे म्हणा, कारण अल्लाहखेरीज दुसरा कोणी मदत करणारा नाही. तेव्हा क्रोधित होतात. हे बोलणे त्यांना मोठे वाईट वाटते, परंतु जेव्हा ‘या अली मदद’, ‘या रसूल मदद’ म्हटले जाते, त्याचप्रमाणे इतर मरण पावलेल्यांकडून मदत मागितली जाते, त्यांच्या नावाने आर्जव केले जाते, उदा. ‘या शेख अब्दुल कादिर शेअन लिल्लाह’ वगैरे तर मग त्यांची मने आनंदविभोर होतात.

التفاسير: