(१) पैगंबराचे स्वप्न, अल्लाहच्या वहयी आणि आदेशाने असते, या अनुषंगाने ते अमलात आणणे आवश्यक ठरते. पुत्राशी विचारणा करून, सल्ला घेण्याचा आदेश हे जाणून घ्यायचे होते की पुत्र देखील अल्लाहच्या आदेशाचे पालन करण्याकरिता कितपत तयार आहे.
(२) हा मोठा बळी एक मेंढा होता, ज्याला अल्लाहने जन्नतमधून हजरत जिब्रील यांच्याद्वारे पाठविले (इब्ने कसीर), त्याला इस्माईलच्या जागी बळी दिले गेले आणि मग इब्राहीमी सुन्नत (स्मरणिका) ला कयामतपावेतो अल्लाहचे सान्निध्य आणि ईदे अज्हा (बकरा ईद) चे सर्वोत्तम आचरण बनविले गेले.
(१) अंतिम आकाशिय ग्रंथ कुरआनने पैगंबरांची चर्चा करून त्यांच्या संदर्भात अधिकांश ठिकाणी हे शब्द वापरले आहेत की ते आमच्या ईमानधारक दासांपैकी होते. याचे दोन अर्थ आहेत, त्यांचे चारित्र्य आणि आचरणाची श्रेष्ठता दर्शविणे, जो ईमानचा आवश्यक भाग आहे, यासाठी की लोकांचे खंडन व्हावे, जे बहुतेक पैगंबरांविषयी नैतिक गोष सिद्ध करतात. उदा. तौरात आणि इंजीलच्या आजच्या प्रतींमध्ये अनेक पैगंबरांविषयी अशा मनोरचित कहाण्या सामील आहेत. दुसरा हेतु त्या लोकांचे खंडन, जे काही पैगंबरांसबंधी अतिशयोक्ती करून त्यांच्या अंगी ईश्वरी गुण व सत्ताधिकार असल्याचे सिद्ध करतात. अर्थात ते पैगंबर जरूर होते, परंतु शेवटी अल्लाहचे दासच होते. स्वतः अल्लाह किंवा त्याचा अंश अथवा सहभागी मुळीच नव्हते.