ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
27 : 36

بِمَا غَفَرَ لِیْ رَبِّیْ وَجَعَلَنِیْ مِنَ الْمُكْرَمِیْنَ ۟

२७. की मला माझ्या पालनकर्त्याने माफ केले आणि मला प्रतिष्ठित लोकांमध्ये सामील केले.१ info

(१) अर्थात ज्या ईमान आणि तौहीद (एकेश्वरवादा) मुळे मला माझ्या रबने (पालनकर्त्याने) माफ केले, हीच गोष्ट माझ्या जनसमूहानेही जाणून घेतली असती तर! यासाठी की त्यांनीही ईमान व तौहीद (एकेश्वरवादा) चा अंगीकार करून अल्लाहच्या क्षमा आणि त्याच्या कृपा - देणग्यांना पात्र व्हावे. अशा प्रकारे तो मेल्यानंतरही आपल्या जनसमूहाच्या लोकांचा हितचिंतक राहिला. एक सच्चा ईमानधारकाला असेच असायला हवे की त्याने प्रत्येक क्षणी लोकांचे शुभचिंतक असावे, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, मार्गभ्रष्ट करू नये. लोक त्याला वाटे ते म्हणोत आणि त्याच्याशी कसेही वर्तन करोत, येथपावेतो की त्याला जिवे ठार मारोत.

التفاسير: