ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
23 : 33

مِنَ الْمُؤْمِنِیْنَ رِجَالٌ صَدَقُوْا مَا عَاهَدُوا اللّٰهَ عَلَیْهِ ۚ— فَمِنْهُمْ مَّنْ قَضٰی نَحْبَهٗ وَمِنْهُمْ مَّنْ یَّنْتَظِرُ ۖؗ— وَمَا بَدَّلُوْا تَبْدِیْلًا ۟ۙ

२३. ईमान राखणाऱ्यांमध्ये (असे) लोकही आहेत, ज्यांनी अल्लाहशी जो वायदा केला होता तो खरा करून दाखविला.१ काहींनी तर आपला वायदा पूर्ण केला आणि काही (संधीची) प्रतीक्षा करीत आहेत. आणि त्यांनी कसलाही बदल केला नाही. info

(२) ही आयत त्या सहाबांविषयी अवतरली आहे, ज्यांनी याप्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देण्याचे आश्चर्यजनक कारनामे दाखविले होते आणि त्यांच्यात ते सहबादेखील होते जे बद्रच्या लढाईत सामील होऊ शकले नव्हते, परंतु त्यांनी ही प्रतिज्ञा केली होती पुन्हा जर एखादी संधी लाभली तर जिहाद (धर्मयुद्धा) मध्ये भरपूर भाग घेतील. उदा. नज़र बिन अनस वगैरे जे शेवटी लढता लढता ओहदच्या युद्धात शहीद झाले. त्यांच्या शरीरावर तलवार, भाले आणि बाणांचे ऐंशीच्या वर घाव होते. शहादतनंतर त्यांच्या बहिणीने त्यांना, त्यांच्या बोटावरून ओळखले. (मुसनद अहमद, हिस्सा ४, पृ. १९३)

التفاسير: