ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
29 : 31

اَلَمْ تَرَ اَنَّ اللّٰهَ یُوْلِجُ الَّیْلَ فِی النَّهَارِ وَیُوْلِجُ النَّهَارَ فِی الَّیْلِ وَسَخَّرَ الشَّمْسَ وَالْقَمَرَ ؗ— كُلٌّ یَّجْرِیْۤ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی وَّاَنَّ اللّٰهَ بِمَا تَعْمَلُوْنَ خَبِیْرٌ ۟

२९. किंवा तुम्ही नाही पाहत की अल्लाह रात्रीला, दिवसात आणि दिवसाला रात्रीत दाखल करतो. सूर्य आणि चंद्राला त्यानेच आज्ञाधारक बनवून ठेवले आहे की प्रत्येक निर्धारित वेळेपर्यंत चालत राहावा तुम्ही जे काही कर्म करता, अल्लाह ते प्रत्येक कर्म जाणतो. info
التفاسير:

external-link copy
30 : 31

ذٰلِكَ بِاَنَّ اللّٰهَ هُوَ الْحَقُّ وَاَنَّ مَا یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِهِ الْبَاطِلُ ۙ— وَاَنَّ اللّٰهَ هُوَ الْعَلِیُّ الْكَبِیْرُ ۟۠

३०. हे सर्व (व्यवस्था) या कारणास्तव आहे की अल्लाह सत्य आहे, आणि त्याच्याखेरीज ज्यांना लोक (उपास्य समजून) पुकारतात, सर्व खोटे (मिथ्या) आहेत, आणि निःसंशय अल्लाह अतिउच्च आणि मोठा महान आहे. info
التفاسير:

external-link copy
31 : 31

اَلَمْ تَرَ اَنَّ الْفُلْكَ تَجْرِیْ فِی الْبَحْرِ بِنِعْمَتِ اللّٰهِ لِیُرِیَكُمْ مِّنْ اٰیٰتِهٖ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّكُلِّ صَبَّارٍ شَكُوْرٍ ۟

३१. काय तुम्ही या गोष्टीवर विचार नाही करीत की पाण्यात नौका अल्लाहच्या कृपा-देणगीने चालत आहेत, यासाठी की त्याने तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवाव्यात. निश्चितच यात प्रत्येक सबुरी राखणाऱ्या आणि कृतज्ञशील असणाऱ्याकरिता अनेक निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
32 : 31

وَاِذَا غَشِیَهُمْ مَّوْجٌ كَالظُّلَلِ دَعَوُا اللّٰهَ مُخْلِصِیْنَ لَهُ الدِّیْنَ ۚ۬— فَلَمَّا نَجّٰىهُمْ اِلَی الْبَرِّ فَمِنْهُمْ مُّقْتَصِدٌ ؕ— وَمَا یَجْحَدُ بِاٰیٰتِنَاۤ اِلَّا كُلُّ خَتَّارٍ كَفُوْرٍ ۟

३२. आणि जेव्हा त्यांच्यावर लाटा, त्या सावल्यांप्रमाणे आच्छादित होतात तेव्हा ते (मोठा) विश्वास बाळगून अल्लाहलाच पुकारतात, आणि जेव्हा अल्लाह त्यांना त्यातून सोडवून खुष्कीकडे पोहचवितो, तेव्हा त्यांच्यापैकी काही संतुलित राहतात, आणि आमच्या आयतींचा इन्कार केवळ तेच लोक करतात, जे वचन भंग करणारे आणि कृतघ्न असतील. info
التفاسير:

external-link copy
33 : 31

یٰۤاَیُّهَا النَّاسُ اتَّقُوْا رَبَّكُمْ وَاخْشَوْا یَوْمًا لَّا یَجْزِیْ وَالِدٌ عَنْ وَّلَدِهٖ ؗ— وَلَا مَوْلُوْدٌ هُوَ جَازٍ عَنْ وَّالِدِهٖ شَیْـًٔا ؕ— اِنَّ وَعْدَ اللّٰهِ حَقٌّ فَلَا تَغُرَّنَّكُمُ الْحَیٰوةُ الدُّنْیَا ۥ— وَلَا یَغُرَّنَّكُمْ بِاللّٰهِ الْغَرُوْرُ ۟

३३. लोकांनो! आपल्या पालनकर्त्याचे भय राखा आणि त्या दिवसाचे भय ठेवा, ज्या दिवशी पिता आपल्या पुत्राला कसलाही लाभ पोहचवू शकणार नाही आणि ना पुत्र आपल्या पित्यास किंचितही लाभ पोहचविणारा असेल. लक्षात ठेवा! अल्लाहचा वायदा सच्चा आहे. पाहा! तुम्हाला ऐहिक जीवनाने धोक्यात टाकू नये आणि ना धोकेबाज (सैताना) ने तुम्हाला धोक्यात टाकावे. info
التفاسير:

external-link copy
34 : 31

اِنَّ اللّٰهَ عِنْدَهٗ عِلْمُ السَّاعَةِ ۚ— وَیُنَزِّلُ الْغَیْثَ ۚ— وَیَعْلَمُ مَا فِی الْاَرْحَامِ ؕ— وَمَا تَدْرِیْ نَفْسٌ مَّاذَا تَكْسِبُ غَدًا ؕ— وَمَا تَدْرِیْ نَفْسٌ بِاَیِّ اَرْضٍ تَمُوْتُ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلِیْمٌ خَبِیْرٌ ۟۠

३४. निःसंशय, अल्लाहच्याच जवळ कयामतचे ज्ञान आहे. तोच पर्जन्यवृष्टी करतो, आणि मातेच्या गर्भात जे काही आहे ते जाणतो. कोणीही जाणत नाही की उद्या काय कमवील? ना कोणाला हे माहीत आहे की तो कोणत्या भूमीवर मरण पावेल.१ लक्षात ठेवा, अल्लाहच संपूर्ण ज्ञान बाळगणारा आणि सत्य जाणणारा आहे. info

(१) हदीसमधील उल्लेखानुसार पाच गोष्टी अपरोक्षा (गैब) च्या चाव्या आहेत. ज्यांना अल्लाहखेरीज कोणी जाणत नाही (सहीह बुखारी, तफसीर सूरह लुकमान आणि किताबुल इस्तिस्का) १) कयामत जवळ असल्याची निशाणी तर पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितली आहे. परंतु कयामत येण्याचे निश्चित ज्ञान, अल्लाहशिवाय कोणालाही नाही, ना फरिश्त्याला, ना एखाद्या पैगंबराला. २) पावसाची बाबही अशीच आहे. निशाणी व संकेताद्वारे अनुमान तर लावले जाऊ शकते, परंतु ही गोष्ट प्रत्येकाच्या अनुभवात व अवलोकनात आहे की हे अनमान कधी खरे ठरते तर कधी चुकीचे. येथपावेतो की हवामान खात्याची घोषणाही खरी ठरत नाही. तात्पर्य पावसाचेही निश्चित ज्ञान अल्लाहखेरीज कोणालाही नाही. ३) मातेच्या गर्भात, यंत्राद्वारे लिंग परीक्षणाचे अर्धवट अनुमान बहुधा शक्य आहे, परंतु गर्भातले बाळ भाग्यशाली आहे की कमनशिबी आहे, पूर्ण आहे की अपूर्ण सुंदर आहे की कुरुप, काळे आहे की गोरे इ. गोष्टींचेही ज्ञान फक्त अल्लाहला आहे. ४) मनुष्य उद्या काय करील? ते धार्मिक कार्य असेल की ऐहिक? कोणालाही उद्याविषयीचे ज्ञान नाही की उद्याचा दिवस त्याच्या आयुष्यात उजाडेल किंवा नाही? आणि आलाच तर तो उद्या काय काम करील? ५) मृत्यु कोठे होईल घरात की घराबाहेर, आपल्या देशात की परदेशात, तारुम्यात मृत्यु येईल की म्हातारपणी, आपली मनोकांक्षा पूर्ण झाल्यानंतर की त्यापूर्वीच? कोणाला कसलेही ज्ञान नाही.

التفاسير: