ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
11 : 24

اِنَّ الَّذِیْنَ جَآءُوْ بِالْاِفْكِ عُصْبَةٌ مِّنْكُمْ ؕ— لَا تَحْسَبُوْهُ شَرًّا لَّكُمْ ؕ— بَلْ هُوَ خَیْرٌ لَّكُمْ ؕ— لِكُلِّ امْرِئٍ مِّنْهُمْ مَّا اكْتَسَبَ مِنَ الْاِثْمِ ۚ— وَالَّذِیْ تَوَلّٰی كِبْرَهٗ مِنْهُمْ لَهٗ عَذَابٌ عَظِیْمٌ ۟

११. जे लोक हा फार मोठा आक्षेप रचून आले आहेत. हा देखील तुमच्यातला एक समूह आहे. तुम्ही त्याला आपल्याकरिता वाईट समजू नका किंबहुना हा तुमच्यासाठी चांगला आहे. मात्र त्यांच्यापैकी प्रत्येकावर तेवढा अपराध आहे, जेवढा त्याने कमविला आहे आणि त्यांच्यापैकी ज्याने त्यात मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे, त्याची शिक्षाही फार मोठी आहे. info
التفاسير:

external-link copy
12 : 24

لَوْلَاۤ اِذْ سَمِعْتُمُوْهُ ظَنَّ الْمُؤْمِنُوْنَ وَالْمُؤْمِنٰتُ بِاَنْفُسِهِمْ خَیْرًا ۙ— وَّقَالُوْا هٰذَاۤ اِفْكٌ مُّبِیْنٌ ۟

१२. ते ऐकताच ईमान राखणाऱ्या पुरुषांनी आणि स्त्रियांनी एकमेकांबद्दल सद्‌भावना का नाही केली आणि असे का नाही म्हटले की हा तर उघड आरोप आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 24

لَوْلَا جَآءُوْ عَلَیْهِ بِاَرْبَعَةِ شُهَدَآءَ ۚ— فَاِذْ لَمْ یَاْتُوْا بِالشُّهَدَآءِ فَاُولٰٓىِٕكَ عِنْدَ اللّٰهِ هُمُ الْكٰذِبُوْنَ ۟

१३. त्यांनी यावर चार साक्षी का नाही आणले? आणि ज्याअर्थी त्यांनी साक्षी आणले नाहीत तर हा आरोप ठेवणारे लोक निश्चितच अल्लाहजवळ केवळ खोटारडे आहेत. info
التفاسير:

external-link copy
14 : 24

وَلَوْلَا فَضْلُ اللّٰهِ عَلَیْكُمْ وَرَحْمَتُهٗ فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ لَمَسَّكُمْ فِیْ مَاۤ اَفَضْتُمْ فِیْهِ عَذَابٌ عَظِیْمٌ ۟ۚ

१४. आणि जर तुमच्यावर अल्लाहची कृपा आणि दया, या जगात आणि आखिरतमध्ये नसती तर निःसंशय, ज्या गोष्टीची चर्चा तुम्ही सुरू केली होती, तिच्यापायी तुम्हाला फार मोठी शिक्षा पोहचली असती. info
التفاسير:

external-link copy
15 : 24

اِذْ تَلَقَّوْنَهٗ بِاَلْسِنَتِكُمْ وَتَقُوْلُوْنَ بِاَفْوَاهِكُمْ مَّا لَیْسَ لَكُمْ بِهٖ عِلْمٌ وَّتَحْسَبُوْنَهٗ هَیِّنًا ۖۗ— وَّهُوَ عِنْدَ اللّٰهِ عَظِیْمٌ ۟

१५. जेव्हा तुम्ही आपल्या मुखाने याची चर्चा सतत करू लागले आणि आपल्या तोंडाने ती गोष्टही बोलू लागले, जिच्याविषयी तुम्हाला काहीच ज्ञान नव्हते. तुम्ही तिला साधारण गोष्ट समजत राहिले असले तरी अल्लाहच्या दृष्टीने ती मोठी भयंकर बाब होती. info
التفاسير:

external-link copy
16 : 24

وَلَوْلَاۤ اِذْ سَمِعْتُمُوْهُ قُلْتُمْ مَّا یَكُوْنُ لَنَاۤ اَنْ نَّتَكَلَّمَ بِهٰذَا ۖۗ— سُبْحٰنَكَ هٰذَا بُهْتَانٌ عَظِیْمٌ ۟

१६. आणि तुम्ही ती गोष्ट ऐकताच असे का नाही म्हटले की आम्ही अशी गोष्ट तोंडाने काढणेही चांगले नाही. हे अल्लाह तू पवित्र आहेस हा तर फार मोठा मिथ्यारोप आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 24

یَعِظُكُمُ اللّٰهُ اَنْ تَعُوْدُوْا لِمِثْلِهٖۤ اَبَدًا اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟ۚ

१७. अल्लाह तुम्हाला उपदेश करतो की पुन्हा कधी असे काम करू नका, जर तुम्ही सच्चे ईमानधारक असाल. info
التفاسير:

external-link copy
18 : 24

وَیُبَیِّنُ اللّٰهُ لَكُمُ الْاٰیٰتِ ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟

१८. आणि अल्लाह तुमच्यासमोर आपल्या आयती निवेदन करीत आहे, आणि अल्लाह जाणणारा, बुद्धीकौशल्य बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
19 : 24

اِنَّ الَّذِیْنَ یُحِبُّوْنَ اَنْ تَشِیْعَ الْفَاحِشَةُ فِی الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۙ— فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ ؕ— وَاللّٰهُ یَعْلَمُ وَاَنْتُمْ لَا تَعْلَمُوْنَ ۟

१९. जे लोक, ईमान राखणाऱ्यांमध्ये निर्लज्जता पसरविण्याची इच्छा बाळगतात, त्यांच्यासाठी या जगात आणि आखिरतमध्ये दुःखदायक अज़ाब (शिक्षा- यातना) आहे,१ आणि अल्लाह सर्व काही जाणतो, आणि तुम्ही काहीच जाणत नाही. info

(१) ‘फाहिशत’चा अर्थ आहे निर्लज्जता आणि पवित्र कुरआनने व्यभिचार कृत्याला निर्लज्जता म्हटले आहे. (बनी इस्राईल) आणि इथे व्यभिचाराच्या एका खोट्या बातमीच्या प्रचारालाही अल्लाहने निर्लज्जता म्हटले आहे आणि यास इहलोक आणि परलोकाच्या दुःखदायक शिक्षेचे कारण सांगितले आहे. ज्याद्वारे असभ्यता (निर्लज्जता) विषयी इस्लामचा स्वभाव आणि अल्लाहच्या मर्जीचे अनुमान होते की केवळ असभ्य गोष्टीची खोटी बातमी पसरविणे अल्लाहच्या दृष्टीने किती मोठा अपराध आहे. तेव्हा जे लोक रात्रंदिवस एका इस्लामी समाजात वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाद्वारे असभ्यतेचा, निर्लज्जतेचा सर्रास प्रचार करीत आहेत आणि घरोघरी ते पोहोचवित आहेत, तर अल्लाहच्या येथे हे लोक केवढे मोठे अपराधी ठरतील?

التفاسير:

external-link copy
20 : 24

وَلَوْلَا فَضْلُ اللّٰهِ عَلَیْكُمْ وَرَحْمَتُهٗ وَاَنَّ اللّٰهَ رَءُوْفٌ رَّحِیْمٌ ۟۠

२०. आणि जर तुमच्यावर अल्लाहची दया- कृपा राहिली नसती आणि हेही की अल्लाह अतिशय स्नेहशील दया करणारा आहे (अन्यथा तुमच्यावर प्रकोप आला असता). info
التفاسير: