ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
100 : 23

لَعَلِّیْۤ اَعْمَلُ صَالِحًا فِیْمَا تَرَكْتُ كَلَّا ؕ— اِنَّهَا كَلِمَةٌ هُوَ قَآىِٕلُهَا ؕ— وَمِنْ وَّرَآىِٕهِمْ بَرْزَخٌ اِلٰی یَوْمِ یُبْعَثُوْنَ ۟

१००. अशासाठी की आपल्या सोडून आलेल्या जगात जाऊन सत्कर्म करावे, असे कदापि होणार नाही. हे केवळ एक कथन आहे, जे सांगणारा हा आहे त्यांच्या पाठीमागे एक पट आहे. त्यांचे दुसऱ्यांदा जिवंत होण्याच्या दिवसापर्यंत.१ info

(१) दोन वस्तूंच्या दरम्यान पडदा किंवा आडोशाला ‘बर्जख’ म्हटले जाते. या जगाचे जीवन आणि आखिरतचे जीवन यांच्या दरम्यानची जी मुदत आहे, तिला इथे ‘बर्जख’ म्हटले गेले आहे, कारण मेल्यानंतर माणसाचे या जगाशी असलेले नाते संपुष्टात येते, आणि आखिरच्या जीवनाचा आरंभ त्या वेळी होईल, जेव्हा सर्व लोकांना दुसऱ्यांदा जिवंत केले जाईल. तेव्हा दरम्यानचे हे जीवन, जे कबरीत किंवा पशू-पक्ष्यांच्या पोटात किंवा जाळून टाकण्याच्या स्थितीत मातीच्या कणात व्यतीत होते, ते ‘बर्जख’चे जीवन होय. माणसाचे हे अस्तित्व ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या स्वरूपात असेल, स्पष्टतः तो माती बनला असेल, किंवा राख बनवून हवेत उडविला गेला असेल, किंवा नदीच्या पात्रात वाहविला गेला असेल, किंवा एखाद्या जनावराचे भक्ष्य ठरला असेल, परंतु सर्वश्रेष्ठ अल्लाह सर्वांना एक नवे रूप प्रदान करून ‘हश्र’ (हिशोबा) च्या मैदानात एकत्र करील.

التفاسير: