ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
75 : 23

وَلَوْ رَحِمْنٰهُمْ وَكَشَفْنَا مَا بِهِمْ مِّنْ ضُرٍّ لَّلَجُّوْا فِیْ طُغْیَانِهِمْ یَعْمَهُوْنَ ۟

७५. आणि जर आम्ही त्यांच्यावर दया- कृपा केली आणि त्यांची कष्ट- यातना दूर केली तर ते आपल्या विद्रोहात अधिक मजबूत होऊन भटकत राहतील. info
التفاسير:

external-link copy
76 : 23

وَلَقَدْ اَخَذْنٰهُمْ بِالْعَذَابِ فَمَا اسْتَكَانُوْا لِرَبِّهِمْ وَمَا یَتَضَرَّعُوْنَ ۟

७६. आणि आम्ही त्यांना शिक्षा- यातनाग्रस्तही केले तरीही हे लोक ना तर आपल्या पालनकर्त्यासमोर झुकले आणि ना विनम्रतेचा मार्ग पत्करला. info
التفاسير:

external-link copy
77 : 23

حَتّٰۤی اِذَا فَتَحْنَا عَلَیْهِمْ بَابًا ذَا عَذَابٍ شَدِیْدٍ اِذَا هُمْ فِیْهِ مُبْلِسُوْنَ ۟۠

७७. येथेपर्यंत की जेव्हा आम्ही त्यांच्यावर कठोर शिक्षा- यातनेचे द्वार खुले केले तेव्हा त्याच वेळी त्वरित निराश झाले. info
التفاسير:

external-link copy
78 : 23

وَهُوَ الَّذِیْۤ اَنْشَاَ لَكُمُ السَّمْعَ وَالْاَبْصَارَ وَالْاَفْـِٕدَةَ ؕ— قَلِیْلًا مَّا تَشْكُرُوْنَ ۟

७८. तोच (अल्लाह) आहे, ज्याने तुमच्यासाठी कान, डोळे आणि हृदय बनविले, परंतु तुम्ही फार कमी आभार मानता. info
التفاسير:

external-link copy
79 : 23

وَهُوَ الَّذِیْ ذَرَاَكُمْ فِی الْاَرْضِ وَاِلَیْهِ تُحْشَرُوْنَ ۟

७९. आणि तोच आहे, ज्याने तुम्हाला (निर्माण करून) जमिनीवर पसरविले आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्रित केले जाल. info
التفاسير:

external-link copy
80 : 23

وَهُوَ الَّذِیْ یُحْیٖ وَیُمِیْتُ وَلَهُ اخْتِلَافُ الَّیْلِ وَالنَّهَارِ ؕ— اَفَلَا تَعْقِلُوْنَ ۟

८०. आणि तोच होय जो जिवंत राखतो आणि मृत्यु देतो आणि रात्र व दिवसाचा फेरबदल करण्याचा अधिकारही तोच राखतो. काय तुम्ही अकलेचा वापर करीत नाही? info
التفاسير:

external-link copy
81 : 23

بَلْ قَالُوْا مِثْلَ مَا قَالَ الْاَوَّلُوْنَ ۟

८१. किंबहुना त्या लोकांनी देखील तेच सांगितले, जे पूर्वीचे लोक सांगत आले आहेत. info
التفاسير:

external-link copy
82 : 23

قَالُوْۤا ءَاِذَا مِتْنَا وَكُنَّا تُرَابًا وَّعِظَامًا ءَاِنَّا لَمَبْعُوْثُوْنَ ۟

८२. म्हणतात की जेव्हा मेल्यानंतर आम्ही माती आणि हाडे होऊन जाऊ, काय तरीही आम्ही अवश्य उभे केले जाऊ? info
التفاسير:

external-link copy
83 : 23

لَقَدْ وُعِدْنَا نَحْنُ وَاٰبَآؤُنَا هٰذَا مِنْ قَبْلُ اِنْ هٰذَاۤ اِلَّاۤ اَسَاطِیْرُ الْاَوَّلِیْنَ ۟

८३. आमच्याशी आणि आमच्या पूर्वजां (बुजूर्ग लोकां) शी पूर्वीपासूनच हा वायदा होत आला आहे. काही नाही, या केवळ पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या कथा- कहाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
84 : 23

قُلْ لِّمَنِ الْاَرْضُ وَمَنْ فِیْهَاۤ اِنْ كُنْتُمْ تَعْلَمُوْنَ ۟

८४. यांना विचारा, जर जाणत असाल तर सांगा की धरती आणि तिच्या समस्त वस्तू कोणाच्या मालकीच्या आहेत? info
التفاسير:

external-link copy
85 : 23

سَیَقُوْلُوْنَ لِلّٰهِ ؕ— قُلْ اَفَلَا تَذَكَّرُوْنَ ۟

८५. ते त्वरित उत्तर देतील की अल्लाहच्या, सांगा तर मग तुम्ही बोध प्राप्त का नाही करीत? info
التفاسير:

external-link copy
86 : 23

قُلْ مَنْ رَّبُّ السَّمٰوٰتِ السَّبْعِ وَرَبُّ الْعَرْشِ الْعَظِیْمِ ۟

८६. त्यांना विचारा, आकाशांचा आणि अतिशय महान ईशसिंहासना (अर्श) चा स्वामी कोण आहे? info
التفاسير:

external-link copy
87 : 23

سَیَقُوْلُوْنَ لِلّٰهِ ؕ— قُلْ اَفَلَا تَتَّقُوْنَ ۟

८७. ते लोक उत्तर देतील, अल्लाहच आहे. सांगा, मग तुम्ही भय का नाही राखत? info
التفاسير:

external-link copy
88 : 23

قُلْ مَنْ بِیَدِهٖ مَلَكُوْتُ كُلِّ شَیْءٍ وَّهُوَ یُجِیْرُ وَلَا یُجَارُ عَلَیْهِ اِنْ كُنْتُمْ تَعْلَمُوْنَ ۟

८८. यांना विचारा की सर्व गोष्टींचा अधिकार कोणाच्या हाती आहे, जो आश्रय देतो आणि ज्याच्या तुलनेत (विरोधात) कोणी आश्रय देऊ शकत नाही. तुम्ही जाणत असाल तर सांगा. info
التفاسير:

external-link copy
89 : 23

سَیَقُوْلُوْنَ لِلّٰهِ ؕ— قُلْ فَاَنّٰی تُسْحَرُوْنَ ۟

८९. हेच उत्तर देतील की, अल्लाहच आहे. सांगा, मग तुमच्यावर कोणीकडून जादूटोणा होतो? info
التفاسير: