ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
170 : 2

وَاِذَا قِیْلَ لَهُمُ اتَّبِعُوْا مَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ قَالُوْا بَلْ نَتَّبِعُ مَاۤ اَلْفَیْنَا عَلَیْهِ اٰبَآءَنَا ؕ— اَوَلَوْ كَانَ اٰبَآؤُهُمْ لَا یَعْقِلُوْنَ شَیْـًٔا وَّلَا یَهْتَدُوْنَ ۟

१७०. आणि जेव्हा जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने अवतरीत केलेल्या ग्रंथानुसार आचरण करा, तेव्हा उत्तर देतात की आम्ही तर त्याच मार्गाचे अनुसरण करू, ज्यावर आम्हाला आपले वाडवडील आढळले, वास्तविक त्यांचे वाडवडील मूर्ख आणि भटकलेले असले तरी.१ info

(१) आजदेखील बिदअतवाल्यांना (धर्मात नवनवीन रुढी रिवाज दाखल करणाऱ्यांना) समजविले जावे की या नव्या गोष्टींची धर्मात काहीच किंमत नाही, तर ते हेच उत्तर देती की या रुढी आमच्या पूर्वजांपासून चालत आल्या आहेत, वास्तविक त्यांचे पूर्वजदेखील दीन (धर्मा) च्या खऱ्या ज्ञानापासून अपरिचित आणि मार्गदर्शनापासून वंचित असू शकतात. यास्तव धार्मिक प्रमाण- पुराव्यांसमोर, वाडवडिलांचे आदेश मानणे इमामांचे अनुसरण (पुराव्याविना त्यांचे कथन मानणे) पूर्णतः भटकणे आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह मुसमानांना मार्गभ्रष्टतेच्या दलदलीतून बाहेर काढो.

التفاسير: