ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
110 : 18

قُلْ اِنَّمَاۤ اَنَا بَشَرٌ مِّثْلُكُمْ یُوْحٰۤی اِلَیَّ اَنَّمَاۤ اِلٰهُكُمْ اِلٰهٌ وَّاحِدٌ ۚ— فَمَنْ كَانَ یَرْجُوْا لِقَآءَ رَبِّهٖ فَلْیَعْمَلْ عَمَلًا صَالِحًا وَّلَا یُشْرِكْ بِعِبَادَةِ رَبِّهٖۤ اَحَدًا ۟۠

११०. तुम्ही सांगा की मी तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे (होय)माझ्याकडे वह्यी(प्रकाशना)केली जाते की सर्वांचा उपास्य केवळ एकच उपास्य आहे, तर ज्याला देखील आपल्या पालनकर्त्याशी भेटण्याची आशा असेल, त्याने सत्कर्म करीत राहिले पाहिजे, आणि आपल्या पालनकर्त्याच्या भक्ती-उपासनेत१ दुसऱ्या कोणालाही सहभागी करू नये. info

(१) सत्कर्म ते होय, जे पैगंबरांच्या आचरणशैलीनुसार असावे, अर्थात जो कोणी आपल्या पालनकर्त्या(अल्लाह) च्या भेटीचा पुरेपूर विश्वास बाळगत असेल त्याने प्रत्येक कर्म पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या आचरणशैलीनुसार करावे, आणि दुसरे असे की अल्लाहच्या उपासनेत दुसऱ्या कोणालाही सहभागी ठरवू नये, यासाठी की धर्मात नवीन गोष्टी सामील करणे आणि मूर्तीपूजा करणे या दोन्ही गोष्टी कर्म वाया जाण्यास कारक ठरतात. सर्वश्रेष्ठ अल्लाह, या दोन्ही गोष्टींपासून प्रत्येक मुसलमानाचे रक्षण करो.

التفاسير: