ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
15 : 16

وَاَلْقٰی فِی الْاَرْضِ رَوَاسِیَ اَنْ تَمِیْدَ بِكُمْ وَاَنْهٰرًا وَّسُبُلًا لَّعَلَّكُمْ تَهْتَدُوْنَ ۟ۙ

१५. आणि त्याने धरतीवर पर्वत गाडले आहेत, यासाठी की तिने तुमच्यासह हलू नये आणि नद्या व मार्ग बनविले, यासाठी की तुम्ही उद्दिष्टाप्रत पोहचावे. info
التفاسير:

external-link copy
16 : 16

وَعَلٰمٰتٍ ؕ— وَبِالنَّجْمِ هُمْ یَهْتَدُوْنَ ۟

१६. दुसऱ्याही अनेक निशाण्या (निर्धारीत केल्या) आणि ताऱ्यांद्वारेही लोक मार्ग प्राप्त करून घेतात. info
التفاسير:

external-link copy
17 : 16

اَفَمَنْ یَّخْلُقُ كَمَنْ لَّا یَخْلُقُ ؕ— اَفَلَا تَذَكَّرُوْنَ ۟

१७. तर काय तो, जो निर्माण करतो, त्याच्या समान आहे, जो निर्माण करू शकत नाही? काय तुम्ही कधीच विचार करीत नाही? info
التفاسير:

external-link copy
18 : 16

وَاِنْ تَعُدُّوْا نِعْمَةَ اللّٰهِ لَا تُحْصُوْهَا ؕ— اِنَّ اللّٰهَ لَغَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

१८. आणि जर तुम्ही अल्लाहच्या देणग्यांचा हिशोब (गणना) करू पाहाल तर तुम्ही तो कधीच करू शकत नाही. निःसंशय, अल्लाह मोफा माफ करणारा दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
19 : 16

وَاللّٰهُ یَعْلَمُ مَا تُسِرُّوْنَ وَمَا تُعْلِنُوْنَ ۟

१९. आणि जे काही तुम्ही लपवाल किंवा उघड कराल, अल्लाह सर्व काही जाणतो. info
التفاسير:

external-link copy
20 : 16

وَالَّذِیْنَ یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ لَا یَخْلُقُوْنَ شَیْـًٔا وَّهُمْ یُخْلَقُوْنَ ۟ؕ

२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहखेरीज ज्यांना हे लोक पुकारतात ते कोणतीही वस्तू निर्माण करू शकत नाही, उलट हे स्वतः निर्माण केले गेले आहेत. info
التفاسير:

external-link copy
21 : 16

اَمْوَاتٌ غَیْرُ اَحْیَآءٍ ؕۚ— وَمَا یَشْعُرُوْنَ ۙ— اَیَّانَ یُبْعَثُوْنَ ۟۠

२१. मेलेले आहेत, जिवंत नाहीत. त्यांना तर हेही माहीत नाही की केव्हा (जिवंत करून) उठवले जातील. info
التفاسير:

external-link copy
22 : 16

اِلٰهُكُمْ اِلٰهٌ وَّاحِدٌ ۚ— فَالَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ قُلُوْبُهُمْ مُّنْكِرَةٌ وَّهُمْ مُّسْتَكْبِرُوْنَ ۟

२२. तुम्हा सर्वांचा माबूद (उपास्य) केवळ अल्लाह एकटा आहे, आणि आखिरतवर ईमान न राखणाऱ्यांची मने भ्रष्ट आहेत. आणि ते स्वतः गर्विष्ठ आहेत. info
التفاسير:

external-link copy
23 : 16

لَا جَرَمَ اَنَّ اللّٰهَ یَعْلَمُ مَا یُسِرُّوْنَ وَمَا یُعْلِنُوْنَ ؕ— اِنَّهٗ لَا یُحِبُّ الْمُسْتَكْبِرِیْنَ ۟

२३. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह, त्या प्रत्येक गोष्टीला, जिला ते लपवितात आणि जिला जाहीर करतात, चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाह घमेंडी लोकांना पसंत करीत नाही. info
التفاسير:

external-link copy
24 : 16

وَاِذَا قِیْلَ لَهُمْ مَّاذَاۤ اَنْزَلَ رَبُّكُمْ ۙ— قَالُوْۤا اَسَاطِیْرُ الْاَوَّلِیْنَ ۟ۙ

२४. आणि त्यांना जेव्हा विचारले जाते की तुमच्या पालनकर्त्याने काय अवतरीत केले आहे, तेव्हा उत्तर देतात की पूर्वीच्या लोकांच्या कथा कहाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
25 : 16

لِیَحْمِلُوْۤا اَوْزَارَهُمْ كَامِلَةً یَّوْمَ الْقِیٰمَةِ ۙ— وَمِنْ اَوْزَارِ الَّذِیْنَ یُضِلُّوْنَهُمْ بِغَیْرِ عِلْمٍ ؕ— اَلَا سَآءَ مَا یَزِرُوْنَ ۟۠

२५. (याचाच परिणाम असेल) की कयामतच्या दिवशी हे लोक आपल्या पूर्ण ओझ्यासह, त्यांच्या ओझ्याचेही भागीदार ठरतील, ज्यांना ज्ञानाविना पथभ्रष्ट करीत राहिले, पाहा तर किती वाीट ओझे उचलत आहेत. info
التفاسير:

external-link copy
26 : 16

قَدْ مَكَرَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ فَاَتَی اللّٰهُ بُنْیَانَهُمْ مِّنَ الْقَوَاعِدِ فَخَرَّ عَلَیْهِمُ السَّقْفُ مِنْ فَوْقِهِمْ وَاَتٰىهُمُ الْعَذَابُ مِنْ حَیْثُ لَا یَشْعُرُوْنَ ۟

२६. त्यांच्या पूर्वीच्या लोकांनीही कावेबाजपणा केला. (शेवटी) अल्लाहने त्यांच्या (कट-कारस्थानाच्या) घरांना मुळा (पाया) पासून उखडून टाकले आणि त्यांच्या (डोक्यांवर) छत वरून कोसळले आणि त्यांच्याजव अज़ाब (शिक्षा-यातना) अशा ठिकाणाहून आला, जे ठिकाण त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. info
التفاسير: