ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

external-link copy
114 : 11

وَاَقِمِ الصَّلٰوةَ طَرَفَیِ النَّهَارِ وَزُلَفًا مِّنَ الَّیْلِ ؕ— اِنَّ الْحَسَنٰتِ یُذْهِبْنَ السَّیِّاٰتِ ؕ— ذٰلِكَ ذِكْرٰی لِلذّٰكِرِیْنَ ۟ۚ

११४. आणि दिवसाच्या दोन्ही किनाऱ्यांवर नमाज कायम राखा, आणि रात्रीच्या काही भागातही.१ निःसंशय सत्कर्मे वाईट गोष्टींना दूर करतात.२ हा उपदेश आहे, बोध प्राप्त करणाऱ्यांकरिता. info

(१) दोन्ही किनाऱ्यांशी अभिप्रेत काहींनी सकाळ-संध्याकाळ, काहींनी फक्त इशा (रात्र) आणि काहींनी मगरिब (सूर्यास्त) व इशा दोघांची वेळ घेतली आहे. इमाम इब्ने कसीर फर्मावितात की संभवतः ही आयत मेराजपूर्वी उतरली असेल ज्यात पाच वेळची नमाज फर्ज (अनिवार्य) केली गेली, कारण त्यापूर्वी दोनच नमाज फर्ज होती एक सूर्योदयापूर्वी आणि एक सूर्यास्तापूर्वी, आणि रात्रीच्या उत्तरार्धात तहज्जुदची नमाज, मग तहज्जुदची नमाज सर्वसामान्य मुसलमानांना माफ केली गेली. पुढे त्या तहज्जुद नमाजची अनिवार्यता काहींच्या कथनानुसार समाप्त केली गेली. (इब्ने कसीर) (२) ज्या प्रकारे हदीस वचनांमध्येही याला तपशीलवार सांगितले गेले आहे. उदा. पाच वेळची नमाज, जुमआ (शुक्रवार) ते जुमआपर्यंत आणि रमजानपासून दुसऱ्या रमजानपर्यंत, यांच्या दरम्यान होणाऱ्या अपराधांना दूर करणारे आहेत, जर मोठ्या अपराधांपासून स्वतःला वाचविले गेल्यास. (सहीह मुस्लिम - किताबुल तहारत....) अन्य एका हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले,.... सांगा, जर तुमच्यापैकी एखाद्याच्या दारासमोर एक मोठा जलप्रवाह वाहत असेल, तो दररोज त्या प्रवाहात पाच वेळा स्नान करीत असेल, तर काय त्यानंतर त्याच्या शरीरावर मळ-घाण बाकी राहील.... पैगंबरांच्या साथीदारांनी उत्तर दिले,.... नाही. पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी फर्माविले, अशा प्रकारे पाच वेळची नमाज आहे. त्यांच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह अपराधांना व चुकांना मिटवितो. (सहीह बुखारी, किताबुल मवाकीत, बाबुस्सालवातिल खम्से कफ्फारतुन (आणि) मुस्लिम किताबुल मसाजिद बाबुल मशये इलस्सलाते तुमहा बिहिल खताया व तुरफआ बिहिद दरजातु)

التفاسير: