(१) ही तीच गोष्ट होय जी अनेकरित्या पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना धीर-सांत्वना देण्यासाठी सांगितली गेली की तुमच्यापूर्वी जेवढे पैगंबर आलेत त्यांनाही खोटे ठरविले गेले, सजा-यातना दिल्या गेल्या. तात्पर्य, ज्याप्रकारे त्यांनी धीर-संयम व हिंमत राखली त्याच प्रकारे तुम्हीही या सत्याच्या शत्रूंपुढे धीर, संयम आणि दृढता दाखवा. यावरून हे कळाले की सैतानाचे अनुयायी मनवांखेरीज जिन्नांमध्येही आहेत, आणि हे ते होते जे दोन्ही गटांचे शत्रु, विद्रोही, अत्याचारी आणि दुराचारी गर्विष्ठ आहेत.
(१) अर्थात सैतानाच्या वाईट इराद्याला तेच लोक बळी पडतात, जे आखिरतवर ईमान राखत नाहीत, आणि हे खरे आहे की ज्या प्रकारे लोकांच्या मनात आखिरतचा विश्वास कमजोर होत चालला आहे, तद्नुषंगे लोक सैतानी व्यूहात फसत चालले आहेत.
(१) कुरआनात सांगितलेल्या सत्याचे अवलोकन प्रत्येक कालखंडात केले जाऊ शकते अन्य एका ठिकाणी अल्लाहने फर्माविले, ‘’तुमच्या मर्जीनंतरही अधिकांश लोक ईमान राखणार नाहीत.’’ (सूरह यूसुफ-१०३) तात्पर्य, सत्य आणि सचोटीच्या मार्गावर चालणारे नेहमी फार थोडे असतात ज्यावरून हेही सिद्ध होते की सत्याचा आधार प्रमाण व पुरावा आहे. लोकांची कमी अधिक संख्या नव्हे. ज्या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांनी मानले ती सत्य असावी असे नाही आणि कमी लोक सत्यनिष्ठ नाहीत असेही नाही, किंबहुना कुरआनाद्वआरे या सत्याच्या आधारावर शक्य आहे की सत्यनिष्ठ संख्येने कमी असतात आणि खोटे लोक जास्त. ज्याची पुष्टी हदीसद्वारे होते. पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, माझे अनुयायी ७३ गटांमध्ये विभागले जातील, ज्यापैकी फक्त एक गट जन्नतमध्ये जाईल, बाकी सर्व जहन्नममध्ये जातील आणि जन्नतमध्ये जाणाऱ्या गटाची लक्षणे सांगितली की जो माझ्या आणि माझ्या सहाबांच्या मार्गावर चालणारा असेल. (अबु दाऊद- किताबुस सुन्नः, प्रकरण शरह अस सुन्नः नं. ४५९६, तिर्मिजी- किताबुल ईमान, प्रकरण माजाअ फी श्फ्तराक हाजेहिल उम्मः)