पवित्र कुरअानको अर्थको अनुवाद - मराठी अनुवाद : मुहम्मद शफी अनसारी ।

external-link copy
45 : 3

اِذْ قَالَتِ الْمَلٰٓىِٕكَةُ یٰمَرْیَمُ اِنَّ اللّٰهَ یُبَشِّرُكِ بِكَلِمَةٍ مِّنْهُ ۙۗ— اسْمُهُ الْمَسِیْحُ عِیْسَی ابْنُ مَرْیَمَ وَجِیْهًا فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ وَمِنَ الْمُقَرَّبِیْنَ ۟ۙ

४५. जेव्हा फरिश्ते म्हणाले, हे मरियम! अल्लाह तुम्हाला आपल्या एका कलिमा १ चा शुभ समाचार देतो ज्याचे नाव मरियमचा पुत्र मसीह ईसा आहे, जो या जगात आणि मरणोत्तर जीवनात सन्मानित आहे आणि तो माझ्या निकट दासांपैकी आहे. info

(१) हजरत ईसा यांना अल्लाहचा कलिमा अशासाठी म्हटले गेले आहे की त्यांचा जन्म अगदी चमत्कारिकरित्या जगरहाटीविरूद्ध बापाविना, अल्लाहच्या विशेष सामर्थ्याद्वारे आणि त्याच्या (होऊन जा) या कथनाची उत्पत्ती होय.

التفاسير: