വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

ബുറൂജ്

external-link copy
1 : 85

وَالسَّمَآءِ ذَاتِ الْبُرُوْجِ ۟ۙ

१. बुरुजांवाल्या आकाशाची शपथ. info
التفاسير:

external-link copy
2 : 85

وَالْیَوْمِ الْمَوْعُوْدِ ۟ۙ

२. वायदा केलेल्या दिवसाची शपथ! info
التفاسير:

external-link copy
3 : 85

وَشَاهِدٍ وَّمَشْهُوْدٍ ۟ؕ

३. हजर होणाऱ्या आणि हजर केल्या गेलेल्याची शपथ! info
التفاسير:

external-link copy
4 : 85

قُتِلَ اَصْحٰبُ الْاُخْدُوْدِ ۟ۙ

४. (की) खंदकवाल्यांचा सर्वनाश केला गेला. info
التفاسير:

external-link copy
5 : 85

النَّارِ ذَاتِ الْوَقُوْدِ ۟ۙ

५. ती एक आग होती इंधनाची. info
التفاسير:

external-link copy
6 : 85

اِذْ هُمْ عَلَیْهَا قُعُوْدٌ ۟ۙ

६. जेव्हा ते लोक तिच्या जवळपास बसले होते. info
التفاسير:

external-link copy
7 : 85

وَّهُمْ عَلٰی مَا یَفْعَلُوْنَ بِالْمُؤْمِنِیْنَ شُهُوْدٌ ۟ؕ

७. आणि ईमानधारकांशी जे करीत होते, ते आपल्या समोर पाहात होते. info
التفاسير:

external-link copy
8 : 85

وَمَا نَقَمُوْا مِنْهُمْ اِلَّاۤ اَنْ یُّؤْمِنُوْا بِاللّٰهِ الْعَزِیْزِ الْحَمِیْدِ ۟ۙ

८. हे लोक त्या ईमानधारकांच्या अन्य एखाद्या अपराधाचा सूड घेत नव्हते, याखेरीज की त्यांनी वर्चस्वशाली, सर्व प्रशंसेस पात्र अशा अल्लाहवर ईमान राखले होते. info
التفاسير:

external-link copy
9 : 85

الَّذِیْ لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَاللّٰهُ عَلٰی كُلِّ شَیْءٍ شَهِیْدٌ ۟ؕ

९. ज्याच्यासाठी आकाश आणि धरतीचे साम्राज्य व राज्यसत्ता आहे आणि प्रत्येक वस्तू सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर आहे. info
التفاسير:

external-link copy
10 : 85

اِنَّ الَّذِیْنَ فَتَنُوا الْمُؤْمِنِیْنَ وَالْمُؤْمِنٰتِ ثُمَّ لَمْ یَتُوْبُوْا فَلَهُمْ عَذَابُ جَهَنَّمَ وَلَهُمْ عَذَابُ الْحَرِیْقِ ۟ؕ

१०. निःसंशय, ज्या लोकांनी ईमानधारक पुरुषांना व स्त्रियांना सताविले, मग माफीही मागितली नाही तर त्यांच्यासाठी जहन्नमची शिक्षा-यातना आहे आणि जळण्याची शिक्षा. info
التفاسير:

external-link copy
11 : 85

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ لَهُمْ جَنّٰتٌ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ؕ— ذٰلِكَ الْفَوْزُ الْكَبِیْرُ ۟ؕ

११. निःसंशय, ईमान कबूल करणाऱ्यांकरिता आणि सत्कर्म करणाऱ्यांकरिता त्या बागा आहे, ज्यांच्या खाली प्रवाह वाहत आहेत. हीच मोठी सफलता आहे. info
التفاسير:

external-link copy
12 : 85

اِنَّ بَطْشَ رَبِّكَ لَشَدِیْدٌ ۟ؕ

१२. निःसंशय, तुमच्या पालनकर्त्याची पकड मोठी सक्त आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 85

اِنَّهٗ هُوَ یُبْدِئُ وَیُعِیْدُ ۟ۚ

१३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील. info
التفاسير:

external-link copy
14 : 85

وَهُوَ الْغَفُوْرُ الْوَدُوْدُ ۟ۙ

१४. तो मोठा माफ करणारा आणि खूप स्नेह-प्रेम करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
15 : 85

ذُو الْعَرْشِ الْمَجِیْدُ ۟ۙ

१५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा. info
التفاسير:

external-link copy
16 : 85

فَعَّالٌ لِّمَا یُرِیْدُ ۟ؕ

१६. जे इच्छिल ते करून टाकणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 85

هَلْ اَتٰىكَ حَدِیْثُ الْجُنُوْدِ ۟ۙ

१७. काय तुम्हाला लष्करांची बातमीही मिळाली आहे? info
التفاسير:

external-link copy
18 : 85

فِرْعَوْنَ وَثَمُوْدَ ۟ؕ

१८. (अर्थात) फिरऔन आणि समूदची. info
التفاسير:

external-link copy
19 : 85

بَلِ الَّذِیْنَ كَفَرُوْا فِیْ تَكْذِیْبٍ ۟ۙ

१९. खरे तर हे इन्कारी लोक खोटे ठरविण्याच्याच मागे लागले आहेत. info
التفاسير:

external-link copy
20 : 85

وَّاللّٰهُ مِنْ وَّرَآىِٕهِمْ مُّحِیْطٌ ۟ۚ

२०. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहनेही त्यांना सगळीकडून घेरले आहे. info
التفاسير:

external-link copy
21 : 85

بَلْ هُوَ قُرْاٰنٌ مَّجِیْدٌ ۟ۙ

२१. किंबहुना हा कुरआन मोठी शान वैभव (प्रशंसा) राखणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
22 : 85

فِیْ لَوْحٍ مَّحْفُوْظٍ ۟۠

२२. ‘लोहे महफूज’मध्ये (लिहिलेला). info
التفاسير: