വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
6 : 76

عَیْنًا یَّشْرَبُ بِهَا عِبَادُ اللّٰهِ یُفَجِّرُوْنَهَا تَفْجِیْرًا ۟

६. जो एक झरा आहे, ज्यातून अल्लाहचे दास पितील, त्याचे प्रवाह (पाट) काढतील (जिकडे इच्छितील) info
التفاسير:

external-link copy
7 : 76

یُوْفُوْنَ بِالنَّذْرِ وَیَخَافُوْنَ یَوْمًا كَانَ شَرُّهٗ مُسْتَطِیْرًا ۟

७. जे नवस पूर्ण करतात१ आणि त्या दिवसाचे भय बाळगतात, ज्याचे संकट चारी बाजूंना पसरणार आहे. info

(१) अर्थात केवळ एक अल्लाहची उपासना करतात, नवसही मानतात तर फक्त अल्लाहकरिता आणि तो पूर्णही करतात. तात्पर्य, नवस पूर्ण करणे आवश्यक आहे, या अटीवर की तो अवज्ञेचा नसावा. हदीसमधील उल्लेखानुसार ज्याने नवस मानला असेल की तो अल्लाहचे आज्ञापालन करील तर त्याचे पालन करावे आणि ज्याने अल्लाहच्या अवज्ञेचा नवस मानला असेल तर त्याने असा नवस पूर्ण करू नये. (सहीह बुखारी, किताबुल ऐमान, बाबुन नज्रे फित ताअते)

التفاسير:

external-link copy
8 : 76

وَیُطْعِمُوْنَ الطَّعَامَ عَلٰی حُبِّهٖ مِسْكِیْنًا وَّیَتِیْمًا وَّاَسِیْرًا ۟

८. आणि अल्लाहच्या प्रेमाखातर गरीब, अनाथ आणि कैद्यांना जेवू घालतात. info
التفاسير:

external-link copy
9 : 76

اِنَّمَا نُطْعِمُكُمْ لِوَجْهِ اللّٰهِ لَا نُرِیْدُ مِنْكُمْ جَزَآءً وَّلَا شُكُوْرًا ۟

९. आम्ही तर तुम्हाला केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी जेवू घालतो, तुमच्याकडून ना मोबदला इच्छितो, ना आभार. info
التفاسير:

external-link copy
10 : 76

اِنَّا نَخَافُ مِنْ رَّبِّنَا یَوْمًا عَبُوْسًا قَمْطَرِیْرًا ۟

१०. निःसंशय, आम्ही आपल्या पालनकर्त्यातर्फे त्या दिवसाचे भय राखतो जो मोठा दुःस्थितीचा आणि कठोरतापूर्ण असेल. info
التفاسير:

external-link copy
11 : 76

فَوَقٰىهُمُ اللّٰهُ شَرَّ ذٰلِكَ الْیَوْمِ وَلَقّٰىهُمْ نَضْرَةً وَّسُرُوْرًا ۟ۚ

११. तेव्हा अल्लाहने त्यांना त्या दिवसाच्या संकटापासून वाचविले. आणि त्यांना तजेलता व आनंद प्रदान केला. info
التفاسير:

external-link copy
12 : 76

وَجَزٰىهُمْ بِمَا صَبَرُوْا جَنَّةً وَّحَرِیْرًا ۟ۙ

१२. आणि त्यांना त्यांच्या धीर - संयमाच्या मोबदल्यात जन्नत आणि रेशमी वस्त्र प्रदान केले. info
التفاسير:

external-link copy
13 : 76

مُّتَّكِـِٕیْنَ فِیْهَا عَلَی الْاَرَآىِٕكِ ۚ— لَا یَرَوْنَ فِیْهَا شَمْسًا وَّلَا زَمْهَرِیْرًا ۟ۚ

१३. ते तिथे आसनांवर तक्के लावून बसतील, त्यांना तिथे ना सूर्याची प्रखर उष्णता जाणवेल, ना सक्त थंडीची तीव्रता. info
التفاسير:

external-link copy
14 : 76

وَدَانِیَةً عَلَیْهِمْ ظِلٰلُهَا وَذُلِّلَتْ قُطُوْفُهَا تَذْلِیْلًا ۟

१४. आणि त्यांच्या (जन्नतच्या) सावल्या त्यांच्यावर झुकलेल्या असतील आणि त्यांचे (मेवे) आणि गुच्छे खाली लोंबकळत असतील. info
التفاسير:

external-link copy
15 : 76

وَیُطَافُ عَلَیْهِمْ بِاٰنِیَةٍ مِّنْ فِضَّةٍ وَّاَكْوَابٍ كَانَتْ قَوَارِیْرَ ۟ۙ

१५. आणि त्यांच्या दरम्यान चांदीची भांडी आणि काचेचे प्याले ये - जा करतील. info
التفاسير:

external-link copy
16 : 76

قَوَارِیْرَ مِنْ فِضَّةٍ قَدَّرُوْهَا تَقْدِیْرًا ۟

१६. काचही चांदीची असेल, ज्यांना (पिणाऱ्यांनी) अनुमानाने मापून ठेवले असेल. info
التفاسير:

external-link copy
17 : 76

وَیُسْقَوْنَ فِیْهَا كَاْسًا كَانَ مِزَاجُهَا زَنْجَبِیْلًا ۟ۚ

१७. आणि त्यांना तिथे अशी पेये पाजली जातील, ज्यात सुंठीचे मिश्रण असेल. info
التفاسير:

external-link copy
18 : 76

عَیْنًا فِیْهَا تُسَمّٰی سَلْسَبِیْلًا ۟

१८. जन्नतच्या एका प्रवाहातून ज्याचे नाव सलसबील आहे. info
التفاسير:

external-link copy
19 : 76

وَیَطُوْفُ عَلَیْهِمْ وِلْدَانٌ مُّخَلَّدُوْنَ ۚ— اِذَا رَاَیْتَهُمْ حَسِبْتَهُمْ لُؤْلُؤًا مَّنْثُوْرًا ۟

१९. आणि त्यांच्या चोहीकडे ती अल्पवयीन बालके हिंडत-फिरत असतील. जे नेहमी (बालक) राहणारे आहेत. जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल तर कल्पना कराल की ते (जणू) विखुरलेले (अस्सल) मोती आहेत. info
التفاسير:

external-link copy
20 : 76

وَاِذَا رَاَیْتَ ثَمَّ رَاَیْتَ نَعِیْمًا وَّمُلْكًا كَبِیْرًا ۟

२०. आणि तुम्ही तिथे, जिकडे पाहाल तिकडे पूर्ण ईशदेणग्या आणि महान राज्यसत्ता दिसून येईल. info
التفاسير:

external-link copy
21 : 76

عٰلِیَهُمْ ثِیَابُ سُنْدُسٍ خُضْرٌ وَّاِسْتَبْرَقٌ ؗ— وَّحُلُّوْۤا اَسَاوِرَ مِنْ فِضَّةٍ ۚ— وَسَقٰىهُمْ رَبُّهُمْ شَرَابًا طَهُوْرًا ۟

२१. त्यांच्या (शरीरा) वर हिरवे मौल्यवान आणि जाड रेशमी वस्त्रे असतील. आणि त्यांना चांदीच्या कांकणाचा दागिना घातला जाईल आणि त्यांना त्यांचा पालनकर्ता स्वच्छ शुद्ध (पाक) मद्य पाजेल. info
التفاسير:

external-link copy
22 : 76

اِنَّ هٰذَا كَانَ لَكُمْ جَزَآءً وَّكَانَ سَعْیُكُمْ مَّشْكُوْرًا ۟۠

२२. (फर्माविले जाईल) हा आहे तुमच्या कर्मांचा मोबदला आणि तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा केली गेली. info
التفاسير:

external-link copy
23 : 76

اِنَّا نَحْنُ نَزَّلْنَا عَلَیْكَ الْقُرْاٰنَ تَنْزِیْلًا ۟ۚ

२३. निःसंशय, आम्ही तुमच्यावर कुरआन हळू हळू (क्रमाक्रमाने) अवतरित केले. info
التفاسير:

external-link copy
24 : 76

فَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ وَلَا تُطِعْ مِنْهُمْ اٰثِمًا اَوْ كَفُوْرًا ۟ۚ

२४. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशावर अटळ राहा, आणि त्यांच्यापैकी कोणत्याही अपराध्याचे किंवा कृतघ्नाचे म्हणणे मान्य करू नका. info
التفاسير:

external-link copy
25 : 76

وَاذْكُرِ اسْمَ رَبِّكَ بُكْرَةً وَّاَصِیْلًا ۟ۖۚ

२५. आणि सकाळ संध्याकाळ आपल्या पालनकर्त्याचे नामःस्मरण करा. info
التفاسير: