വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
9 : 69

وَجَآءَ فِرْعَوْنُ وَمَنْ قَبْلَهٗ وَالْمُؤْتَفِكٰتُ بِالْخَاطِئَةِ ۟ۚ

९. फिरऔन आणि त्याच्या पूर्वीचे लोक आणि ज्यांच्या वस्त्या पालथ्या घातल्या गेल्या, त्यांनीही अपराध केले. info
التفاسير:

external-link copy
10 : 69

فَعَصَوْا رَسُوْلَ رَبِّهِمْ فَاَخَذَهُمْ اَخْذَةً رَّابِیَةً ۟

१०. आणि आपल्या पालनकर्त्याच्या रसूल (पैगंबरा) ची अवज्ञा केली (शेवटी) अल्लाहने त्यांना (ही) पकडीत घेतले. info
التفاسير:

external-link copy
11 : 69

اِنَّا لَمَّا طَغَا الْمَآءُ حَمَلْنٰكُمْ فِی الْجَارِیَةِ ۟ۙ

११. जेव्हा पाण्यात पूर आला तर त्या वेळी आम्ही तुम्हाला नौकेत चढविले. info
التفاسير:

external-link copy
12 : 69

لِنَجْعَلَهَا لَكُمْ تَذْكِرَةً وَّتَعِیَهَاۤ اُذُنٌ وَّاعِیَةٌ ۟

१२. यासाठी की त्यास तुमच्यासाठी बोध उपदेश (आणि स्मारक) बनवावे, आणि (यासाठी की) स्मरण राखणाऱ्या कानांनी त्यास स्मरणात राखावे. info
التفاسير:

external-link copy
13 : 69

فَاِذَا نُفِخَ فِی الصُّوْرِ نَفْخَةٌ وَّاحِدَةٌ ۟ۙ

१३. तर जेव्हा सूर (शंखा) मध्ये एक फुंक मारली जाईल. info
التفاسير:

external-link copy
14 : 69

وَّحُمِلَتِ الْاَرْضُ وَالْجِبَالُ فَدُكَّتَا دَكَّةً وَّاحِدَةً ۟ۙ

१४. आणि धरती व पर्वत उचलून घेतले जातील आणि एकाच प्रहारात कण-कण (चुरेचूर) बनविले जातील. info
التفاسير:

external-link copy
15 : 69

فَیَوْمَىِٕذٍ وَّقَعَتِ الْوَاقِعَةُ ۟ۙ

१५. त्या दिवशी घडून येणारी घटना (कयामत) घडून येईल. info
التفاسير:

external-link copy
16 : 69

وَانْشَقَّتِ السَّمَآءُ فَهِیَ یَوْمَىِٕذٍ وَّاهِیَةٌ ۟ۙ

१६. आणि आकाश विदीर्ण होईल तर त्या दिवशी फार कमजोर होईल. info
التفاسير:

external-link copy
17 : 69

وَّالْمَلَكُ عَلٰۤی اَرْجَآىِٕهَا ؕ— وَیَحْمِلُ عَرْشَ رَبِّكَ فَوْقَهُمْ یَوْمَىِٕذٍ ثَمٰنِیَةٌ ۟ؕ

१७. आणि त्याच्या किनाऱ्यांवर फरिश्ते असतील आणि तुमच्या पालनकर्त्याचे आसन (अर्श) त्या दिवशी आठ फरिश्ते आपल्यावर उचलून घेतलेले असतील. info
التفاسير:

external-link copy
18 : 69

یَوْمَىِٕذٍ تُعْرَضُوْنَ لَا تَخْفٰی مِنْكُمْ خَافِیَةٌ ۟

१८. त्या दिवशी तुम्ही सर्व हजर केले जाल, तुमचे कोणतेही रहस्य लपून राहणार नाही. info
التفاسير:

external-link copy
19 : 69

فَاَمَّا مَنْ اُوْتِیَ كِتٰبَهٗ بِیَمِیْنِهٖ فَیَقُوْلُ هَآؤُمُ اقْرَءُوْا كِتٰبِیَهْ ۟ۚ

१९. तेव्हा त्याचे कर्मपत्र त्याच्या उजव्या हातात दिले जाईल, तेव्हा तो म्हणू लागेल की घ्या, माझे कर्मपत्र वाचा. info
التفاسير:

external-link copy
20 : 69

اِنِّیْ ظَنَنْتُ اَنِّیْ مُلٰقٍ حِسَابِیَهْ ۟ۚ

२०. मला तर पूर्ण विश्वास होता की मी आपला (कर्मांचा) हिशोब प्राप्त करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
21 : 69

فَهُوَ فِیْ عِیْشَةٍ رَّاضِیَةٍ ۟ۙ

२१. तर तो एका सुख-संपन्न जीवनात असेल info
التفاسير:

external-link copy
22 : 69

فِیْ جَنَّةٍ عَالِیَةٍ ۟ۙ

२२. उच्च (आणि सुंदर) जन्नतमध्ये. info
التفاسير:

external-link copy
23 : 69

قُطُوْفُهَا دَانِیَةٌ ۟

२३. जिची फळे खाली झुकलेली असतील. info
التفاسير:

external-link copy
24 : 69

كُلُوْا وَاشْرَبُوْا هَنِیْٓـًٔا بِمَاۤ اَسْلَفْتُمْ فِی الْاَیَّامِ الْخَالِیَةِ ۟

२४. (त्यांना सांगितले जाईल) की मजेने खा व प्या, आपल्या त्या कर्मांच्या मोबदल्यात जी तुम्ही मागच्या काळात केलीत. info
التفاسير:

external-link copy
25 : 69

وَاَمَّا مَنْ اُوْتِیَ كِتٰبَهٗ بِشِمَالِهٖ ۙ۬— فَیَقُوْلُ یٰلَیْتَنِیْ لَمْ اُوْتَ كِتٰبِیَهْ ۟ۚ

२५. परंतु ज्याला त्याचे कर्मपत्र डाव्या हातात दिले जाईल, तर तो म्हणेल की अरेरे! मला माझे कर्मपत्र दिले गेले नसते. info
التفاسير:

external-link copy
26 : 69

وَلَمْ اَدْرِ مَا حِسَابِیَهْ ۟ۚ

२६. आणि मी जाणतच नाही की हिशोब काय आहे. info
التفاسير:

external-link copy
27 : 69

یٰلَیْتَهَا كَانَتِ الْقَاضِیَةَ ۟ۚ

२७. मृत्युनेच माझे काम संपविले असते तर (बरे झाले असते) info
التفاسير:

external-link copy
28 : 69

مَاۤ اَغْنٰی عَنِّیْ مَالِیَهْ ۟ۚ

२८. माझ्या धनानेही मला काही लाभ पोहचविला नाही. info
التفاسير:

external-link copy
29 : 69

هَلَكَ عَنِّیْ سُلْطٰنِیَهْ ۟ۚ

२९. माझे राज्यही माझ्यापासून दुरावले. info
التفاسير:

external-link copy
30 : 69

خُذُوْهُ فَغُلُّوْهُ ۟ۙ

३०. (आदेश होईल) धरा त्याला, मग त्याच्या गळ्यात जोखंड (तौक) टाका. info
التفاسير:

external-link copy
31 : 69

ثُمَّ الْجَحِیْمَ صَلُّوْهُ ۟ۙ

३१. मग त्याला जहन्नममध्ये टाका. info
التفاسير:

external-link copy
32 : 69

ثُمَّ فِیْ سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا سَبْعُوْنَ ذِرَاعًا فَاسْلُكُوْهُ ۟ؕ

३२. मग त्याला अशा साखळीत की जिचे माप सत्तर हाताचे आहे, जखडून टाका. info
التفاسير:

external-link copy
33 : 69

اِنَّهٗ كَانَ لَا یُؤْمِنُ بِاللّٰهِ الْعَظِیْمِ ۟ۙ

३३. निःसंशय, हा महान अल्लाहवर ईमान राखत नव्हता. info
التفاسير:

external-link copy
34 : 69

وَلَا یَحُضُّ عَلٰی طَعَامِ الْمِسْكِیْنِ ۟ؕ

३४. आणि गरीबाला जेवू घालण्यावर प्रोत्साहित करीत नव्हता. info
التفاسير:

external-link copy
35 : 69

فَلَیْسَ لَهُ الْیَوْمَ هٰهُنَا حَمِیْمٌ ۟ۙ

३५. तर आज इथे त्याचा ना कोणी मित्र आहे info
التفاسير: