വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
16 : 50

وَلَقَدْ خَلَقْنَا الْاِنْسَانَ وَنَعْلَمُ مَا تُوَسْوِسُ بِهٖ نَفْسُهٗ ۖۚ— وَنَحْنُ اَقْرَبُ اِلَیْهِ مِنْ حَبْلِ الْوَرِیْدِ ۟

१६. आम्ही माणसाला निर्माण केले आहे आणि त्याच्या मनात जे विचार निर्माण होतात आम्ही त्यांना जाणतो,१ आणि आम्ही त्याच्या मुख्य शिरे (प्राण नाडी) पेक्षाही अधिक त्याच्या समीप आहोत. info

(१) अर्थात मनुष्य जे काही लपवितो आणि मनात लपवून ठेवतो ते सर्व काही आम्ही जाणतो. ‘वस्वसा’ मनात येणाऱ्या विचारांना म्हटले जाते, ज्याचे ज्ञान त्या माणसाखेरीज दुसऱ्या कोणालाही निसते, परंतु अल्लाह या विचारांनाही जाणतो. यास्तव ‘हदीसे कुदसी’मध्ये उल्लेखित आहे, ‘‘माझ्या अनुयायींच्या मनात येणाऱ्या विचारांना अल्लाहने माफ केले आहे, अर्थात त्याबद्दल तो गुन्हेगार ठरविणार नाही, जोपर्यंत ते विचार आपल्या तोंडाने व्यक्त करीत नाही किंवा त्यानुसार आचरण करणार नाही.’’ (अल बुखारी, किताबुल ईमान बाबुइजा हनस नासियन फिल ऐमान, मुस्लिम बाबु तजाबुजिल्लाहि अन हदीसिन नफ्से वल ख्ततिरे बिल कल्बे इजालम तस्तकिर्र)

التفاسير:

external-link copy
17 : 50

اِذْ یَتَلَقَّی الْمُتَلَقِّیٰنِ عَنِ الْیَمِیْنِ وَعَنِ الشِّمَالِ قَعِیْدٌ ۟

१७. जेव्हा दोन (नोंद) घेणारे जे घेतात, एक उजव्या बाजूला, आणि दुसरा डाव्या बाजूला बसला आहे. info
التفاسير:

external-link copy
18 : 50

مَا یَلْفِظُ مِنْ قَوْلٍ اِلَّا لَدَیْهِ رَقِیْبٌ عَتِیْدٌ ۟

१८. (मनुष्य) तोंडाने एखादा शब्द काढत नाही तोच त्याच्याजवळ रक्षक (पहारेकरी) तयार आहे. info
التفاسير:

external-link copy
19 : 50

وَجَآءَتْ سَكْرَةُ الْمَوْتِ بِالْحَقِّ ؕ— ذٰلِكَ مَا كُنْتَ مِنْهُ تَحِیْدُ ۟

१९. आणि मृत्युची मुर्छा सत्यासह येऊन पोहचली, हीच ती गोष्ट होय, जिच्यापासून तू पळ काढत होतास. info
التفاسير:

external-link copy
20 : 50

وَنُفِخَ فِی الصُّوْرِ ؕ— ذٰلِكَ یَوْمُ الْوَعِیْدِ ۟

२०. आणि सूर फुंकला जाईल अज़ाब (शिक्षा-यातने) च्या वायद्याचा दिवस हाच आहे. info
التفاسير:

external-link copy
21 : 50

وَجَآءَتْ كُلُّ نَفْسٍ مَّعَهَا سَآىِٕقٌ وَّشَهِیْدٌ ۟

२१. आणि प्रत्येक मनुष्य अशा प्रकारे येईल की त्याच्यासोबत एक हाकणारा असेल आणि एक साक्ष देणारा. info
التفاسير:

external-link copy
22 : 50

لَقَدْ كُنْتَ فِیْ غَفْلَةٍ مِّنْ هٰذَا فَكَشَفْنَا عَنْكَ غِطَآءَكَ فَبَصَرُكَ الْیَوْمَ حَدِیْدٌ ۟

२२. निःसंशय, तू यापासून बेसावध (गफलतीत) होता, परंतु आम्ही तुझ्या समोरून पडदा हटविला, तेव्हा आज तुझी नजर फार तीक्ष्ण आहे. info
التفاسير:

external-link copy
23 : 50

وَقَالَ قَرِیْنُهٗ هٰذَا مَا لَدَیَّ عَتِیْدٌ ۟ؕ

२३. त्याच्यासोबत राहणारे फरिश्ते म्हणतील, हा हजर आहे, जो की माझ्याजवळ होता. info
التفاسير:

external-link copy
24 : 50

اَلْقِیَا فِیْ جَهَنَّمَ كُلَّ كَفَّارٍ عَنِیْدٍ ۟ۙ

२४. दोघे टाकून द्या जहन्नममध्ये प्रत्येक काफिर, उदंड(उध्दट) माणसाला. info
التفاسير:

external-link copy
25 : 50

مَّنَّاعٍ لِّلْخَیْرِ مُعْتَدٍ مُّرِیْبِ ۟ۙ

२५. जो सत्कर्मांपासून रोखणारा, मर्यादा भंग करणारा आणि संशयी होता. info
التفاسير:

external-link copy
26 : 50

١لَّذِیْ جَعَلَ مَعَ اللّٰهِ اِلٰهًا اٰخَرَ فَاَلْقِیٰهُ فِی الْعَذَابِ الشَّدِیْدِ ۟

२६. ज्याने अल्लाहसोबत दुसरा माबूद (उपास्य) ठरवून घेतला होता, तेव्हा त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकून द्या. info
التفاسير:

external-link copy
27 : 50

قَالَ قَرِیْنُهٗ رَبَّنَا مَاۤ اَطْغَیْتُهٗ وَلٰكِنْ كَانَ فِیْ ضَلٰلٍۢ بَعِیْدٍ ۟

२७. त्याचा साथीदार (सैतान) म्हणेल की हे आमच्या पालनकर्त्या! मी याला मार्गभ्रष्ट केले नव्हते, उलट हा स्वतःच दूरच्या मार्गभ्रष्टतेत होता. info
التفاسير:

external-link copy
28 : 50

قَالَ لَا تَخْتَصِمُوْا لَدَیَّ وَقَدْ قَدَّمْتُ اِلَیْكُمْ بِالْوَعِیْدِ ۟

२८. (अल्लाह) फर्माविल की, माझ्यासमोर वादविवाद करू नका. मी तर आधीच तुमच्याकडे शिक्षा - यातनेचा वायदा पाठविला होता. info
التفاسير:

external-link copy
29 : 50

مَا یُبَدَّلُ الْقَوْلُ لَدَیَّ وَمَاۤ اَنَا بِظَلَّامٍ لِّلْعَبِیْدِ ۟۠

२९. माझ्याजवळ गोष्ट बदलली जात नाही आणि ना मी आपल्या दासांवर (उपासकांवर) किंचितही अत्याचार करणारा आहे . info
التفاسير:

external-link copy
30 : 50

یَوْمَ نَقُوْلُ لِجَهَنَّمَ هَلِ امْتَلَاْتِ وَتَقُوْلُ هَلْ مِنْ مَّزِیْدٍ ۟

३०. ज्या दिवशी आम्ही जहन्नमला विचारू की काय तू (पूर्णतः) भरली? ती उत्तर देईल की, आणखी काही जास्त आहे का? info
التفاسير:

external-link copy
31 : 50

وَاُزْلِفَتِ الْجَنَّةُ لِلْمُتَّقِیْنَ غَیْرَ بَعِیْدٍ ۟

३१. आणि जन्नत, नेक सदाचारी लोकांसाठी अगदी जवळ केली जाईल किंचितही दूर नसेल. info
التفاسير:

external-link copy
32 : 50

هٰذَا مَا تُوْعَدُوْنَ لِكُلِّ اَوَّابٍ حَفِیْظٍ ۟ۚ

३२. हे आहे, ज्याचा वायदा तुमच्याशी केला जात होता, अशा त्या प्रत्येक माणसासाठी, जो ध्यानमग्न आणि नियमित (आज्ञापालन) करणारा असेल. info
التفاسير:

external-link copy
33 : 50

مَنْ خَشِیَ الرَّحْمٰنَ بِالْغَیْبِ وَجَآءَ بِقَلْبٍ مُّنِیْبِ ۟ۙ

३३. जो रहमान (दयावान अल्लाह) चे गुप्तपणे भय राखत असेल आणि रुजू होणारे हृदय घेऊन आला असेल. info
التفاسير:

external-link copy
34 : 50

١دْخُلُوْهَا بِسَلٰمٍ ؕ— ذٰلِكَ یَوْمُ الْخُلُوْدِ ۟

३४. तुम्ही या जन्नतमध्ये शांतीपूर्वक दाखल व्हा. हा नेहमी राहण्याचा दिवस आहे. info
التفاسير:

external-link copy
35 : 50

لَهُمْ مَّا یَشَآءُوْنَ فِیْهَا وَلَدَیْنَا مَزِیْدٌ ۟

३५. हे तिथे जे काही इच्छितील ते त्यांना मिळेल (किंबहुना) आमच्याजवळ आणखीही जास्त आहे. info
التفاسير: