വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
5 : 49

وَلَوْ اَنَّهُمْ صَبَرُوْا حَتّٰی تَخْرُجَ اِلَیْهِمْ لَكَانَ خَیْرًا لَّهُمْ ؕ— وَاللّٰهُ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

५. आणि जर या लोकांनी येथेपर्यंत धीर संयम राखला असता की तुम्ही (स्वतः) त्यांच्या जवळ आले असते तर हेच त्यांच्यासाठी अधिक चांगले झाले असते, आणि अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
6 : 49

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِنْ جَآءَكُمْ فَاسِقٌ بِنَبَاٍ فَتَبَیَّنُوْۤا اَنْ تُصِیْبُوْا قَوْمًا بِجَهَالَةٍ فَتُصْبِحُوْا عَلٰی مَا فَعَلْتُمْ نٰدِمِیْنَ ۟

६. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्हाला एखादा दुराचारी खबर देईल तर तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे चौकशी करून घेत जा (असे न व्हावे) की अजाणतेपणामुळे तुम्ही एखाद्या समुदायाला हानी पोहचवावी, मग नंतर आपल्या कृत्यावर पश्चात्ताप करू लागावे. info
التفاسير:

external-link copy
7 : 49

وَاعْلَمُوْۤا اَنَّ فِیْكُمْ رَسُوْلَ اللّٰهِ ؕ— لَوْ یُطِیْعُكُمْ فِیْ كَثِیْرٍ مِّنَ الْاَمْرِ لَعَنِتُّمْ وَلٰكِنَّ اللّٰهَ حَبَّبَ اِلَیْكُمُ الْاِیْمَانَ وَزَیَّنَهٗ فِیْ قُلُوْبِكُمْ وَكَرَّهَ اِلَیْكُمُ الْكُفْرَ وَالْفُسُوْقَ وَالْعِصْیَانَ ؕ— اُولٰٓىِٕكَ هُمُ الرّٰشِدُوْنَ ۟ۙ

७. आणि जाणून असा की तुमच्या दरम्यान अल्लाहचा पैगंबर हजर आहे जर बहुतेक गोष्टींमध्ये ते तुमचे म्हणणे मानत राहिले तर तुम्ही अडचणीत पडाल, परंतु अल्लाहने तुमच्यासाठी ईमानास प्रिय बनविले आणि त्यास तुमच्या हृदयात सुशोभित केले आहे आणि कुप्र (इन्कार) ला आणि दुष्कर्मांना व अवज्ञाकारितेला तुमच्या नजरेत अप्रिय बनवेले आहे. हेच लोक सन्मार्ग प्राप्त झालेले आहेत. info
التفاسير:

external-link copy
8 : 49

فَضْلًا مِّنَ اللّٰهِ وَنِعْمَةً ؕ— وَاللّٰهُ عَلِیْمٌ حَكِیْمٌ ۟

८. अल्लाहच्या कृपा आणि अनुग्रहाने, आणि अल्लाह जाणणारा व बुद्धिकौशल्य बाळगणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 49

وَاِنْ طَآىِٕفَتٰنِ مِنَ الْمُؤْمِنِیْنَ اقْتَتَلُوْا فَاَصْلِحُوْا بَیْنَهُمَا ۚ— فَاِنْ بَغَتْ اِحْدٰىهُمَا عَلَی الْاُخْرٰی فَقَاتِلُوا الَّتِیْ تَبْغِیْ حَتّٰی تَفِیْٓءَ اِلٰۤی اَمْرِ اللّٰهِ ۚ— فَاِنْ فَآءَتْ فَاَصْلِحُوْا بَیْنَهُمَا بِالْعَدْلِ وَاَقْسِطُوْا ؕ— اِنَّ اللّٰهَ یُحِبُّ الْمُقْسِطِیْنَ ۟

९. आणि जर मुसलमानांचे दोन गट आपसात लढू लागतील तर त्याच्यात समेट (मिलाफ) घडवून आणा, मग जर त्यांच्यापैकी एक गट दुसऱ्या गटावर अत्याचार करील, तर तुम्ही (सर्व) अत्याचार करणाऱ्या गटाशी लढा. येथे पर्यर्ंत की तो अल्लाहच्या आदेशाकडे परत यावा,१ जर परतून आला तर न्यायपूर्वक त्यांच्या दरम्यान समजोता करा आणि न्याय करा. निःसंशय, अल्लाह न्याय करणाऱ्यांशी प्रेम राखतो. info

(१) अर्थात अल्लाह आणि पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशानुसार आपसातील मतभेद मिटविण्यास तयार नसतील आणि उत्पात (फसाद) माजविण्याची नीती अंगीकारतील तर अशा स्थितीत इतर मुसलमानांची ही जबाबदारी आहे की सर्वांनी मिळून उत्पात माजविणाऱ्यांशी लढा द्यावा, येथपावेतो की त्यांनी अल्लाहचा आदेश मानण्यास तयार व्हावे.

التفاسير:

external-link copy
10 : 49

اِنَّمَا الْمُؤْمِنُوْنَ اِخْوَةٌ فَاَصْلِحُوْا بَیْنَ اَخَوَیْكُمْ وَاتَّقُوا اللّٰهَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُوْنَ ۟۠

१०. (लक्षात ठेवा) समस्त ईमान राखणारे (आपसात) भाऊ भाऊ आहेत, तेव्हा आपल्या दोन बांधवांच्या दरम्यान समेट (मिलाफ) करून देत राहा आणि अल्लाहचे भय बाळगत राहा, यासाठी की तुमच्यावर दया कृपा केली जावी. info
التفاسير:

external-link copy
11 : 49

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَا یَسْخَرْ قَوْمٌ مِّنْ قَوْمٍ عَسٰۤی اَنْ یَّكُوْنُوْا خَیْرًا مِّنْهُمْ وَلَا نِسَآءٌ مِّنْ نِّسَآءٍ عَسٰۤی اَنْ یَّكُنَّ خَیْرًا مِّنْهُنَّ ۚ— وَلَا تَلْمِزُوْۤا اَنْفُسَكُمْ وَلَا تَنَابَزُوْا بِالْاَلْقَابِ ؕ— بِئْسَ الِاسْمُ الْفُسُوْقُ بَعْدَ الْاِیْمَانِ ۚ— وَمَنْ لَّمْ یَتُبْ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الظّٰلِمُوْنَ ۟

११. हे ईमान राखणाऱ्यांनो! पुरुषांनी दुसऱ्या पुरुषांची थट्टा उडवू नये, संभवतः ते यांच्याहून अधिक चांगले असावेत आणि ना स्त्रियांनी (इतर) स्त्रियांची थट्टा करावी. संभवतः त्या, त्यांच्याहून अधिक चांगल्या असाव्यात, आणि आपसात एकमेकांवर दोषारोप ठेवू नका आणि ना एखाद्याला वाईट टोपण नाव द्या. ईमानानंतर फिस्क (वाईट शब्द) वाईट नाव आहे। आणि जे क्षमा-याचना न करतील, तर तेच अत्याचारी लोक आहेत. info
التفاسير: