വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
171 : 4

یٰۤاَهْلَ الْكِتٰبِ لَا تَغْلُوْا فِیْ دِیْنِكُمْ وَلَا تَقُوْلُوْا عَلَی اللّٰهِ اِلَّا الْحَقَّ ؕ— اِنَّمَا الْمَسِیْحُ عِیْسَی ابْنُ مَرْیَمَ رَسُوْلُ اللّٰهِ وَكَلِمَتُهٗ ۚ— اَلْقٰىهَاۤ اِلٰی مَرْیَمَ وَرُوْحٌ مِّنْهُ ؗ— فَاٰمِنُوْا بِاللّٰهِ وَرُسُلِهٖ ۫— وَلَا تَقُوْلُوْا ثَلٰثَةٌ ؕ— اِنْتَهُوْا خَیْرًا لَّكُمْ ؕ— اِنَّمَا اللّٰهُ اِلٰهٌ وَّاحِدٌ ؕ— سُبْحٰنَهٗۤ اَنْ یَّكُوْنَ لَهٗ وَلَدٌ ۘ— لَهٗ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ؕ— وَكَفٰی بِاللّٰهِ وَكِیْلًا ۟۠

१७१. हे ग्रंथधारकांनो! आपल्या दीन-धर्माबाबत अतिशयोक्ती करू नका, आणि अल्लाहच्या संबंधाने सत्य तेच बोला. निःसंशय मरियमपुत्र ईसा मसीह केवळ अल्लाहचे रसूल आणि कलिमा आहे जो मरियमकडे पाठविला गेला आणि त्याच्यातर्फे आत्मा आहे, यास्तव अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखा आणि अल्लाह तीन आहे असे म्हणू नका.१ हे म्हणणे थांबवा यातच तुमचे हित आहे. निःसंशय तुमचा उपास्य केवळ एक अल्लाह आहे. तो पाक-पवित्र आहे, यापासून की त्याची एखादी संतान असावी. त्याच्याचकरिता आहे जे काही आकाशांमध्ये व धरतीवर आहे आणि अल्लाह काम बनविण्यासाठी पुरेसा आहे. info

(१) ख्रिश्चनांमध्ये अनेक गट आहेत. काहीजण हजरत ईसा यांना अल्लाह, काहीजण अल्लाहचे सहभागी तर काही अल्लाहचा पुत्र मानतात, मग जे अल्लाह मानतात ते तीन अल्लाहचे आणि हजरत ईसा यांना तीनपैकी एक असण्यावर श्रद्धा ठेवतात. यास्तव सर्वश्रेष्ठ अल्लाह फर्मावितो की तीन अल्लाह म्हणणे थांबवा. अल्लाह केवळ एक आहे.

التفاسير:

external-link copy
172 : 4

لَنْ یَّسْتَنْكِفَ الْمَسِیْحُ اَنْ یَّكُوْنَ عَبْدًا لِّلّٰهِ وَلَا الْمَلٰٓىِٕكَةُ الْمُقَرَّبُوْنَ ؕ— وَمَنْ یَّسْتَنْكِفْ عَنْ عِبَادَتِهٖ وَیَسْتَكْبِرْ فَسَیَحْشُرُهُمْ اِلَیْهِ جَمِیْعًا ۟

१७२. मसीह, अल्लाहचे दास होण्यात कधीही तिरस्कार करीत नाहीत आणि ना निकटचे फरिश्ते, आणि जो अल्लाहची उपासना करण्यापासून तिरस्कार व घमेंड करील तर तो त्या सर्वांना आपल्याकडे एकत्र करील. info
التفاسير:

external-link copy
173 : 4

فَاَمَّا الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ فَیُوَفِّیْهِمْ اُجُوْرَهُمْ وَیَزِیْدُهُمْ مِّنْ فَضْلِهٖ ۚ— وَاَمَّا الَّذِیْنَ اسْتَنْكَفُوْا وَاسْتَكْبَرُوْا فَیُعَذِّبُهُمْ عَذَابًا اَلِیْمًا ۙ۬— وَّلَا یَجِدُوْنَ لَهُمْ مِّنْ دُوْنِ اللّٰهِ وَلِیًّا وَّلَا نَصِیْرًا ۟

१७३. तेव्हा, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले, त्यांना त्यांचा पुरेपूर मोबदला देईल, आणि आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करील, परंतु ज्यांनी तिरस्कार केला आणि घमेंड केली त्यांना दुःखदायक शिक्षा-यातना देईल, मग त्यांना अल्लाहशिवाय आपला कोणी मित्र व मदत करणारा आढळणार नाही. info
التفاسير:

external-link copy
174 : 4

یٰۤاَیُّهَا النَّاسُ قَدْ جَآءَكُمْ بُرْهَانٌ مِّنْ رَّبِّكُمْ وَاَنْزَلْنَاۤ اِلَیْكُمْ نُوْرًا مُّبِیْنًا ۟

१७४. लोकांनो! तुमच्याजवळ तुमच्या पालनकर्त्यातर्फे प्रमाण येऊन पोहचले आहे १ आणि आम्ही तुमच्याकडे दिव्य तेज (पवित्र कुरआन) अवतरीत केले आहे. info

(१) मूळ शब्द बुरहान अर्थात असे अकाट्य प्रमाण की ज्याच्यानंतर कसल्याही निमित्त किंवा बहाण्याला वाव न राहावा. अशी उपाययोजना की ज्यामुळे सर्व प्रकारच्या शंका-कुशंका नष्ट व्हाव्यात यास्तव पुढे याला आकाशीय दिव्य तेज (नूर) म्हटले गेले आहे.

التفاسير:

external-link copy
175 : 4

فَاَمَّا الَّذِیْنَ اٰمَنُوْا بِاللّٰهِ وَاعْتَصَمُوْا بِهٖ فَسَیُدْخِلُهُمْ فِیْ رَحْمَةٍ مِّنْهُ وَفَضْلٍ ۙ— وَّیَهْدِیْهِمْ اِلَیْهِ صِرَاطًا مُّسْتَقِیْمًا ۟ؕ

१७५. मग ज्या लोकांनी अल्लाहवर ईमान राखले आणि त्याला मजबूतपणे धरले तर अल्लाह त्यांना आपल्या कृपाछत्रात घेईल आणि त्यांना आपल्याकडे येण्याचा सरळ मार्ग दाखवील. info
التفاسير: