വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
7 : 33

وَاِذْ اَخَذْنَا مِنَ النَّبِیّٖنَ مِیْثَاقَهُمْ وَمِنْكَ وَمِنْ نُّوْحٍ وَّاِبْرٰهِیْمَ وَمُوْسٰی وَعِیْسَی ابْنِ مَرْیَمَ ۪— وَاَخَذْنَا مِنْهُمْ مِّیْثَاقًا غَلِیْظًا ۟ۙ

७. आणि जेव्हा आम्ही समस्त पैगंबरांकडून वचन घेतले (विशेषतः) तुमच्याकडून आणि नूहकडून आणि इब्राहीमकडून आणि मूसाकडून आणि मरियमचे पुत्र ईसाकडून आणि आम्ही त्या सर्वांकडून पक्के वचन घेतले होते. info
التفاسير:

external-link copy
8 : 33

لِّیَسْـَٔلَ الصّٰدِقِیْنَ عَنْ صِدْقِهِمْ ۚ— وَاَعَدَّ لِلْكٰفِرِیْنَ عَذَابًا اَلِیْمًا ۟۠

८. यासाठी की अल्लाहने सच्चा लोकांना त्यांच्या सच्चेपणाविषयी विचारणा करावी आणि न मानणाऱ्यांकरिता आम्ही दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 33

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اذْكُرُوْا نِعْمَةَ اللّٰهِ عَلَیْكُمْ اِذْ جَآءَتْكُمْ جُنُوْدٌ فَاَرْسَلْنَا عَلَیْهِمْ رِیْحًا وَّجُنُوْدًا لَّمْ تَرَوْهَا ؕ— وَكَانَ اللّٰهُ بِمَا تَعْمَلُوْنَ بَصِیْرًا ۟ۚ

९. हे ईमान राखणाऱ्यांनो! अल्लाहने जो उपकार तुमच्यावर केला आहे, त्याचे स्मरण करा जेव्हा तुमचा सामना करण्याकरिता सैन्यांवर सैन्ये आली मग आम्ही त्यांच्यावर वेगवान वादळ आणि असे सैन्य पाठविले, जे तुम्ही पाहिलेच नाही आणि तुम्ही जे काही करता अल्लाह ते सर्व पाहतो. info
التفاسير:

external-link copy
10 : 33

اِذْ جَآءُوْكُمْ مِّنْ فَوْقِكُمْ وَمِنْ اَسْفَلَ مِنْكُمْ وَاِذْ زَاغَتِ الْاَبْصَارُ وَبَلَغَتِ الْقُلُوْبُ الْحَنَاجِرَ وَتَظُنُّوْنَ بِاللّٰهِ الظُّنُوْنَا ۟ؕ

१०. जेव्हा (शत्रू) तुमच्या वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने चालून आले आणि जेव्हा डोळे निश्चल झाले आणि काळीज तोंडाशी आले, आणि तुम्ही अल्लाहविषयी विभिन्न विचार करू लागले. info
التفاسير:

external-link copy
11 : 33

هُنَالِكَ ابْتُلِیَ الْمُؤْمِنُوْنَ وَزُلْزِلُوْا زِلْزَالًا شَدِیْدًا ۟

११. इथेच ईमान राखणाऱ्यांची कसोटी घेतली गेली आणि पूर्णतः ते हलवून सोडले गेले. info
التفاسير:

external-link copy
12 : 33

وَاِذْ یَقُوْلُ الْمُنٰفِقُوْنَ وَالَّذِیْنَ فِیْ قُلُوْبِهِمْ مَّرَضٌ مَّا وَعَدَنَا اللّٰهُ وَرَسُوْلُهٗۤ اِلَّا غُرُوْرًا ۟

१२. आणि त्या वेळी दांभिक (मुनाफिक) आणि मनात रोग बाळगणारे म्हणू लागले की अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने आमच्याशी केवळ धोक्याचेच वायदे केले होते. info
التفاسير:

external-link copy
13 : 33

وَاِذْ قَالَتْ طَّآىِٕفَةٌ مِّنْهُمْ یٰۤاَهْلَ یَثْرِبَ لَا مُقَامَ لَكُمْ فَارْجِعُوْا ۚ— وَیَسْتَاْذِنُ فَرِیْقٌ مِّنْهُمُ النَّبِیَّ یَقُوْلُوْنَ اِنَّ بُیُوْتَنَا عَوْرَةٌ ۛؕ— وَمَا هِیَ بِعَوْرَةٍ ۛۚ— اِنْ یُّرِیْدُوْنَ اِلَّا فِرَارًا ۟

१३. आणि त्यांच्याच एका गटाने पुकारुन म्हटले, हे यासरिबच्या लोकानो! तुमच्या थांबण्याचे हे स्थान नाही, परत निघा आणि त्यांचा एक दुसरा गट, पैगंबराजवळ ही अनुमती मागू लागला की आमची घरे खाली (उघडी) आणि असुरक्षित आहेत. वास्तविक ती (उघडी) असुरक्षित नव्हती, (परंतु) त्यांनी पळ काढण्याचा पक्का इरादा केला होता. info
التفاسير:

external-link copy
14 : 33

وَلَوْ دُخِلَتْ عَلَیْهِمْ مِّنْ اَقْطَارِهَا ثُمَّ سُىِٕلُوا الْفِتْنَةَ لَاٰتَوْهَا وَمَا تَلَبَّثُوْا بِهَاۤ اِلَّا یَسِیْرًا ۟

१४. आणि जर मदीनेच्या चोहीबाजूंनी त्यांच्यावर (सैन्ये) दाखल केली गेली असती, मग त्यांच्याशी उत्पात (फसाद) ची मागणी केली गेली असती, तर त्यांनी उत्पात अवश्य माजविला असता. आणि काही लढलेही असते पण थोडेसे. info
التفاسير:

external-link copy
15 : 33

وَلَقَدْ كَانُوْا عَاهَدُوا اللّٰهَ مِنْ قَبْلُ لَا یُوَلُّوْنَ الْاَدْبَارَ ؕ— وَكَانَ عَهْدُ اللّٰهِ مَسْـُٔوْلًا ۟

१५. आणि याच्यापूर्वी तर त्यांनी अल्लाहशी वायदा केला होता की पाठ फिरविणार नाही आणि अल्लाहशी केल्या गेलेल्या वायद्याची विचारपूस निश्चितच होईल. info
التفاسير: