വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

external-link copy
2 : 29

اَحَسِبَ النَّاسُ اَنْ یُّتْرَكُوْۤا اَنْ یَّقُوْلُوْۤا اٰمَنَّا وَهُمْ لَا یُفْتَنُوْنَ ۟

२. काय लोकांनी असे समजून घेतले आहे की त्यांच्या केवळ या बोलण्यावर की आम्ही ईमान राखले आहे, त्यांना परीक्षा घेतल्याविना असेच सोडून दिले जाईल?१ info

(१) अर्थात हा विचार की केवळ तोंडी बोलून ईमान राखल्यानंतर, कसोटी न घेताच सोडले जाईल, उचित नाही, किंबहुना त्यांना प्राण वित्ताची हानी आणि इतर कसोट्यांद्वारे पारखले जाईल, यासाठी की खऱ्या खोट्याची, सत्य असत्याची सच्चा ईमानधारकाची व दांभिक ईमान दर्शविणाऱ्याची माहिती व्हावी.

التفاسير: