വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

external-link copy
47 : 24

وَیَقُوْلُوْنَ اٰمَنَّا بِاللّٰهِ وَبِالرَّسُوْلِ وَاَطَعْنَا ثُمَّ یَتَوَلّٰی فَرِیْقٌ مِّنْهُمْ مِّنْ بَعْدِ ذٰلِكَ ؕ— وَمَاۤ اُولٰٓىِٕكَ بِالْمُؤْمِنِیْنَ ۟

४७. आणि जे म्हणतात की आम्ही अल्लाह आणि रसूल (स.) वर ईमान राखले आणि आज्ञाधारक झालोत, मग त्यांच्यातला एक समूह त्यानंतरही तोंड फिरवितो, हे ईमान राखणारे नाहीत.१ info

(१) हे दांभिक (मुनाफिक) लोकांचे निवेदन आहे, जे तोंडाने इस्लाम जाहीर करीत, परंतु मनात अविश्वास आणि द्वेष- मत्सर राखत. अर्थात खऱ्या ईमानापासून वंचित होते. यास्तव तोंडाने ईमान व्यक्त केल्यानंतरही, त्यांच्या ईमानाचा इन्कार केला गेला आहे.

التفاسير: