(१) या संकटाशी अभिप्रेत हृदयांची ती वक्रता होय, जी माणसाला ईमानापासून वंचित ठेवते. हा पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या आदेशांची अवज्ञा आणि त्यांचा विरोध करण्याचा परिणाम आहे आणि ईमानापासून वंचित होऊन कुप्र (इन्कार, अविश्वासा) वर जीवनाचा अंत, जहन्नमची निरंतर यातना इ. गोष्टींचे कारण बनते जसे आयतीच्या पुढील वाक्यात फर्माविले. यास्तव पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचे शुभ आचरण आणि सुन्नत (चरित्रा) ला प्रत्येक क्षणी दृष्टीपथात राखावे, यास्तव जे कथन आणि कर्म त्याला अनुसरून असेल तेच अल्लाहच्या दरबारात स्वीकृत आणि इतर सर्व अस्वीकृत ठरेल. पैगंबर (स.) यांनी फर्माविले, ‘मनफइला फआला लमसा फलमीहिल कुरआना फहुदुद.’ म्हणजे ‘‘ज्याने असे कर्म केले जे आमच्या आदेशाला अनुसरून नाही ते व्यर्थ आहे.’’ (अलबुखारी, किताबुस्सुलह बाब इज़ा स्तलहु अला सुलहे जौरीन आणि मुस्लिम, किताबुल अकिजया बाब नक़़जिल अहकामिल बातिला व रद्दि मुहदसातिल उमूर व सुन्नन)