വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

external-link copy
39 : 20

اَنِ اقْذِفِیْهِ فِی التَّابُوْتِ فَاقْذِفِیْهِ فِی الْیَمِّ فَلْیُلْقِهِ الْیَمُّ بِالسَّاحِلِ یَاْخُذْهُ عَدُوٌّ لِّیْ وَعَدُوٌّ لَّهٗ ؕ— وَاَلْقَیْتُ عَلَیْكَ مَحَبَّةً مِّنِّیْ ۚ۬— وَلِتُصْنَعَ عَلٰی عَیْنِیْ ۟ۘ

३९. की तुम्ही, या (बाळा) ला लाकडी पेटीत ठेवून तिला बंद करून नदीत सोडून द्या, मग नदी त्या पेटीला किनाऱ्यावर नेईल आणि माझा व त्याचा स्वतःचा शत्रू तिला घेईल आणि मी आपल्यातर्फे विशेष प्रेम आणि पसंतीचा तुमच्यावर वर्षाव केला यासाठी की तुमचे पालनपोषण माझ्या डोळ्यादेखत केले जावे.१ info

(१) यास्तव अल्लाहने असीम सामर्थ्य आणि त्याचे संरक्षण व कमालीच्या देखरेखीचा चमत्कार पाहा की ज्या बालकापायी फिरऔनने असंख्य बालकांची हत्या केली, की तो बालक जिवंत राहू नये. त्याच बालकाला अल्लाह त्यालाच सोपवून त्याच्याचद्वारे पालनपोषण करवित आहे आणि माता आपल्या बाळाला दूध पाजत आहे, पण त्याचा मेहनताना देखील त्याच बाळा (मूसा) च्या शत्रूकडून वसूल करीत आहे.

التفاسير: