വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
43 : 16

وَمَاۤ اَرْسَلْنَا مِنْ قَبْلِكَ اِلَّا رِجَالًا نُّوْحِیْۤ اِلَیْهِمْ فَسْـَٔلُوْۤا اَهْلَ الذِّكْرِ اِنْ كُنْتُمْ لَا تَعْلَمُوْنَ ۟ۙ

४३. आणि तुमच्या पूर्वीही आम्ही पुरुषांनाच (पैगंबर म्हणून) पाठवित राहिलो, ज्यांच्याकडे वहयी (प्रकाशना) अवतरित करीत होतो. जर तुम्ही जाणत नसाल तर ज्ञानी लोकांना विचारा.१ info

(१) मूळ शब्द ‘अहलज्जिक्री’ यास अभिप्रेत ग्रंथधारक होत जे पूर्वीच्या पैगंबरांना आणि त्यांच्या इतिहासाला जाणून होते अर्थात हे की आम्ही जेवढे पैगंबर पाठविले, ते मानवच होते. यास्तव मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देखील जर मानव आहेत तर ही नवीन गोष्ट नाही की त्यामुळे तुम्ही त्यांच्या पैगंबर असण्याचा इन्कार करावा. शंका असेल तर ग्रंथधारकांना विचारा की पूर्वीच्या काळातील सर्व पैगंबर मानव होते की फरिश्ते? जर ते फरिश्ते होते तर अवश्य इन्कार करा आणि जर ते सर्व मानव होते तर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पैगंबरपदाचा इन्कार कोणत्या सबबीवर?

التفاسير:

external-link copy
44 : 16

بِالْبَیِّنٰتِ وَالزُّبُرِ ؕ— وَاَنْزَلْنَاۤ اِلَیْكَ الذِّكْرَ لِتُبَیِّنَ لِلنَّاسِ مَا نُزِّلَ اِلَیْهِمْ وَلَعَلَّهُمْ یَتَفَكَّرُوْنَ ۟

४४. निशाण्या आणि ग्रंथांसह. हे स्मरण (ग्रंथ) आम्ही तुमच्याकडे अवतरित केला आहे की लोकांकडे जे उतरविले गेले आहे, तुम्ही त्यांना ते स्पष्टपणे सांगावे, कदाचित त्यांनी विचारा चिंतन करावे. info
التفاسير:

external-link copy
45 : 16

اَفَاَمِنَ الَّذِیْنَ مَكَرُوا السَّیِّاٰتِ اَنْ یَّخْسِفَ اللّٰهُ بِهِمُ الْاَرْضَ اَوْ یَاْتِیَهُمُ الْعَذَابُ مِنْ حَیْثُ لَا یَشْعُرُوْنَ ۟ۙ

४५. वाईट कावेबाज करणारे, काय या गोष्टीपासून निर्भय झाले आहेत की अल्लाह त्यांना जमिनीत धसवून टाकील किंवा त्यांच्याजवळ अशा ठिकाणाहून अज़ाब (शिक्षा-यातना) यावी, ज्या ठिकाणाची त्यांना शंका आणि कल्पनाही नसावी. info
التفاسير:

external-link copy
46 : 16

اَوْ یَاْخُذَهُمْ فِیْ تَقَلُّبِهِمْ فَمَا هُمْ بِمُعْجِزِیْنَ ۟ۙ

४६. किंवा त्यांना चालता फिरता धरून घ्यावे, हे कोणत्याही प्रकारे अल्लाहला विवश (लाचार) करू शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
47 : 16

اَوْ یَاْخُذَهُمْ عَلٰی تَخَوُّفٍ ؕ— فَاِنَّ رَبَّكُمْ لَرَءُوْفٌ رَّحِیْمٌ ۟

४७. किंवा त्यांना भय दाखवून पकडीत घ्यावे, निःसंशय तुमचा पालनकर्ता मोठा करुणाशील आणि मोठा दयाशील आहे. info
التفاسير:

external-link copy
48 : 16

اَوَلَمْ یَرَوْا اِلٰی مَا خَلَقَ اللّٰهُ مِنْ شَیْءٍ یَّتَفَیَّؤُا ظِلٰلُهٗ عَنِ الْیَمِیْنِ وَالشَّمَآىِٕلِ سُجَّدًا لِّلّٰهِ وَهُمْ دٰخِرُوْنَ ۟

४८. काय त्यांनी अल्लाहच्या निर्मितीपैकी कोणालाही पाहिले नाही की त्याची सावली उजव्या-डाव्या बाजूकडे झुकून अल्लाहसमोर सजदा करते, आणि आपली लाचारी व्यक्त करते. info
التفاسير:

external-link copy
49 : 16

وَلِلّٰهِ یَسْجُدُ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ مِنْ دَآبَّةٍ وَّالْمَلٰٓىِٕكَةُ وَهُمْ لَا یَسْتَكْبِرُوْنَ ۟

४९. आणि निःसंशय, आकाशांमधील आणि धरतीचे समस्त सजीव आणि फरिश्ते, सर्वश्रेष्ठ अल्लाहसमोर सजदा करतात आणि किंचितही घमेंड करीत नाही. info
التفاسير:

external-link copy
50 : 16

یَخَافُوْنَ رَبَّهُمْ مِّنْ فَوْقِهِمْ وَیَفْعَلُوْنَ مَا یُؤْمَرُوْنَ ۟

५०. आणि आपल्या पालनकर्त्याशी, जो त्यांच्यावरती आहे, थरथर कापत राहतात आणि जो आदेश मिळेल, त्याचे पालन करण्यात मग्न राहतात. info
التفاسير:

external-link copy
51 : 16

وَقَالَ اللّٰهُ لَا تَتَّخِذُوْۤا اِلٰهَیْنِ اثْنَیْنِ ۚ— اِنَّمَا هُوَ اِلٰهٌ وَّاحِدٌ ۚ— فَاِیَّایَ فَارْهَبُوْنِ ۟

५१. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने सांगून टाकले आहे की दोन माबूद (उपास्ये) बनवू नका. माबूद तर तोच फक्त एकटा आहे, तेव्हा तुम्ही सर्व केवळ माझेच भय राखा. info
التفاسير:

external-link copy
52 : 16

وَلَهٗ مَا فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَلَهُ الدِّیْنُ وَاصِبًا ؕ— اَفَغَیْرَ اللّٰهِ تَتَّقُوْنَ ۟

५२. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, सर्व त्याचेच आहे, आणि त्याचीच उपासना नेहमी अनिवार्य आहे. काय तरीही तुम्ही त्याच्याखेरीज दुसऱ्यांचे भय बाळगता? info
التفاسير:

external-link copy
53 : 16

وَمَا بِكُمْ مِّنْ نِّعْمَةٍ فَمِنَ اللّٰهِ ثُمَّ اِذَا مَسَّكُمُ الضُّرُّ فَاِلَیْهِ تَجْـَٔرُوْنَ ۟ۚ

५३. आणि तुमच्याजवळ जेवढ्या देखील अल्लाहच्या कृपा देणग्या आहेत सर्व त्यानेच प्रदान केलेल्या आहेत. आता जेव्हा देखील तुम्हाला एखादी कष्ट-यातना आल्यास त्याच्याचकडे दुआ-प्रार्थना करता. info
التفاسير:

external-link copy
54 : 16

ثُمَّ اِذَا كَشَفَ الضُّرَّ عَنْكُمْ اِذَا فَرِیْقٌ مِّنْكُمْ بِرَبِّهِمْ یُشْرِكُوْنَ ۟ۙ

५४. आणि जेव्हा मात्र त्याने ती कष्ट-यातना तुमच्यापासून दूर केली तेव्हा तुमच्यापैकी काही लोक आपल्या पालनकर्त्यासोबत भागीदार बनवू लागतात. info
التفاسير: