വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
52 : 15

اِذْ دَخَلُوْا عَلَیْهِ فَقَالُوْا سَلٰمًا ؕ— قَالَ اِنَّا مِنْكُمْ وَجِلُوْنَ ۟

५२. की जेव्हा त्यांनी इब्राहीमजवळ येऊन सलाम केला, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचे भय वाटते.१ info

(१) हजरत इब्राहीम (अलै.) यांना फरिश्त्यांचे भय अशामुळे वाटले की त्यांनी हजरत इब्राहीमचे तयार केलेले, भाजलेल्या वासरुचे मांस खाल्ले नाही. याचे वर्णन सूरह हूद मध्ये आहे. तात्पर्य अल्लाहच्या महान पैगंबरानाही परोक्ष (ग़ैबच्या) गोष्टींचे ज्ञान नव्हते जर त्यांना हे ज्ञान असते तर हजरत इब्राहीम यांनी जाणले असते की आलेले अतिथी फरिश्ते आहेत आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक नाही. कारण फरिश्ते मानवांप्रमाणे खात-पित नाहीत.

التفاسير:

external-link copy
53 : 15

قَالُوْا لَا تَوْجَلْ اِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلٰمٍ عَلِیْمٍ ۟

५३. फरिश्ते म्हणाले, भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका ज्ञानी पुत्राची शुभ वार्ता देतो. info
التفاسير:

external-link copy
54 : 15

قَالَ اَبَشَّرْتُمُوْنِیْ عَلٰۤی اَنْ مَّسَّنِیَ الْكِبَرُ فَبِمَ تُبَشِّرُوْنَ ۟

५४. इब्राहीम म्हणाले, काय या वृद्धावस्थेने स्पर्श केल्यानंतर तुम्ही मला ही शुभ वार्ता देता! ही आनंदाची बातमी तुम्ही कशी काय देत आहात? info
التفاسير:

external-link copy
55 : 15

قَالُوْا بَشَّرْنٰكَ بِالْحَقِّ فَلَا تَكُنْ مِّنَ الْقٰنِطِیْنَ ۟

५५. फरिश्ते म्हणाले, आम्ही तुम्हाला अगदी खरी शुभवार्ता ऐकवित आहोत. तुम्ही निराश लोकांमध्ये सामील होऊ नका. info
التفاسير:

external-link copy
56 : 15

قَالَ وَمَنْ یَّقْنَطُ مِنْ رَّحْمَةِ رَبِّهٖۤ اِلَّا الضَّآلُّوْنَ ۟

५६. म्हणाले, आपल्या पालनकर्त्याच्या दया कृपेपासून केवळ ते (मार्गभ्रष्ट आणि) बहकलेले लोकच निराश होतात. info
التفاسير:

external-link copy
57 : 15

قَالَ فَمَا خَطْبُكُمْ اَیُّهَا الْمُرْسَلُوْنَ ۟

५७. (इब्राहीम यांनी) विचारले, हे अल्लाहतर्फे पाठविण्यात आलेल्या (फरिश्त्यां) नो! तुमचे असे काय खास काम आहे? info
التفاسير:

external-link copy
58 : 15

قَالُوْۤا اِنَّاۤ اُرْسِلْنَاۤ اِلٰی قَوْمٍ مُّجْرِمِیْنَ ۟ۙ

५८. फरिश्त्यांनी उत्तर दिले, आम्हाला अपराधी लोकांकडे पाठविले गेले आहे. info
التفاسير:

external-link copy
59 : 15

اِلَّاۤ اٰلَ لُوْطٍ ؕ— اِنَّا لَمُنَجُّوْهُمْ اَجْمَعِیْنَ ۟ۙ

५९. परंतु लूतचे कुटुंब की आम्ही त्या सर्वांना अवश्य वाचवू. info
التفاسير:

external-link copy
60 : 15

اِلَّا امْرَاَتَهٗ قَدَّرْنَاۤ ۙ— اِنَّهَا لَمِنَ الْغٰبِرِیْنَ ۟۠

६०. मात्र लूतच्या पत्नीखेरीज की आम्ही तिला थांबणाऱ्या व मागे राहणाऱ्यांमध्ये निश्चित केले आहे. info
التفاسير:

external-link copy
61 : 15

فَلَمَّا جَآءَ اٰلَ لُوْطِ ١لْمُرْسَلُوْنَ ۟ۙ

६१. जेव्हा पाठविलेले फरिश्ते लूतच्या कुटुंबाजवळ पोहोचले. info
التفاسير:

external-link copy
62 : 15

قَالَ اِنَّكُمْ قَوْمٌ مُّنْكَرُوْنَ ۟

६२. तेव्हा लूत म्हणाले, तुम्ही लोक तर काहीसे अनोळखी वाटतात. info
التفاسير:

external-link copy
63 : 15

قَالُوْا بَلْ جِئْنٰكَ بِمَا كَانُوْا فِیْهِ یَمْتَرُوْنَ ۟

६३. ते म्हणाले, (नाही) किंबहुना आम्ही तुमच्याजवळ ती वस्तू घेऊन आलो आहोत, जिच्या बाबतीत हे लोक संशय करीत आहेत. info
التفاسير:

external-link copy
64 : 15

وَاَتَیْنٰكَ بِالْحَقِّ وَاِنَّا لَصٰدِقُوْنَ ۟

६४. आणि आम्ही तर तुझ्याजवळ (उघड) सत्य घेऊन आलो आहोत, आणि आम्ही आहोतही पुरेपुरे सच्चे! info
التفاسير:

external-link copy
65 : 15

فَاَسْرِ بِاَهْلِكَ بِقِطْعٍ مِّنَ الَّیْلِ وَاتَّبِعْ اَدْبَارَهُمْ وَلَا یَلْتَفِتْ مِنْكُمْ اَحَدٌ وَّامْضُوْا حَیْثُ تُؤْمَرُوْنَ ۟

६५. आता तुम्ही आपल्या कुटुंबासह या रात्रीच्या एखाद्या भागात निघून जा. तुम्ही स्वतः त्यांच्या मागे राहा (आणि सावधान!) तुमच्यापैकी कोणीही मागे वळून पाहू नये आणि ज्या ठिकाणी जायचा तुम्हाला आदेश दिला जात आहे, तिथे चालत जा. info
التفاسير:

external-link copy
66 : 15

وَقَضَیْنَاۤ اِلَیْهِ ذٰلِكَ الْاَمْرَ اَنَّ دَابِرَ هٰۤؤُلَآءِ مَقْطُوْعٌ مُّصْبِحِیْنَ ۟

६६. आणि आम्ही त्याच्याकडे या गोष्टीचा फैसला केला की सकाळ होता होताच त्या सर्वांची मुळे कापली जातील. info
التفاسير:

external-link copy
67 : 15

وَجَآءَ اَهْلُ الْمَدِیْنَةِ یَسْتَبْشِرُوْنَ ۟

६७. आणि शहरी लोक मोठा आनंद साजरा करीत आले. info
التفاسير:

external-link copy
68 : 15

قَالَ اِنَّ هٰۤؤُلَآءِ ضَیْفِیْ فَلَا تَفْضَحُوْنِ ۟ۙ

६८. (लूत) म्हणाले, हे लोक माझे अतिथी आहेत, तेव्हा तुम्ही मला अपमानित करू नका. info
التفاسير:

external-link copy
69 : 15

وَاتَّقُوا اللّٰهَ وَلَا تُخْزُوْنِ ۟

६९. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय राखा आणि मला अपमानित करू नका. info
التفاسير:

external-link copy
70 : 15

قَالُوْۤا اَوَلَمْ نَنْهَكَ عَنِ الْعٰلَمِیْنَ ۟

७०. ते म्हणाले, काय आम्ही तुम्हाला साऱ्या जगाचा ठेका घेण्यापासून मनाई केली नव्हती? info
التفاسير: