വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ

പേജ് നമ്പർ:close

external-link copy
14 : 13

لَهٗ دَعْوَةُ الْحَقِّ ؕ— وَالَّذِیْنَ یَدْعُوْنَ مِنْ دُوْنِهٖ لَا یَسْتَجِیْبُوْنَ لَهُمْ بِشَیْءٍ اِلَّا كَبَاسِطِ كَفَّیْهِ اِلَی الْمَآءِ لِیَبْلُغَ فَاهُ وَمَا هُوَ بِبَالِغِهٖ ؕ— وَمَا دُعَآءُ الْكٰفِرِیْنَ اِلَّا فِیْ ضَلٰلٍ ۟

१४. त्यालाच पुकारणे खरे आहे. जे लोक त्याच्याखेरीज दुसऱ्यांना पुकारतात, ते त्यांच्या कोणत्याही हाकेला उत्तर देत नाहीत जणू एखाद्या माणसाने आपले हात पाण्याकडे पसरविले असावेत की पाणी त्यांच्या तोंडात येऊन पडावे, वास्तविक ते पाणी त्यांच्या तोंडात जाणार नाही.१ त्या काफिर लोकांचे जेवढे पुकारणे आहे सर्व पथभ्रष्ट आहे. info

(१) अर्थात जे लोक अल्लाहला सोडून इतरांना मदतीसाठी पुकारतात, त्यांचे उदाहरण असे की जणू एखाद्याने पाण्याकडे हात पसरवून पाण्याला सांगावे, ये माझ्या तोंडात ये, उघड आहे पाणी न चालणारे आहे, त्याला काय माहीत की हात पसरविणाऱ्याची गरज काय आहे आणि न त्याला हे माहीत की मला तोंडापर्यंत येण्याचे सांगितले जात आहे, आणि त्याच्यात हे सामर्थ्य नाही की आपल्या जागेवरून चालत जाऊन, त्याच्या तोंडापर्यंत पोहचावे. अशा प्रकारे हे अनेक ईश्वरांची भक्ती आराधना करणारे अल्लाहखेरीज ज्यांना पुकारतात, त्यांना माहीतही नाही की कोणी त्यांना पुकारत आहे, आणि त्याची अमकी एक गरज आहे आणि ना ती गरज पूर्ण करण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आहे.

التفاسير:

external-link copy
15 : 13

وَلِلّٰهِ یَسْجُدُ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ طَوْعًا وَّكَرْهًا وَّظِلٰلُهُمْ بِالْغُدُوِّ وَالْاٰصَالِ ۟

१५. आणि आकाशांमध्ये व जमिनीवर असलेले समस्त जीव राजी-खुशीने व ना खुशीने अल्लाहलाच सजदा करतात आणि त्यांच्या सावल्यासुद्धा सकाळ-संध्याकाळ अल्लाहला सजदा करतात. info
التفاسير:

external-link copy
16 : 13

قُلْ مَنْ رَّبُّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— قُلِ اللّٰهُ ؕ— قُلْ اَفَاتَّخَذْتُمْ مِّنْ دُوْنِهٖۤ اَوْلِیَآءَ لَا یَمْلِكُوْنَ لِاَنْفُسِهِمْ نَفْعًا وَّلَا ضَرًّا ؕ— قُلْ هَلْ یَسْتَوِی الْاَعْمٰی وَالْبَصِیْرُ ۙ۬— اَمْ هَلْ تَسْتَوِی الظُّلُمٰتُ وَالنُّوْرُ ۚ۬— اَمْ جَعَلُوْا لِلّٰهِ شُرَكَآءَ خَلَقُوْا كَخَلْقِهٖ فَتَشَابَهَ الْخَلْقُ عَلَیْهِمْ ؕ— قُلِ اللّٰهُ خَالِقُ كُلِّ شَیْءٍ وَّهُوَ الْوَاحِدُ الْقَهَّارُ ۟

१६. (तुम्ही) विचारा, आकाशांचा आणि जमिनीचा पालनकर्ता कोण आहे? सांगा अल्लाह! त्यांना सांगा, काय तरीही तुम्ही याच्याखेरीज दुसऱ्यांना मदत करणारे बनवित आहात, जे स्वतः आपल्या जीवाच्या लाभ-हानीचा अधिकार बाळगत नाही. सांगा, काय आंधळा आणि डोळस दोन्ही समान असू शकतात? किंवा अंधार आणि प्रकाश समान असू शकतो? काय, ज्यांना हे अल्लाहचा सहभागी बनवित आहेत, त्यांनीही अल्लाहप्रमाणे काही निर्माण केले आहे की त्यांच्या पाहण्यात निर्मितीच संदिग्ध ठरली? तुम्ही सांगा, केवळ अल्लाहच सर्व वस्तूंना निर्माण करणारा आहे. तो एकटा आहे आणि मोठा जबरदस्त वर्चस्वशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
17 : 13

اَنْزَلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً فَسَالَتْ اَوْدِیَةٌ بِقَدَرِهَا فَاحْتَمَلَ السَّیْلُ زَبَدًا رَّابِیًا ؕ— وَمِمَّا یُوْقِدُوْنَ عَلَیْهِ فِی النَّارِ ابْتِغَآءَ حِلْیَةٍ اَوْ مَتَاعٍ زَبَدٌ مِّثْلُهٗ ؕ— كَذٰلِكَ یَضْرِبُ اللّٰهُ الْحَقَّ وَالْبَاطِلَ ؕ۬— فَاَمَّا الزَّبَدُ فَیَذْهَبُ جُفَآءً ۚ— وَاَمَّا مَا یَنْفَعُ النَّاسَ فَیَمْكُثُ فِی الْاَرْضِ ؕ— كَذٰلِكَ یَضْرِبُ اللّٰهُ الْاَمْثَالَ ۟ؕ

१७. त्यानेच आकाशातून पर्जन्य वृष्टी केली, मग आपापल्या सामर्थ्यानुसार नाले वाहू लागले, मग पाण्याच्या प्रवाहाने वर चढून फेस उचलला आणि त्या वस्तूतही जिला आगीत टाकून तापवितात दागिने किंवा सामानाकरिता, त्याच प्रकारचा फेस आहे. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह सत्य आणि असत्याला स्पष्ट करण्यासाठी उदाहरण देतो. आता तो फेस निकामी होऊन निघून जातो, परंतु ज्या गोष्टी लोकांना लाभ पोहचविणाऱ्या आहेत, त्या धरतीत टिकून राहतात. सर्वश्रेष्ठ अल्लाह अशा प्रकारे उदाहरण देत असतो. info
التفاسير:

external-link copy
18 : 13

لِلَّذِیْنَ اسْتَجَابُوْا لِرَبِّهِمُ الْحُسْنٰی ؔؕ— وَالَّذِیْنَ لَمْ یَسْتَجِیْبُوْا لَهٗ لَوْ اَنَّ لَهُمْ مَّا فِی الْاَرْضِ جَمِیْعًا وَّمِثْلَهٗ مَعَهٗ لَافْتَدَوْا بِهٖ ؕ— اُولٰٓىِٕكَ لَهُمْ سُوْٓءُ الْحِسَابِ ۙ۬— وَمَاْوٰىهُمْ جَهَنَّمُ ؕ— وَبِئْسَ الْمِهَادُ ۟۠

१८. ज्या लोकांनी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाचे पालन केले, त्यांच्याकरिता भलाई आहे आणि ज्या लोकांनी त्याच्या आदेशाचे अनुसरण केले नाही, तर धरतीवर जे काही आहे ते सर्व त्याच्याजवळ असेल आणि त्यासोबत तेवढेच आणखी जास्त असेल मग ते सर्व काही आपल्या बदली (बचावासाठी) देऊन टाकील. हेच ते लोक होत, ज्यांच्यासाठी मोठा वाईट हिशोब आहे आणि त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, जे फार वाईट ठिकाण आहे. info
التفاسير: