ಪವಿತ್ರ ಕುರ್‌ಆನ್ ಅರ್ಥಾನುವಾದ - ಮರಾಠಿ ಅನುವಾದ - ಮುಹಮ್ಮದ್ ಶಫಿ ಅನ್ಸಾರಿ

ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ:close

external-link copy
24 : 22

وَهُدُوْۤا اِلَی الطَّیِّبِ مِنَ الْقَوْلِ ۖۗۚ— وَهُدُوْۤا اِلٰی صِرَاطِ الْحَمِیْدِ ۟

२४. आणि त्यांना पवित्र वचनाचा मार्ग दाखविला गेला आणि प्रशंसनीय (अल्लाहचे) मार्गदर्शन दिले गेले. info
التفاسير:

external-link copy
25 : 22

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا وَیَصُدُّوْنَ عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ وَالْمَسْجِدِ الْحَرَامِ الَّذِیْ جَعَلْنٰهُ لِلنَّاسِ سَوَآءَ ١لْعَاكِفُ فِیْهِ وَالْبَادِ ؕ— وَمَنْ یُّرِدْ فِیْهِ بِاِلْحَادٍ بِظُلْمٍ نُّذِقْهُ مِنْ عَذَابٍ اَلِیْمٍ ۟۠

२५. ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला, आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखू लागले आणि त्या आदरणीय मस्जिदीपासूनही, जिला आम्ही समस्त लोकांकरिता एकसमान केले आहे, मग तिथले रहिवाशी असोत किंवा बाहेरून आलेले असोत, जो देखील अत्याचारपूर्वक त्या ठिकाणी मार्गभ्रष्ट होण्याचा विचार करील, आम्ही त्याला दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातने) ची गोडी चाखवू. info
التفاسير:

external-link copy
26 : 22

وَاِذْ بَوَّاْنَا لِاِبْرٰهِیْمَ مَكَانَ الْبَیْتِ اَنْ لَّا تُشْرِكْ بِیْ شَیْـًٔا وَّطَهِّرْ بَیْتِیَ لِلطَّآىِٕفِیْنَ وَالْقَآىِٕمِیْنَ وَالرُّكَّعِ السُّجُوْدِ ۟

२६. आणि जेव्हा आम्ही इब्राहीमकरिता काबागृहाचे स्थान निश्चित केले (या अटीवर) की माझ्यासोबत दुसऱ्या कोणाला सामील करू नका आणि माझ्या घराला तवाफ (प्रदक्षिणा) करणाऱ्या, उभे राहणाऱ्या, रुकूअ आणि सजदा करणाऱ्यांकरिता स्वच्छ- शुद्ध राखा. info
التفاسير:

external-link copy
27 : 22

وَاَذِّنْ فِی النَّاسِ بِالْحَجِّ یَاْتُوْكَ رِجَالًا وَّعَلٰی كُلِّ ضَامِرٍ یَّاْتِیْنَ مِنْ كُلِّ فَجٍّ عَمِیْقٍ ۟ۙ

२७. आणि लोकांमध्ये हजचे ऐलान करा, लोक तुमच्याजवळ पायी चालतही येतील आणि दुबळ्या रोडावलेल्या उंटावरही दूरदूरच्या सर्व मार्गांनी येतील. info
التفاسير:

external-link copy
28 : 22

لِّیَشْهَدُوْا مَنَافِعَ لَهُمْ وَیَذْكُرُوا اسْمَ اللّٰهِ فِیْۤ اَیَّامٍ مَّعْلُوْمٰتٍ عَلٰی مَا رَزَقَهُمْ مِّنْ بَهِیْمَةِ الْاَنْعَامِ ۚ— فَكُلُوْا مِنْهَا وَاَطْعِمُوا الْبَآىِٕسَ الْفَقِیْرَ ۟ؗ

२८. यासाठी की त्यांनी आपला लाभ प्राप्त करून घेण्यासाठी यावे आणि त्या निर्धारीत दिवसामध्ये अल्लाहचे नामःस्मरण करावे त्या चार पायांच्या पाळीव पशूंवर, तेव्हा तुम्ही स्वतः देखील खा आणि उपाशीपोटी असलेल्या गरीबांनाही खाऊ घाला. info
التفاسير:

external-link copy
29 : 22

ثُمَّ لْیَقْضُوْا تَفَثَهُمْ وَلْیُوْفُوْا نُذُوْرَهُمْ وَلْیَطَّوَّفُوْا بِالْبَیْتِ الْعَتِیْقِ ۟

२९. मग त्यांनी आपला मळ- घाण दूर करावी आणि आपला नवस पूर्ण करावा आणि अल्लाहच्या जुन्या घराला प्रदक्षिणा करावी. info
التفاسير:

external-link copy
30 : 22

ذٰلِكَ ۗ— وَمَنْ یُّعَظِّمْ حُرُمٰتِ اللّٰهِ فَهُوَ خَیْرٌ لَّهٗ عِنْدَ رَبِّهٖ ؕ— وَاُحِلَّتْ لَكُمُ الْاَنْعَامُ اِلَّا مَا یُتْلٰی عَلَیْكُمْ فَاجْتَنِبُوا الرِّجْسَ مِنَ الْاَوْثَانِ وَاجْتَنِبُوْا قَوْلَ الزُّوْرِ ۟ۙ

३०. हे आहेत (हजचे धार्मिक विधी) आणि जो, अल्लाहने निर्धारित केलेल्या प्रतिष्ठापूर्ण गोष्टींचा आदर राखेल तर हे त्याच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता उत्तम आहे आणि तुमच्यासाठी गुरे-ढोरे हलाल (वैध) ठरविले गेले आहेत, मात्र त्यांच्याखेरीज, ज्यांचा आदेश तुम्हाला ऐकविला गेला आहे, यास्तव मूर्तींच्या मलीनतेपासून दूर राहा, आणि खोटे बोलण्यापासूनही अलिप्त राहा. info
التفاسير: