ಪವಿತ್ರ ಕುರ್‌ಆನ್ ಅರ್ಥಾನುವಾದ - ಮರಾಠಿ ಅನುವಾದ - ಮುಹಮ್ಮದ್ ಶಫಿ ಅನ್ಸಾರಿ

ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ:close

external-link copy
5 : 18

مَا لَهُمْ بِهٖ مِنْ عِلْمٍ وَّلَا لِاٰبَآىِٕهِمْ ؕ— كَبُرَتْ كَلِمَةً تَخْرُجُ مِنْ اَفْوَاهِهِمْ ؕ— اِنْ یَّقُوْلُوْنَ اِلَّا كَذِبًا ۟

५. वास्तविकत ना त्यांना स्वतःला याचे ज्ञान आहे, ना त्यांच्या थोर बुजूर्ग लोकांना. हा आरोप मोठा वाईट आहे, जो त्यांच्या तोंडून निघत आहे, ते केवळ खोटे बोलत आहेत. info
التفاسير:

external-link copy
6 : 18

فَلَعَلَّكَ بَاخِعٌ نَّفْسَكَ عَلٰۤی اٰثَارِهِمْ اِنْ لَّمْ یُؤْمِنُوْا بِهٰذَا الْحَدِیْثِ اَسَفًا ۟

६. मग जर या लोकांनी या गोष्टीवर ईमान राखले नाही तर काय तुम्ही त्यांच्या मागे याच दुःखात आपल्या जीवाचा नाश करून घ्याल? info
التفاسير:

external-link copy
7 : 18

اِنَّا جَعَلْنَا مَا عَلَی الْاَرْضِ زِیْنَةً لَّهَا لِنَبْلُوَهُمْ اَیُّهُمْ اَحْسَنُ عَمَلًا ۟

७. धरतीवर जे काही आहे, ते आम्ही धरतीच्या शोभा-सजावटीसाठी बनविले आहे की आम्ही त्यांची कसोटी घ्यावी की त्यांच्यापैकी कोण सत्कर्म करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
8 : 18

وَاِنَّا لَجٰعِلُوْنَ مَا عَلَیْهَا صَعِیْدًا جُرُزًا ۟ؕ

८. आणि या धरतीवर जे काही आहे, आम्ही त्याला एक सपाट मैदान करून टाकणार आहोत. info
التفاسير:

external-link copy
9 : 18

اَمْ حَسِبْتَ اَنَّ اَصْحٰبَ الْكَهْفِ وَالرَّقِیْمِ كَانُوْا مِنْ اٰیٰتِنَا عَجَبًا ۟

९. काय तुम्ही आपल्या मते गुफा आणि शिलालेखवाल्यांना आमच्या निशाण्यांपैकी एखादी मोठी नवलपूर्ण निशाणी समजत आहात? info
التفاسير:

external-link copy
10 : 18

اِذْ اَوَی الْفِتْیَةُ اِلَی الْكَهْفِ فَقَالُوْا رَبَّنَاۤ اٰتِنَا مِنْ لَّدُنْكَ رَحْمَةً وَّهَیِّئْ لَنَا مِنْ اَمْرِنَا رَشَدًا ۟

१०. त्या तरुणांनी जेव्हा गुफेत आश्रय घेतला तेव्हा दुआ-प्रार्थना केली की, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला आपल्या जवळून दया- कृपा प्रदान कर आणि आमच्या कार्यात आमच्यासाठी मार्ग सोपा कर. info
التفاسير:

external-link copy
11 : 18

فَضَرَبْنَا عَلٰۤی اٰذَانِهِمْ فِی الْكَهْفِ سِنِیْنَ عَدَدًا ۟ۙ

११. मग आम्ही त्यांच्या कानांवर अनेक वर्षांपर्यंत त्याच गुफेत पडदे टाकले. info
التفاسير:

external-link copy
12 : 18

ثُمَّ بَعَثْنٰهُمْ لِنَعْلَمَ اَیُّ الْحِزْبَیْنِ اَحْصٰی لِمَا لَبِثُوْۤا اَمَدًا ۟۠

१२. मग आम्ही त्यांना उठवून उभे केले की आम्ही हे जाणून घ्यावे की दोन्ही गटांपैकी या मोठ्या मुदतीला, जी त्यांनी पार पाडली, कोणी जास्त स्मरणात राखले? info
التفاسير:

external-link copy
13 : 18

نَحْنُ نَقُصُّ عَلَیْكَ نَبَاَهُمْ بِالْحَقِّ ؕ— اِنَّهُمْ فِتْیَةٌ اٰمَنُوْا بِرَبِّهِمْ وَزِدْنٰهُمْ هُدًی ۟ۗۖ

१३. आम्ही त्यांची खरी कहाणी तुमच्यासमोर वर्णन करीत आहोत, या काही तरुणांनी१ आपल्या पालनकर्त्यावर ईमान राखले आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनात प्रगती प्रदान केली. info

(१) काही धर्मज्ञानी लोकांच्या मते हे तरुण ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होते, काहींच्या मते त्याचा काळ येशू ख्रिस्तापूर्वीचा होता. हाफीज इब्ने कसीर यांनी याच कथनाला प्राधान्य दिले. असे म्हणतात की एक राजा होता, जो लोकांना मूर्तीपूजा करण्याची व त्यांच्या नावाने भोग प्रसाद चढविण्याची शिकवण देत असे. अल्लाहने या काही तरुणांच्या मनात हा विचार आणला की उपासनायोग्य केवळ अल्लाहच आहे, जो आकाश व धरतीचा निर्माणकर्ता आहे, साऱ्या जगाचा पालनहार आहे. ‘फित्युतुन्‌’ अनेक वचन आहे, तेव्हा त्यांची संख्या नऊपेक्षा कमी नव्हती, हे वेगळे होऊन एका ठिकाणी एकमेव अल्लाहची उपासना करत. हळूहळू लोकांमध्ये त्यांच्या एकेश्वरवादावरील विश्वासाची चर्चा होऊ लागली. हे राजालाही कळाले तेव्हा त्याने, त्यांना दरबारात बोलावून विचारले. त्यांनी निर्भयपणे एकेश्वरवादाविषयी सांगितले. शेवटी राजा आणि आपल्या जमातीच्या मूर्तीपूजकांच्या भयाने आपल्या धर्म व ईमानाच्या रक्षणार्थ, वस्तीपासून दूर एका पर्वताच्या गुफेत लपले. जिथे अल्लाहने त्यांना गाढनिद्रेत झोपविले आणि ते सतत तीनशे वर्षांपर्यंत झोपत राहिले.

التفاسير:

external-link copy
14 : 18

وَّرَبَطْنَا عَلٰی قُلُوْبِهِمْ اِذْ قَامُوْا فَقَالُوْا رَبُّنَا رَبُّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ لَنْ نَّدْعُوَاۡ مِنْ دُوْنِهٖۤ اِلٰهًا لَّقَدْ قُلْنَاۤ اِذًا شَطَطًا ۟

१४. आणि आम्ही त्यांची मने मजबूत केली होती जेव्हा ते उठून उभे राहिले आणि म्हणू लागले की आमचा पालनकर्ता तोच आहे, जो आकाशांचा आणि धरतीचा पालनकर्ता आहे, हे असंभव आहे की आम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या उपास्याला पुकारावे जर असे केले तर आम्ही मोठी अनुचित गोष्ट बोललो. info
التفاسير:

external-link copy
15 : 18

هٰۤؤُلَآءِ قَوْمُنَا اتَّخَذُوْا مِنْ دُوْنِهٖۤ اٰلِهَةً ؕ— لَوْلَا یَاْتُوْنَ عَلَیْهِمْ بِسُلْطٰنٍ بَیِّنٍ ؕ— فَمَنْ اَظْلَمُ مِمَّنِ افْتَرٰی عَلَی اللّٰهِ كَذِبًا ۟ؕ

१५. हा आहे आमचा जनसमूह, ज्याने अल्लाहखेरीज दुसरी उपास्ये बनवून ठेवली आहेत त्यांच्या वर्चस्वाचा एखादा स्पष्ट पुरावा का नाही सादर करत? अल्लाहशी खोट्या गोष्टीचा संबंध जोडणाऱ्यापेक्षा अधिक अत्याचारी कोण आहे? info
التفاسير: