ಪವಿತ್ರ ಕುರ್‌ಆನ್ ಅರ್ಥಾನುವಾದ - ಮರಾಠಿ ಅನುವಾದ - ಮುಹಮ್ಮದ್ ಶಫಿ ಅನ್ಸಾರಿ

ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ:close

external-link copy
79 : 12

قَالَ مَعَاذَ اللّٰهِ اَنْ نَّاْخُذَ اِلَّا مَنْ وَّجَدْنَا مَتَاعَنَا عِنْدَهٗۤ ۙ— اِنَّاۤ اِذًا لَّظٰلِمُوْنَ ۟۠

७९. (यूसुफ) म्हणाले की आम्हाला ज्याच्याजवळ आमची वस्तू आढळून आली आहे त्याला सोडून दुसऱ्यांना बंदी बनविण्यापासून अल्लाहचे शरण इच्छितो. असे केल्याने निश्चितच आम्ही अन्याय करणाऱ्यांपैकी ठरू. info
التفاسير:

external-link copy
80 : 12

فَلَمَّا اسْتَیْـَٔسُوْا مِنْهُ خَلَصُوْا نَجِیًّا ؕ— قَالَ كَبِیْرُهُمْ اَلَمْ تَعْلَمُوْۤا اَنَّ اَبَاكُمْ قَدْ اَخَذَ عَلَیْكُمْ مَّوْثِقًا مِّنَ اللّٰهِ وَمِنْ قَبْلُ مَا فَرَّطْتُّمْ فِیْ یُوْسُفَ ۚ— فَلَنْ اَبْرَحَ الْاَرْضَ حَتّٰی یَاْذَنَ لِیْۤ اَبِیْۤ اَوْ یَحْكُمَ اللّٰهُ لِیْ ۚ— وَهُوَ خَیْرُ الْحٰكِمِیْنَ ۟

८०. जेव्हा हे, यूसुफकडून निराश झाले, तेव्हा एकांतात बसून सल्लामसलत करू लागले. त्यांच्यापैकी जो सर्वांत मोठा होता तो म्हणाला की तुम्हाला माहीत नाही की तुमच्या पित्याने तुमच्याकडून अल्लाहला मध्यस्थी ठेवून पक्के वचन घेतले आहे आणि याच्यापूर्वी तुम्ही यूसुफविषयी अपराध केलेला आहे. आता मी तर भूमीतून पाय काढणार नाही, जोपर्यंत पिता स्वतः मला अनुमती देत नाहीत किंवा सर्वश्रेष्ठ अल्लाह माझ्या या समस्येचा फैसला करील. तोच सर्वोत्तम शासक आहे. info
التفاسير:

external-link copy
81 : 12

اِرْجِعُوْۤا اِلٰۤی اَبِیْكُمْ فَقُوْلُوْا یٰۤاَبَانَاۤ اِنَّ ابْنَكَ سَرَقَ ۚ— وَمَا شَهِدْنَاۤ اِلَّا بِمَا عَلِمْنَا وَمَا كُنَّا لِلْغَیْبِ حٰفِظِیْنَ ۟

८१. तुम्ही सर्व पित्याच्या सेवेत परत जा आणि सांगा की हे पिता! तुमच्या पुत्राने चोरी केली आणि आम्ही तीच साक्ष दिली, जी आम्ही जाणत होतो. आम्ही काही परोक्ष (गैब) चे रक्षण करणारे तर नव्हतो. info
التفاسير:

external-link copy
82 : 12

وَسْـَٔلِ الْقَرْیَةَ الَّتِیْ كُنَّا فِیْهَا وَالْعِیْرَ الَّتِیْۤ اَقْبَلْنَا فِیْهَا ؕ— وَاِنَّا لَصٰدِقُوْنَ ۟

८२. आणि तुम्ही त्या शहराच्या लोकांना विचारा, जिथे आम्ही होतो आणि त्या प्रवाशांनाही विचारा ज्यांच्यासोबत आम्ही आलो आहोत आणि निःसंशय आम्ही पूर्णपणे सच्चे आहोत. info
التفاسير:

external-link copy
83 : 12

قَالَ بَلْ سَوَّلَتْ لَكُمْ اَنْفُسُكُمْ اَمْرًا ؕ— فَصَبْرٌ جَمِیْلٌ ؕ— عَسَی اللّٰهُ اَنْ یَّاْتِیَنِیْ بِهِمْ جَمِیْعًا ؕ— اِنَّهٗ هُوَ الْعَلِیْمُ الْحَكِیْمُ ۟

८३. (याकूब) म्हणाले, असे नाही, किंबहुना तुम्ही आपल्यातर्फे एक गोष्ट रचून घेतली, तेव्हा आता संयम राखणेच उत्तम आहे. संभवतः सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या सर्वांना माझ्याजवळ पोहचविल. तोच ज्ञानी आणि हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
84 : 12

وَتَوَلّٰی عَنْهُمْ وَقَالَ یٰۤاَسَفٰی عَلٰی یُوْسُفَ وَابْیَضَّتْ عَیْنٰهُ مِنَ الْحُزْنِ فَهُوَ كَظِیْمٌ ۟

८४. आणि मग (याकूबने) त्यांच्याकडून तोंड फिरवून घेतले आणि म्हटले, अरेरे, यूसुफ! त्यांचे डोळे दुःखातिरेकाने पांढरे झाले होते आणि ते या दुःखाला सहन करीत होते. info
التفاسير:

external-link copy
85 : 12

قَالُوْا تَاللّٰهِ تَفْتَؤُا تَذْكُرُ یُوْسُفَ حَتّٰی تَكُوْنَ حَرَضًا اَوْ تَكُوْنَ مِنَ الْهٰلِكِیْنَ ۟

८५. (पुत्र) म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही नेहमी यूसुफच्या आठवणीत भान हरपून राहाल येथेपर्यंत की अगदी गळून जाल किंवा मरण पावाल. info
التفاسير:

external-link copy
86 : 12

قَالَ اِنَّمَاۤ اَشْكُوْا بَثِّیْ وَحُزْنِیْۤ اِلَی اللّٰهِ وَاَعْلَمُ مِنَ اللّٰهِ مَا لَا تَعْلَمُوْنَ ۟

८६. (याकूब) म्हणाले, मी तर आपल्या संकट आणि दुःखाचे गाऱ्हाणे अल्लाहजवळ मांडत आहे. मला अल्लाहतर्फे त्या गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे, ज्यांच्याबाबत तुम्ही अनभिज्ञ आहात. info
التفاسير: