ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
6 : 98

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْ اَهْلِ الْكِتٰبِ وَالْمُشْرِكِیْنَ فِیْ نَارِ جَهَنَّمَ خٰلِدِیْنَ فِیْهَا ؕ— اُولٰٓىِٕكَ هُمْ شَرُّ الْبَرِیَّةِ ۟ؕ

६. निःसंशय, जे लोक ग्रंथधारकांपैकी इन्कारी झाले. आणि अनेकेश्वरवादी, सर्वच्या सर्व जहन्नमच्या आगीत (जातील), ज्यात ते नेहमी (नेहमी) राहतील. हेच लोक सर्वांत वाईट निर्मिती होय. info
التفاسير:

external-link copy
7 : 98

اِنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ ۙ— اُولٰٓىِٕكَ هُمْ خَیْرُ الْبَرِیَّةِ ۟ؕ

७. निःसंशय, ज्या लोकांनी ईमान राखले आणि सत्कर्म केले, तर असे लोक (अल्लाहची) सर्वांत उत्तम निर्मिती होय. info
التفاسير:

external-link copy
8 : 98

جَزَآؤُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ جَنّٰتُ عَدْنٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ خٰلِدِیْنَ فِیْهَاۤ اَبَدًا ؕ— رَضِیَ اللّٰهُ عَنْهُمْ وَرَضُوْا عَنْهُ ؕ— ذٰلِكَ لِمَنْ خَشِیَ رَبَّهٗ ۟۠

८. यांचा मोबदला, त्यांच्या पालनकर्त्याजवळ निरंतर राहणाऱ्या जन्नती आहेत, ज्यांच्या खाली (थंड पाण्याचे) प्रवाह वाहत असतील, ज्यात ते सदैवकाळ राहतील. सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्याशी राजी झाला, आणि हे त्याच्याशी राजी झाले. हे (केवळ अशा माणसाकरिता आहे जो आपल्या पालनकर्त्याचे भय राखतो.१ info

(१) अर्थात हा चांगला मोबदला आणि सुख - संपन्नता त्याच लोकांसाठी आहे जे या जगात अल्लाहचे भय बाळगून राहतात आणि या भयामुळे अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहतात. जर प्रसंगी, मानवी निकडीमुळे अल्लाहची अवज्ञा झाली, तर त्वरित क्षमा याचना (तौबा) करतात आणि पुढे तसा अपराध न करण्याचा दृढसंकल्प करून आपले आचरण सुधारतात. येथपावेतो की त्यांच्या मृत्यु याच आज्ञापालनासह झाला, अवक्षेसह नव्हे. तात्पर्य, जो मनुष्य अल्लाहचे भय राखतो तो अवज्ञा करण्यावर दुराग्रह करीत नाही आणि ना त्यावर अटळ राहतो.

التفاسير: