ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

អាស់ស្ហាំ

external-link copy
1 : 91

وَالشَّمْسِ وَضُحٰىهَا ۟

१. शपथ आहे सूर्याची आणि त्याच्या उन्हाची. info
التفاسير:

external-link copy
2 : 91

وَالْقَمَرِ اِذَا تَلٰىهَا ۟

२. शपथ आहे चंद्राची जेव्हा त्याच्या मागे येईल. info
التفاسير:

external-link copy
3 : 91

وَالنَّهَارِ اِذَا جَلّٰىهَا ۟

३. शपथ आहे दिवसाची जेव्हा सूर्याला प्रकट करील. info
التفاسير:

external-link copy
4 : 91

وَالَّیْلِ اِذَا یَغْشٰىهَا ۟

४. शपथ आहे रात्रीची जेव्हा त्याला झाकून टाकील. info
التفاسير:

external-link copy
5 : 91

وَالسَّمَآءِ وَمَا بَنٰىهَا ۟

५. शपथ आहे आकाशाची आणि त्याला बनविण्याची. info
التفاسير:

external-link copy
6 : 91

وَالْاَرْضِ وَمَا طَحٰىهَا ۟

६. शपथ आहे जमिनीची आणि तिला समतल करण्याची. info
التفاسير:

external-link copy
7 : 91

وَنَفْسٍ وَّمَا سَوّٰىهَا ۟

७. शपथ आहे प्राणा (आत्म्या) ची आणि त्याला योग्य बनविण्याची. info
التفاسير:

external-link copy
8 : 91

فَاَلْهَمَهَا فُجُوْرَهَا وَتَقْوٰىهَا ۟

८. मग समज दिली त्याला दुराचाराची आणि त्यापासून अलिप्त राहण्याची. info
التفاسير:

external-link copy
9 : 91

قَدْ اَفْلَحَ مَنْ زَكّٰىهَا ۟

९. ज्याने या (आत्म्या) ला स्वच्छ शुद्ध केले, तो सफल झाला. info
التفاسير:

external-link copy
10 : 91

وَقَدْ خَابَ مَنْ دَسّٰىهَا ۟ؕ

१०. आणि ज्याने याला मातीत मिळवले तो असफल झाला. info
التفاسير:

external-link copy
11 : 91

كَذَّبَتْ ثَمُوْدُ بِطَغْوٰىهَاۤ ۟

११. समूद जनसमूहाने आपल्या विद्रोहामुळे खोटे ठरविले. info
التفاسير:

external-link copy
12 : 91

اِذِ انْۢبَعَثَ اَشْقٰىهَا ۟

१२. जेव्हा त्यांच्यातला एक मोठा अभागी उठून उभा राहिला. info
التفاسير:

external-link copy
13 : 91

فَقَالَ لَهُمْ رَسُوْلُ اللّٰهِ نَاقَةَ اللّٰهِ وَسُقْیٰهَا ۟ؕ

१३. त्यांना अल्लाहच्या पैगंबराने फर्माविले होते की सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या सांडणीचे आणि तिच्या पिण्याच्या पाळीचे (रक्षण करा). info
التفاسير:

external-link copy
14 : 91

فَكَذَّبُوْهُ فَعَقَرُوْهَا— فَدَمْدَمَ عَلَیْهِمْ رَبُّهُمْ بِذَنْۢبِهِمْ فَسَوّٰىهَا ۟

१४. त्या लोकांनी आपल्या पैगंबरांना खोटे जाणून त्या सांडणीला मारून टाकले. तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांच्या अपराधापायी त्यांना विनाशात टाकले आणि मग विनाशाला सार्वत्रिक केले आणि त्या संपूर्ण वस्तीला भुईसपाट करून टाकले. info
التفاسير:

external-link copy
15 : 91

وَلَا یَخَافُ عُقْبٰهَا ۟۠

१५. तो या प्रकोपाच्या परिणामापासून निर्भय आहे. info
التفاسير: