(१) अर्थात तुमचे काम केवळ ‘इन्ज़ार’ (भय दाखविणे) आहे, परोक्ष (गैब) च्या वार्ता देणे नव्हे, ज्यात कयामतचे ज्ञान आहे जे अल्लाहने कोणालाही दिले नाही. ‘मनयख्शाहा’ अशासाठी म्हटले आहे की तंबी (चेतावणी) आणि धर्म-प्रचाराचा खरा लाभ त्यालाच मिळतो, ज्याच्या मनात अल्लाहचे भय असते, अन्यथा खबरदार करण्याचा आणि संदेश पोहचविण्याचा आदेश तर प्रत्येक माणसाकरिता आहे.