ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

អាត់តះរីម

external-link copy
1 : 66

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ لِمَ تُحَرِّمُ مَاۤ اَحَلَّ اللّٰهُ لَكَ ۚ— تَبْتَغِیْ مَرْضَاتَ اَزْوَاجِكَ ؕ— وَاللّٰهُ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

१. हे पैगंबर! ज्या गोष्टीला अल्लाहने तुमच्यासाठी हलाल (वैध) केले आहे, तिला तुम्ही हराम (अवैध) का ठरविता? (काय) तुम्ही आपल्या पत्नींची प्रसन्नता प्राप्त करू इच्छिता, आणि अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा दयाळू आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 66

قَدْ فَرَضَ اللّٰهُ لَكُمْ تَحِلَّةَ اَیْمَانِكُمْ ۚ— وَاللّٰهُ مَوْلٰىكُمْ ۚ— وَهُوَ الْعَلِیْمُ الْحَكِیْمُ ۟

२. निःसंशय, अल्लाहने तुमच्यासाठी (अशा) शपथांमधून बाहेर पडण्याचा मार्ग निर्धारित केला आहे, आणि अल्लाह तुमचा कार्यसाधक (मित्र) आहे आणि तोच (पूर्ण) ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
3 : 66

وَاِذْ اَسَرَّ النَّبِیُّ اِلٰی بَعْضِ اَزْوَاجِهٖ حَدِیْثًا ۚ— فَلَمَّا نَبَّاَتْ بِهٖ وَاَظْهَرَهُ اللّٰهُ عَلَیْهِ عَرَّفَ بَعْضَهٗ وَاَعْرَضَ عَنْ بَعْضٍ ۚ— فَلَمَّا نَبَّاَهَا بِهٖ قَالَتْ مَنْ اَنْۢبَاَكَ هٰذَا ؕ— قَالَ نَبَّاَنِیَ الْعَلِیْمُ الْخَبِیْرُ ۟

३. आणि (स्मरण करा) जेव्हा पैगंबरांनी आपल्या काही पत्नींना गोपनीयतेत एक गोष्ट सांगितली तर जेव्हा तिने त्या गोष्टीची वाच्यता केली, आणि अल्लाहने आपल्या पैगंबराला त्याबाबत अवगत केले, तेव्हा पैगंबरांनी काही गोष्ट तर सांगितली आणि काही सांगायचे टाळले, मग जेव्हा पैगंबरानी आपल्या त्या पत्नीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली, याची खबर तुम्हाला कोणी दिली? सांगितले, सर्व काही जाणणाऱ्या, पूर्ण खबर राखणाऱ्या अल्लाहने मला याची खबर दिली आहे. info
التفاسير:

external-link copy
4 : 66

اِنْ تَتُوْبَاۤ اِلَی اللّٰهِ فَقَدْ صَغَتْ قُلُوْبُكُمَا ۚ— وَاِنْ تَظٰهَرَا عَلَیْهِ فَاِنَّ اللّٰهَ هُوَ مَوْلٰىهُ وَجِبْرِیْلُ وَصَالِحُ الْمُؤْمِنِیْنَ ۚ— وَالْمَلٰٓىِٕكَةُ بَعْدَ ذٰلِكَ ظَهِیْرٌ ۟

४. (हे पैगंबराच्या दोन्ही पत्नींनो!) जर तुम्ही अल्लाहकडे माफी मागाल (तर फार चांगले आहे). निःसंशय, तुमची हृदये झुकली आहेत आणि जर तुम्ही पैगंबराच्या विरोधात एकमेकांची मदत कराल तर निःसंशय, त्यांचा मित्र संरक्षक अल्लाह आहे आणि जिब्रील नेक ईमान राखणारे आणि त्याच्याखेरीज फरिश्तेही मदत करणारे आहेत. info
التفاسير:

external-link copy
5 : 66

عَسٰی رَبُّهٗۤ اِنْ طَلَّقَكُنَّ اَنْ یُّبْدِلَهٗۤ اَزْوَاجًا خَیْرًا مِّنْكُنَّ مُسْلِمٰتٍ مُّؤْمِنٰتٍ قٰنِتٰتٍ تٰٓىِٕبٰتٍ عٰبِدٰتٍ سٰٓىِٕحٰتٍ ثَیِّبٰتٍ وَّاَبْكَارًا ۟

५. जर तो (रसूल) तुम्हाला तलाक देऊन टाकील तर लवकरच त्यांना, त्यांचा पालनकर्ता (अल्लाह) तुमच्याऐवजी तुमच्यापेक्षा चांगल्या पत्न्या प्रदान करील, ज्या इस्लाम (धर्म) बाळगणाऱ्या, ईमान राखणाऱ्या, अल्लाहसमोर झुकणाऱ्या, माफी मागणाऱ्या, उपासना करणाऱ्या, रोजे (व्रत) राखणाऱ्या असतील विधवा आणि कुमारिका. info
التفاسير:

external-link copy
6 : 66

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا قُوْۤا اَنْفُسَكُمْ وَاَهْلِیْكُمْ نَارًا وَّقُوْدُهَا النَّاسُ وَالْحِجَارَةُ عَلَیْهَا مَلٰٓىِٕكَةٌ غِلَاظٌ شِدَادٌ لَّا یَعْصُوْنَ اللّٰهَ مَاۤ اَمَرَهُمْ وَیَفْعَلُوْنَ مَا یُؤْمَرُوْنَ ۟

६. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्ही स्वतः आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना त्या आगीपासून वाचवा,१ जिचे इंधन मानव आणि दगड आहेत, जिच्यावर कठोर हृदयाचे सक्त फरिश्ते तैनात आहेत. ज्यांना अल्लाह जो आदेश देतो, त्याची ते अवज्ञा करीत नाहीत, किंबहुना जो काही आदेश दिला जातो त्याचे पालन करतात. info

(१) यात ईमान राखणाऱ्यांना त्याच्या एका फार मोठ्या जबाबदारीची जाणीव दिली गेली आहे आणि ती ही की आपल्यासह आपल्या कुटुंबियांचा सुधार आणि त्यांच्या इस्लामी शिक्षणाची व्यवस्था करावी, यासाठी की या सर्वांनी जहन्नमचे इंधन होण्यापासून वाचावे. यास्तव पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले की जेव्हा मूल सात वर्षांचे होईल त्याला नमाज पढण्याचा आदेश द्या, दहा वर्षांचा झाल्यावर नमाजबाबत सुस्ती करताना पाहाल तर त्यांना मार द्या. (अबू दाऊद, तिर्मिजी किताबुल सलात) धर्मज्ञानी लोकांनी सांगितले आहे की याच प्रकारे त्यांना रोजे (व्रत) राखण्यासही प्रवृत्त करावे आणि इतर धार्मिक आदेशांचे पालन करण्याची ताकीद द्यावी यासाठी की जेव्हा ते सूज्ञतेच्या वयास पोहचतील तेव्हा त्यांच्यात धार्मिक सूज्ञताही भिनलेली असेल. (इब्ने कसीर)

التفاسير:

external-link copy
7 : 66

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ كَفَرُوْا لَا تَعْتَذِرُوا الْیَوْمَ ؕ— اِنَّمَا تُجْزَوْنَ مَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ۟۠

७. हे इन्कारी लोकांनो! आज तुम्ही (विवशता आणि) बहाणा दाखवू नका, तुम्हाला केवळ तुमच्या दुष्कर्मांचे प्रतिफळ दिले जात आहे. info
التفاسير: