ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
9 : 62

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِذَا نُوْدِیَ لِلصَّلٰوةِ مِنْ یَّوْمِ الْجُمُعَةِ فَاسْعَوْا اِلٰی ذِكْرِ اللّٰهِ وَذَرُوا الْبَیْعَ ؕ— ذٰلِكُمْ خَیْرٌ لَّكُمْ اِنْ كُنْتُمْ تَعْلَمُوْنَ ۟

९. हे ईमान राखणाऱ्या लोकांनो! जुमअः (शुक्रवार) च्या दिवशी नमाजसाठी अजान दिली गेली असता तुम्ही अल्लाहच्या स्मरणाकडे त्वरित येत जा आणि खरेदी - विक्री सोडून द्या हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे, जर तुम्ही जाणत असाल. info
التفاسير:

external-link copy
10 : 62

فَاِذَا قُضِیَتِ الصَّلٰوةُ فَانْتَشِرُوْا فِی الْاَرْضِ وَابْتَغُوْا مِنْ فَضْلِ اللّٰهِ وَاذْكُرُوا اللّٰهَ كَثِیْرًا لَّعَلَّكُمْ تُفْلِحُوْنَ ۟

१०. मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा धरतीवर (इतस्ततः) पसरा आणि अल्लाहची कृपा शोधा आणि अल्लाहचे अत्याधिक स्मरण करा, यासाठी की तुम्ही सफलता प्राप्त करून घ्यावी. info
التفاسير:

external-link copy
11 : 62

وَاِذَا رَاَوْا تِجَارَةً اَوْ لَهْوَا ١نْفَضُّوْۤا اِلَیْهَا وَتَرَكُوْكَ قَآىِٕمًا ؕ— قُلْ مَا عِنْدَ اللّٰهِ خَیْرٌ مِّنَ اللَّهْوِ وَمِنَ التِّجَارَةِ ؕ— وَاللّٰهُ خَیْرُ الرّٰزِقِیْنَ ۟۠

११. आणि जेव्हा एखादा सौदा विकताना पाहतात किंवा एखादा तमाशा दृष्टीस पडला असता त्याकडे धावतात आणि तुम्हाला उभेच सोडून देतात. (तुम्ही) सांगा की अल्लाहजवळ जे काही आहे ते खेळ आणि व्यापारापेक्षा अधिक चांगले आहे आणि अल्लाह सर्वांत चांगला रोजी देणारा (अन्नदाता) आहे. info
التفاسير: