ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
82 : 6

اَلَّذِیْنَ اٰمَنُوْا وَلَمْ یَلْبِسُوْۤا اِیْمَانَهُمْ بِظُلْمٍ اُولٰٓىِٕكَ لَهُمُ الْاَمْنُ وَهُمْ مُّهْتَدُوْنَ ۟۠

८२. ज्या लोकांनी ईमान राखले आणि आपल्या ईमानात कसल्याही प्रकारच्या शिर्कचे मिश्रण केले नाही, त्यांच्याचसाठी शांती आहे आणि तेच सरळ मार्गावर आहेत. info
التفاسير:

external-link copy
83 : 6

وَتِلْكَ حُجَّتُنَاۤ اٰتَیْنٰهَاۤ اِبْرٰهِیْمَ عَلٰی قَوْمِهٖ ؕ— نَرْفَعُ دَرَجٰتٍ مَّنْ نَّشَآءُ ؕ— اِنَّ رَبَّكَ حَكِیْمٌ عَلِیْمٌ ۟

८३ . आणि हे आमचे प्रमाण आहे जे आम्ही इब्राहिमला त्यााच्या जनसमूहाच्या मुकाबल्यात दिले . आम्ही ज्याला इच्छितो त्याचे दर्जे बुलंद (उंचवितो ) निःशंय तुमचा पालनकर्ता हिकमतशाली सर्वज्ञ आहे info
التفاسير:

external-link copy
84 : 6

وَوَهَبْنَا لَهٗۤ اِسْحٰقَ وَیَعْقُوْبَ ؕ— كُلًّا هَدَیْنَا ۚ— وَنُوْحًا هَدَیْنَا مِنْ قَبْلُ وَمِنْ ذُرِّیَّتِهٖ دَاوٗدَ وَسُلَیْمٰنَ وَاَیُّوْبَ وَیُوْسُفَ وَمُوْسٰی وَهٰرُوْنَ ؕ— وَكَذٰلِكَ نَجْزِی الْمُحْسِنِیْنَ ۟ۙ

८४. आणि आम्ही त्यांना इसहाक आणि याकूब प्रदान केले आणि प्रत्येकाला सरळ मार्ग दाखविला आणि यापूर्वी नूहला मार्ग दाखविला आणि संततीत दाऊद आणि सुलेमान आणि अय्यूब आणि यूसुफ आणि मूसा व हारून यांना आणि अशा प्रकारे आम्ही नेकी (सत्कर्म) करणाऱ्या लोकांना मोबदला प्रदान करतो. info
التفاسير:

external-link copy
85 : 6

وَزَكَرِیَّا وَیَحْیٰی وَعِیْسٰی وَاِلْیَاسَ ؕ— كُلٌّ مِّنَ الصّٰلِحِیْنَ ۟ۙ

८५. आणि जकरिया आणि यह्या आणि ईसा आणि इलियास यांना, हे सर्व नेक सदाचारी लोकांपैकी होते. info
التفاسير:

external-link copy
86 : 6

وَاِسْمٰعِیْلَ وَالْیَسَعَ وَیُوْنُسَ وَلُوْطًا ؕ— وَكُلًّا فَضَّلْنَا عَلَی الْعٰلَمِیْنَ ۟ۙ

८६. आणि इस्माईल आणि यसअ आणि यूनुस आणि लूत यांना, या सर्वांना आम्ही या जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली. info
التفاسير:

external-link copy
87 : 6

وَمِنْ اٰبَآىِٕهِمْ وَذُرِّیّٰتِهِمْ وَاِخْوَانِهِمْ ۚ— وَاجْتَبَیْنٰهُمْ وَهَدَیْنٰهُمْ اِلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟

८७. आणि त्यांच्या वाडवडील, संतती आणि भावांमधून आणि आम्ही त्यांची निवड केली आणि त्यांना सरळ मार्ग दाखविला. info
التفاسير:

external-link copy
88 : 6

ذٰلِكَ هُدَی اللّٰهِ یَهْدِیْ بِهٖ مَنْ یَّشَآءُ مِنْ عِبَادِهٖ ؕ— وَلَوْ اَشْرَكُوْا لَحَبِطَ عَنْهُمْ مَّا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

८८. हाच अल्लाहचा मार्ग आहे आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो, त्याला मार्ग दाखवितो आणि जर त्या लोकांनीही अल्लाहसोबत दुसऱ्यांना सहभागी केले असते तर त्यांचे कर्म वाया गेले असते. info
التفاسير:

external-link copy
89 : 6

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ اٰتَیْنٰهُمُ الْكِتٰبَ وَالْحُكْمَ وَالنُّبُوَّةَ ۚ— فَاِنْ یَّكْفُرْ بِهَا هٰۤؤُلَآءِ فَقَدْ وَكَّلْنَا بِهَا قَوْمًا لَّیْسُوْا بِهَا بِكٰفِرِیْنَ ۟

८९. यांनाच आम्ही ग्रंथ आणि हिकमत आणि नुबूवत (पैगंबरी) प्रदान केली आणि जर या लोकांनी यास मानले नाही, तर आम्ही अशा लोकांना तयार करून ठेवले आहे, जे याचा इन्कार करणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
90 : 6

اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ هَدَی اللّٰهُ فَبِهُدٰىهُمُ اقْتَدِهْ ؕ— قُلْ لَّاۤ اَسْـَٔلُكُمْ عَلَیْهِ اَجْرًا ؕ— اِنْ هُوَ اِلَّا ذِكْرٰی لِلْعٰلَمِیْنَ ۟۠

९०. हेच ते लोक होते, ज्यांना अल्लाहने उचित मार्ग दाखविला, यास्तव तुम्ही त्यांच्या मार्गाचे अनुसरण करा. तुम्ही सांगा की मी याबद्दल कसलाही मोबदला मागत नाही. समस्त जगातील लोकांकरिता ही केवळ स्मरणिका आहे. info
التفاسير: