ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
27 : 53

اِنَّ الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ لَیُسَمُّوْنَ الْمَلٰٓىِٕكَةَ تَسْمِیَةَ الْاُ ۟

२७. निःसंशय, जे लोक आखिरतवर ईमान राखत नाही, ते फरिश्त्यांना स्त्रीरूपी देवतांची नावे देतात. info
التفاسير:

external-link copy
28 : 53

وَمَا لَهُمْ بِهٖ مِنْ عِلْمٍ ؕ— اِنْ یَّتَّبِعُوْنَ اِلَّا الظَّنَّ ۚ— وَاِنَّ الظَّنَّ لَا یُغْنِیْ مِنَ الْحَقِّ شَیْـًٔا ۟ۚ

२८. वास्तविक त्यांना याचे काहीच ज्ञान नाही. ते केवळ आपल्या भ्रमाच्या मागे लागले आहेत आणि निःसंशय, भ्रम (आणि अनुमान) सत्यासमोर काहीच उपयोगी पडत नाही. info
التفاسير:

external-link copy
29 : 53

فَاَعْرِضْ عَنْ مَّنْ تَوَلّٰی ۙ۬— عَنْ ذِكْرِنَا وَلَمْ یُرِدْ اِلَّا الْحَیٰوةَ الدُّنْیَا ۟ؕ

२९. तेव्हा तुम्ही त्याच्याकडून तोंड फिरवून घ्या, जो आमच्या स्मरणांपासून तोंड फिरविल आणि ज्यांचा उद्देश केवळ ऐहिक जीवनाखेरीज काही नसावा. info
التفاسير:

external-link copy
30 : 53

ذٰلِكَ مَبْلَغُهُمْ مِّنَ الْعِلْمِ ؕ— اِنَّ رَبَّكَ هُوَ اَعْلَمُ بِمَنْ ضَلَّ عَنْ سَبِیْلِهٖ وَهُوَ اَعْلَمُ بِمَنِ اهْتَدٰی ۟

३०. हीच त्यांच्या ज्ञानाची सीमा आहे. तुमचा पालनकर्ता त्याला चांगल्या प्रकारे जाणतो, जो त्याच्या मार्गापासून विचलित झाला आहे आणि तोच चांगल्या प्रकारे जाणतो त्याला देखील, जो सन्मार्गावर आहे. info
التفاسير:

external-link copy
31 : 53

وَلِلّٰهِ مَا فِی السَّمٰوٰتِ وَمَا فِی الْاَرْضِ ۙ— لِیَجْزِیَ الَّذِیْنَ اَسَآءُوْا بِمَا عَمِلُوْا وَیَجْزِیَ الَّذِیْنَ اَحْسَنُوْا بِالْحُسْنٰی ۟ۚ

३१. आणि अल्लाहचेच आहे, जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही धरतीत आहे, यासाठी की त्याने (अल्लाहने) दुष्कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्मांचा मोबदला द्यावा आणि सत्कर्म करणाऱ्या लोकांना चांगला मोबदला द्यावा. info
التفاسير:

external-link copy
32 : 53

اَلَّذِیْنَ یَجْتَنِبُوْنَ كَبٰٓىِٕرَ الْاِثْمِ وَالْفَوَاحِشَ اِلَّا اللَّمَمَ ؕ— اِنَّ رَبَّكَ وَاسِعُ الْمَغْفِرَةِ ؕ— هُوَ اَعْلَمُ بِكُمْ اِذْ اَنْشَاَكُمْ مِّنَ الْاَرْضِ وَاِذْ اَنْتُمْ اَجِنَّةٌ فِیْ بُطُوْنِ اُمَّهٰتِكُمْ ۚ— فَلَا تُزَكُّوْۤا اَنْفُسَكُمْ ؕ— هُوَ اَعْلَمُ بِمَنِ اتَّقٰی ۟۠

३२. जे लोक मोठमोठे अपराध आणि उघड निर्लज्जतेच्या कृत्यांपासून दूर राहतात, याखेरीज की काही लहान सहान अपराध त्यांच्याकडून घडतात, निःसंशय, (अशा लोकांसाठी) तुमच्या पालनकर्त्याची क्षमाशीलता अति विशाल आहे. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो, जेव्हा त्याने तुम्हाला जमिनीतून निर्माण केले आणि जेव्हा तुम्ही आपल्या मातांच्या गर्भात मूल (अर्भक) होते तेव्हा तुम्ही आपले पावित्र्य स्वतः सांगू नका. तोच नेक - सदाचारी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
33 : 53

اَفَرَءَیْتَ الَّذِیْ تَوَلّٰی ۟ۙ

३३. काय तुम्ही त्याला पाहिले, ज्याने तोंड फिरवून घेतले, info
التفاسير:

external-link copy
34 : 53

وَاَعْطٰی قَلِیْلًا وَّاَكْدٰی ۟

३४. आणि फार कमी दिले आणि हात रोखला. info
التفاسير:

external-link copy
35 : 53

اَعِنْدَهٗ عِلْمُ الْغَیْبِ فَهُوَ یَرٰی ۟

३५. काय त्याला परोक्ष ज्ञान आहे की तो (सर्व काही) पाहत आहे? info
التفاسير:

external-link copy
36 : 53

اَمْ لَمْ یُنَبَّاْ بِمَا فِیْ صُحُفِ مُوْسٰی ۟ۙ

३६. काय त्याला त्या गोष्टीची खबर नाही दिली गेली, जी मूसा (अलै.) च्या ग्रंथात होती. info
التفاسير:

external-link copy
37 : 53

وَاِبْرٰهِیْمَ الَّذِیْ وَ ۟ۙ

३७. आणि एकनिष्ठ इब्राहीम (अलै.) च्या ग्रंथात होती. info
التفاسير:

external-link copy
38 : 53

اَلَّا تَزِرُ وَازِرَةٌ وِّزْرَ اُخْرٰی ۟ۙ

३८. की कोणताही मनुष्य दुसऱ्या कोणाचेही ओझे उचलणार नाही. info
التفاسير:

external-link copy
39 : 53

وَاَنْ لَّیْسَ لِلْاِنْسَانِ اِلَّا مَا سَعٰی ۟ۙ

३९. आणि हे की प्रत्येक माणसाकरिता केवळ तेच आहे, ज्याचा त्याने स्वतः प्रयत्न केला. info
التفاسير:

external-link copy
40 : 53

وَاَنَّ سَعْیَهٗ سَوْفَ یُرٰی ۟

४०. आणि हे की निःसंशय, त्याचा प्रयत्न लवकरच पाहिला जाईल. info
التفاسير:

external-link copy
41 : 53

ثُمَّ یُجْزٰىهُ الْجَزَآءَ الْاَوْفٰی ۟ۙ

४१. मग त्याला पुरेपूर मोबदला दिला जाईल. info
التفاسير:

external-link copy
42 : 53

وَاَنَّ اِلٰی رَبِّكَ الْمُنْتَهٰی ۟ۙ

४२. आणि हे की तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) कडेच पोहचायचे आहे. info
التفاسير:

external-link copy
43 : 53

وَاَنَّهٗ هُوَ اَضْحَكَ وَاَبْكٰی ۟ۙ

४३. आणि हे की तोच हसवितो आणि तोच रडवितो. info
التفاسير:

external-link copy
44 : 53

وَاَنَّهٗ هُوَ اَمَاتَ وَاَحْیَا ۟ۙ

४४. आणि हे की तोच मारतो आणि तोच जिवंत करतो. info
التفاسير: