ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
14 : 45

قُلْ لِّلَّذِیْنَ اٰمَنُوْا یَغْفِرُوْا لِلَّذِیْنَ لَا یَرْجُوْنَ اَیَّامَ اللّٰهِ لِیَجْزِیَ قَوْمًا بِمَا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟

१४. तुम्ही ईमान राखणाऱ्यांना सांगा की त्यांनी अशा लोकांना माफ करत राहावे, जे अल्लाहच्या दिवसांची आशा बाळगत नाही, यासाठी की सर्वश्रेष्ठ अल्लाहने एका जनमसूहाच्या लोकांना त्यांच्या दुष्कृत्यांचा मोबदला द्यावा. info
التفاسير:

external-link copy
15 : 45

مَنْ عَمِلَ صَالِحًا فَلِنَفْسِهٖ ۚ— وَمَنْ اَسَآءَ فَعَلَیْهَا ؗ— ثُمَّ اِلٰی رَبِّكُمْ تُرْجَعُوْنَ ۟

१५. जो कोणी सत्कर्म करील तो आपल्या स्वतःच्या भल्याकरिता आणि जो दुष्कर्म करील, त्याची दुष्परिणती त्याच्यावरच आहे. मग तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे परतविले जाल. info
التفاسير:

external-link copy
16 : 45

وَلَقَدْ اٰتَیْنَا بَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ الْكِتٰبَ وَالْحُكْمَ وَالنُّبُوَّةَ وَرَزَقْنٰهُمْ مِّنَ الطَّیِّبٰتِ وَفَضَّلْنٰهُمْ عَلَی الْعٰلَمِیْنَ ۟ۚ

१६. आणि निःसंशय, आम्ही इस्राईलच्या संततीला ग्रंथ, राज्यसत्ता आणि पैगंबरपद प्रदान केले होते, आणि आम्ही त्यांना पाक (स्वच्छ - शुद्ध) व चांगली रोजी (आजिविका) प्रदान केली होती, आणि त्यांना जगातील लोकांवर श्रेष्ठता प्रदान केली होती. info
التفاسير:

external-link copy
17 : 45

وَاٰتَیْنٰهُمْ بَیِّنٰتٍ مِّنَ الْاَمْرِ ۚ— فَمَا اخْتَلَفُوْۤا اِلَّا مِنْ بَعْدِ مَا جَآءَهُمُ الْعِلْمُ ۙ— بَغْیًا بَیْنَهُمْ ؕ— اِنَّ رَبَّكَ یَقْضِیْ بَیْنَهُمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ فِیْمَا كَانُوْا فِیْهِ یَخْتَلِفُوْنَ ۟

१७. आणि आम्ही त्यांना धर्माच्या स्पष्ट निशाण्या प्रदान केल्या, मग त्यांनी आपल्याजवळ ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर आपसातील द्वेष-विवादापायी मतभेद केला. हे ज्या ज्या गोष्टीत मतभेद करीत आहेत त्यांचा फैसला कयामतच्या दिवशी त्यांच्या दरम्यान तुमचा पालनकर्ता स्वतः करील. info
التفاسير:

external-link copy
18 : 45

ثُمَّ جَعَلْنٰكَ عَلٰی شَرِیْعَةٍ مِّنَ الْاَمْرِ فَاتَّبِعْهَا وَلَا تَتَّبِعْ اَهْوَآءَ الَّذِیْنَ لَا یَعْلَمُوْنَ ۟

१८. मग आम्ही तुम्हाला धर्माच्या (स्पष्ट) मार्गावर कायम केले. तेव्हा तुम्ही त्याच मार्गाचे अनुसरण करीत राहा आणि नादान अडाणी लोकांच्या इच्छा आकांक्षांचे अनुसरण करू नका. info
التفاسير:

external-link copy
19 : 45

اِنَّهُمْ لَنْ یُّغْنُوْا عَنْكَ مِنَ اللّٰهِ شَیْـًٔا ؕ— وَاِنَّ الظّٰلِمِیْنَ بَعْضُهُمْ اَوْلِیَآءُ بَعْضٍ ۚ— وَاللّٰهُ وَلِیُّ الْمُتَّقِیْنَ ۟

१९. (लक्षात ठेवा) की हे लोक कधीही अल्लाहसमोर तुमच्या काहीच कामी येऊ शकत नाही (जाणून घ्या की) अत्याचारी लोक आपसात एकमेकांचे मित्र असतात आणि अल्लाहचे भय राखणाऱ्यांचा सखा - सोबती, महान अल्लाह आहे. info
التفاسير:

external-link copy
20 : 45

هٰذَا بَصَآىِٕرُ لِلنَّاسِ وَهُدًی وَّرَحْمَةٌ لِّقَوْمٍ یُّوْقِنُوْنَ ۟

२०. हा कुरआन लोकांकरिता अंतर्दृष्टीच्या गोष्टी आणि मार्गदर्शन व दया आहे, त्या लोकांकरिता जे विश्वास राखतात. info
التفاسير:

external-link copy
21 : 45

اَمْ حَسِبَ الَّذِیْنَ اجْتَرَحُوا السَّیِّاٰتِ اَنْ نَّجْعَلَهُمْ كَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ ۙ— سَوَآءً مَّحْیَاهُمْ وَمَمَاتُهُمْ ؕ— سَآءَ مَا یَحْكُمُوْنَ ۟۠

२१. काय त्या लोकांनी, जे वाईट कर्म करतात, असे समजून घेतले आहे की आम्ही त्यांना त्या लोकांसारखे ठरवू, ज्यांनी ईमान राखले आणि सत्कर्म करीत राहिले की त्यांचे जगणे-मरणे एकसमान व्हावे. मोठा वाईट फैसला आहे, जो ते करीत आहेत. info
التفاسير:

external-link copy
22 : 45

وَخَلَقَ اللّٰهُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ بِالْحَقِّ وَلِتُجْزٰی كُلُّ نَفْسٍ بِمَا كَسَبَتْ وَهُمْ لَا یُظْلَمُوْنَ ۟

२२. आणि आकाशांना व धरतीला अल्लाहने अतिशय न्यायासह निर्माण केले आहे आणि यासाठी की प्रत्येक माणसाला त्याच्या कृत-कर्माचा पुरेपूर मोबदला दिला जावा आणि त्यांच्यावर जुलूम केला जाणार नाही. info
التفاسير: