ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
39 : 41

وَمِنْ اٰیٰتِهٖۤ اَنَّكَ تَرَی الْاَرْضَ خَاشِعَةً فَاِذَاۤ اَنْزَلْنَا عَلَیْهَا الْمَآءَ اهْتَزَّتْ وَرَبَتْ ؕ— اِنَّ الَّذِیْۤ اَحْیَاهَا لَمُحْیِ الْمَوْتٰی ؕ— اِنَّهٗ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

३९. आणि त्या (अल्लाह) च्या निशाण्यांपैकी (हेही) आहे की तुम्ही जमिनीला दाबली गेलेली (कोरडी पडलेली) पाहता, मग जेव्हा आम्ही तिच्यावर पर्जन्यवृष्टी करतो, तेव्हा ती हिरवी टवटवीत होऊन वाढीस लागते, ज्याने तिला जिवंत केले तोच खात्रीने मृतांनाही जिवंत करणारा आहे. निःसंशय तो प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे. info
التفاسير:

external-link copy
40 : 41

اِنَّ الَّذِیْنَ یُلْحِدُوْنَ فِیْۤ اٰیٰتِنَا لَا یَخْفَوْنَ عَلَیْنَا ؕ— اَفَمَنْ یُّلْقٰی فِی النَّارِ خَیْرٌ اَمْ مَّنْ یَّاْتِیْۤ اٰمِنًا یَّوْمَ الْقِیٰمَةِ ؕ— اِعْمَلُوْا مَا شِئْتُمْ ۙ— اِنَّهٗ بِمَا تَعْمَلُوْنَ بَصِیْرٌ ۟

४०. निःसंशय, जे लोक आमच्या आयतींमध्ये वाकडेपणा आणतात ते (काही) आमच्यापासून लपलेले नाहीत. (जरा सांगा) जो आगीत टाकला जावा, तो चांगला आहे किंवा तो, जो शांतिपूर्वक कयामतच्या दिवशी यावा. तुम्ही वाटेल ते करीत राहा. तो तुमचे सर्व केले करविले पाहात आहे. info
التفاسير:

external-link copy
41 : 41

اِنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا بِالذِّكْرِ لَمَّا جَآءَهُمْ ۚ— وَاِنَّهٗ لَكِتٰبٌ عَزِیْزٌ ۟ۙ

४१. ज्या लोकांनी आपल्याजवळ कुरआन पोहोचल्यानंतरही त्याचा इन्कार केला (तेदेखील) आमच्यापासून लपलेले नाहीत निःसंशय, हा मोठा भव्य-दिव्य (सन्मानपूर्ण) ग्रंथ आहे. info
التفاسير:

external-link copy
42 : 41

لَّا یَاْتِیْهِ الْبَاطِلُ مِنْ بَیْنِ یَدَیْهِ وَلَا مِنْ خَلْفِهٖ ؕ— تَنْزِیْلٌ مِّنْ حَكِیْمٍ حَمِیْدٍ ۟

४२. असत्य, त्याच्या जवळूनही जाऊ शकत नाही, ना त्याच्यापुढून, आणि ना त्याच्या मागून हा (ग्रंथ) त्या (अल्लाह) कडून अवतरित केला गेला आहे, जो मोठा हिकमतशाली आणि गुणसंपन्न आहे. info
التفاسير:

external-link copy
43 : 41

مَا یُقَالُ لَكَ اِلَّا مَا قَدْ قِیْلَ لِلرُّسُلِ مِنْ قَبْلِكَ ؕ— اِنَّ رَبَّكَ لَذُوْ مَغْفِرَةٍ وَّذُوْ عِقَابٍ اَلِیْمٍ ۟

४३. (हे पैगंबर!) तुम्हालाही तेच सांगितले जात आहे, जे तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांनाही सांगितले गेले आहे. निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि दुःखदायक शिक्षा - यातना देणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
44 : 41

وَلَوْ جَعَلْنٰهُ قُرْاٰنًا اَعْجَمِیًّا لَّقَالُوْا لَوْلَا فُصِّلَتْ اٰیٰتُهٗ ؕ— ءَاَؔعْجَمِیٌّ وَّعَرَبِیٌّ ؕ— قُلْ هُوَ لِلَّذِیْنَ اٰمَنُوْا هُدًی وَّشِفَآءٌ ؕ— وَالَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ فِیْۤ اٰذَانِهِمْ وَقْرٌ وَّهُوَ عَلَیْهِمْ عَمًی ؕ— اُولٰٓىِٕكَ یُنَادَوْنَ مِنْ مَّكَانٍ بَعِیْدٍ ۟۠

४४. आणि जर आम्ही त्याला अरबीऐवजी दुसऱ्या भाषेचा कुरआन बनविले असते, तर म्हणाले असते की याच्या आयती (वचने) स्पष्टपणे का नाही सांगितली गेलीत? हे काय की ग्रंथ अरबीऐवजी दुसऱ्या भाषेत आणि तुम्ही अरबी रसूल? (तुम्ही) सांगा की हा (ग्रंथ) ईमान राखणाऱ्यांकरिता मार्गदर्शन व रोगमुक्ती आहे आणि जे ईमान राखत नाहीत तर त्यांच्या कानांमध्ये बधीरता आहे आणि हा त्यांच्यासाठी अंधत्व आहे. हे असे लोक आहेत, ज्यांना दूरच्या ठिकाणापासून पुकारले जात आहे. info
التفاسير:

external-link copy
45 : 41

وَلَقَدْ اٰتَیْنَا مُوْسَی الْكِتٰبَ فَاخْتُلِفَ فِیْهِ ؕ— وَلَوْلَا كَلِمَةٌ سَبَقَتْ مِنْ رَّبِّكَ لَقُضِیَ بَیْنَهُمْ وَاِنَّهُمْ لَفِیْ شَكٍّ مِّنْهُ مُرِیْبٍ ۟

४५. आणि निःसंशय, आम्ही मूसा (अलै.) ला ग्रंथ प्रदान केला होता तेव्हा त्याच्यातही मतभेद केला गेला आणि जर ती गोष्ट नसती जी तुमच्या पालनकर्त्यातर्फे या आधीच निश्चित झालेली आहे, तर त्यांच्या दरम्यान (केव्हाच) फैसला झाला असता. हे लोक तर त्याच्याविषयी सक्त बेचैन करणाऱ्या संशयात आहेत. info
التفاسير:

external-link copy
46 : 41

مَنْ عَمِلَ صَالِحًا فَلِنَفْسِهٖ ۚ— وَمَنْ اَسَآءَ فَعَلَیْهَا ؕ— وَمَا رَبُّكَ بِظَلَّامٍ لِّلْعَبِیْدِ ۟

४६. जो मनुष्य सत्कर्म करेल, ते तो आपल्या फायद्याकरिता आणि जो दुष्कर्म करेल तर त्या (पापा) चे ओझे त्याच्यावरच आहे आणि तुमचा पालनकर्ता दासांवर अत्याचार करणारा नाही. info
التفاسير: