ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
78 : 40

وَلَقَدْ اَرْسَلْنَا رُسُلًا مِّنْ قَبْلِكَ مِنْهُمْ مَّنْ قَصَصْنَا عَلَیْكَ وَمِنْهُمْ مَّنْ لَّمْ نَقْصُصْ عَلَیْكَ ؕ— وَمَا كَانَ لِرَسُوْلٍ اَنْ یَّاْتِیَ بِاٰیَةٍ اِلَّا بِاِذْنِ اللّٰهِ ۚ— فَاِذَا جَآءَ اَمْرُ اللّٰهِ قُضِیَ بِالْحَقِّ وَخَسِرَ هُنَالِكَ الْمُبْطِلُوْنَ ۟۠

७८. निःसंशय, आम्ही तुमच्या पूर्वीही अनेक रसूल (पैगंबर) पाठविले आहेत, ज्यांच्यापैकी काहींचे वृत्तांत आम्ही तुम्हाला ऐकविले आहेत. आणि त्यांच्यापैकी काहींचे वृत्तांत आम्ही तुम्हाला ऐकविले नाहीत आणि कोणा पैगंबराच्या (अवाक्यात हे) नव्हते की एखादा चमत्कार (मोजिजा) अल्लाहच्या अनुमतीविना आणू शकला असता, मग ज्या वेळी अल्लाहचा आदेश येईल, सत्यासह फैसला केला जाईल आणि त्या वेळी असत्याचे पुजारी नुकसानातच राहतील. info
التفاسير:

external-link copy
79 : 40

اَللّٰهُ الَّذِیْ جَعَلَ لَكُمُ الْاَنْعَامَ لِتَرْكَبُوْا مِنْهَا وَمِنْهَا تَاْكُلُوْنَ ۟ؗ

७९. अल्लाह तो आहे ज्याने तुमच्यासाठी चतुष्पाद जनावरे (गुरे) निर्माण केलीत, ज्यांच्यापैकी काहींवर तुम्ही स्वार होता आणि काहींना तुम्ही खातात. info
التفاسير:

external-link copy
80 : 40

وَلَكُمْ فِیْهَا مَنَافِعُ وَلِتَبْلُغُوْا عَلَیْهَا حَاجَةً فِیْ صُدُوْرِكُمْ وَعَلَیْهَا وَعَلَی الْفُلْكِ تُحْمَلُوْنَ ۟ؕ

८०. आणि इतरही तुमच्यासाठी त्यांच्यात अनेक फायदे आहेत, यासाठी की आपल्या मनात लपलेल्या गरजांना, त्यांच्यावर स्वार होऊन तुम्ही पूर्ण करून घ्यावे आणि ज्या जनावरांवर आणि नौकांवर तुम्ही स्वार केले जाता. info
التفاسير:

external-link copy
81 : 40

وَیُرِیْكُمْ اٰیٰتِهٖ ۖۗ— فَاَیَّ اٰیٰتِ اللّٰهِ تُنْكِرُوْنَ ۟

८१. आणि अल्लाह तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवित आहे, तेव्हा तुम्ही अल्लाहच्या कोणकोणत्या निशाण्यांचा इन्कार करीत राहाल? info
التفاسير:

external-link copy
82 : 40

اَفَلَمْ یَسِیْرُوْا فِی الْاَرْضِ فَیَنْظُرُوْا كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ ؕ— كَانُوْۤا اَكْثَرَ مِنْهُمْ وَاَشَدَّ قُوَّةً وَّاٰثَارًا فِی الْاَرْضِ فَمَاۤ اَغْنٰی عَنْهُمْ مَّا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟

८२. किंवा त्यांनी धरतीवर हिंडून फिरून आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची परिणति नाही पाहिली, जे संख्येत यांच्यापेक्षा जास्त होते, शक्ती - सामर्थ्यात सक्त आणि धरतीत त्यांनी अनेक अवशेष मागे सोडले होते. (परंतु) त्यांच्या केलेल्या कार्यांनी त्यांना किंचितही लाभ पोहचविला नाही. info
التفاسير:

external-link copy
83 : 40

فَلَمَّا جَآءَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَیِّنٰتِ فَرِحُوْا بِمَا عِنْدَهُمْ مِّنَ الْعِلْمِ وَحَاقَ بِهِمْ مَّا كَانُوْا بِهٖ یَسْتَهْزِءُوْنَ ۟

८३. तर जेव्हा जेव्हा त्यांच्याजवळ त्यांचे रसूल (पैगंबर) स्पष्ट निशाण्या घेऊन आले, तेव्हा हे आपल्याजवळ असलेल्या ज्ञानावर घमेंड दाखवू लागले. शेवटी ज्या गोष्टीची थट्टा उडवित होते, तीच त्यांच्यावर उलटली. info
التفاسير:

external-link copy
84 : 40

فَلَمَّا رَاَوْا بَاْسَنَا قَالُوْۤا اٰمَنَّا بِاللّٰهِ وَحْدَهٗ وَكَفَرْنَا بِمَا كُنَّا بِهٖ مُشْرِكِیْنَ ۟

८४. मग आमची शिक्षा-यातना पाहताच म्हणू लागले की एकमेव अल्लाहवर आम्ही ईमान राखले आणि ज्यांना ज्यांना आम्ही त्याचा सहभागी ठरवित होतो, आम्ही त्या सर्वांचा इन्कार केला. info
التفاسير:

external-link copy
85 : 40

فَلَمْ یَكُ یَنْفَعُهُمْ اِیْمَانُهُمْ لَمَّا رَاَوْا بَاْسَنَا ؕ— سُنَّتَ اللّٰهِ الَّتِیْ قَدْ خَلَتْ فِیْ عِبَادِهٖ ۚ— وَخَسِرَ هُنَالِكَ الْكٰفِرُوْنَ ۟۠

८५. परंतु आमच्या शिक्षा - यातनेला पाहून घेतल्यानंतर त्यांच्या ईमान राखण्याने त्यांना लाभ दिला नाही, अल्लाहने आपला हाच नियम निर्धारित केलेला आहे, जो त्याच्या दासांमध्ये सतत चालत आला आहे आणि त्या ठिकाणी काफिर दुर्दशाग्रस्त (आणि दुर्बल) झाले. info
التفاسير: