(१) याद्वारे मक्केच्या अनेकेश्वरवाद्यांना खबरदार केले जात आहे की तुम्ही खोटे ठरविण्याचा व इन्कार करण्याचा जो मार्ग अंगीकारला आहे तो मोठा हानिकारक आहे. तुमच्या पूर्वीचे जनसमूह देखील याच मार्गावर चालून नाश पावले, वास्तविक ते जनसमूह धन-संपत्ती, शक्ती-सामर्थ्य आणि आयुष्य वगैरेत तुमच्यापेक्षा खूप जास्त होते. तुम्ही तर त्यांच्या दहाव्या हिश्शालाही पोहोचू शकत नाही तरीही ते अल्लाहच्या अज़ाबपासून वाचू शकले नाहीत. या संदर्भात ‘सूरह अहकाफ’च्या आयत क्र. २६ मध्ये वर्णन केले गेले आहे.