(१) मूळ शब्दा दाब्बः (विचित्र जनावर) तेच होय, जे कयामत जवळ आल्याच्या निशाण्यांपैकी आहे. हदीसमधील उल्लेखानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना फर्माविले, ‘‘कयामत त्या वेळेपर्यंत येणार नाही, जोपर्यंत तुम्ही दहा निशाण्या पाहून घेत नाही. त्यापैकी एका जनावराचे जमिनीतून बाहेर पडणे होय.’’ (सहीह मुस्लिम, किताबुल फेतन बाबु फी आयातिल-लती तकूनु कब्ल स्साअह) दुसऱ्या एका कथनानुसार, ‘‘सर्वांत प्रथम जी निशाणी जाहीर होईल, ती म्हणजे सूर्याचे पूर्व दिशेऐवजी पश्चिमेकडून उगवणे आणि दुपार होण्याआधी जनावराचे बाहेर निघणे’’ या दोघांपैकी जी निशाणी जाहीर होईल, दुसरी तिच्यानंतर लगेच जाहीर होईल. (सहीह मुस्लिम)