ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
28 : 23

فَاِذَا اسْتَوَیْتَ اَنْتَ وَمَنْ مَّعَكَ عَلَی الْفُلْكِ فَقُلِ الْحَمْدُ لِلّٰهِ الَّذِیْ نَجّٰىنَا مِنَ الْقَوْمِ الظّٰلِمِیْنَ ۟

२८. जेव्हा तुम्ही आणि तुमचे साथीदार नौकेत चांगल्या प्रकारे स्वार व्हाल तेव्हा म्हणा, समस्त स्तुती-प्रशंसा अल्लाहकरिता आहे ज्याने आम्हा लोकांना अत्याचारी जनसमूहापासून मुक्ती दिली. info
التفاسير:

external-link copy
29 : 23

وَقُلْ رَّبِّ اَنْزِلْنِیْ مُنْزَلًا مُّبٰرَكًا وَّاَنْتَ خَیْرُ الْمُنْزِلِیْنَ ۟

२९. आणि दुआ (प्रार्थना) करा, हे माझ्या पालनकर्त्या! मला सुरक्षितपणे उतरव आणि तूच उत्तम रीतीने उतरविणारा आहेस. info
التفاسير:

external-link copy
30 : 23

اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ وَّاِنْ كُنَّا لَمُبْتَلِیْنَ ۟

३०. निःसंशय, या (घटने) त मोठमोठी बोधचिन्हे आहेत आणि निश्चितच आम्ही कसोटी घेणारे आहोत. info
التفاسير:

external-link copy
31 : 23

ثُمَّ اَنْشَاْنَا مِنْ بَعْدِهِمْ قَرْنًا اٰخَرِیْنَ ۟ۚ

३१. मग त्यांच्यानंतर आम्ही दुसरे समुदाय देखील निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
32 : 23

فَاَرْسَلْنَا فِیْهِمْ رَسُوْلًا مِّنْهُمْ اَنِ اعْبُدُوا اللّٰهَ مَا لَكُمْ مِّنْ اِلٰهٍ غَیْرُهٗ ؕ— اَفَلَا تَتَّقُوْنَ ۟۠

३२. मग त्यांच्यात, त्यांच्यामधून पैगंबरही पाठविला (या आवाहनासह) की तुम्ही सर्व अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा दुसरा कोणी उपास्य नाही, तेव्हा तुम्ही भय का नाही बाळगत? info
التفاسير:

external-link copy
33 : 23

وَقَالَ الْمَلَاُ مِنْ قَوْمِهِ الَّذِیْنَ كَفَرُوْا وَكَذَّبُوْا بِلِقَآءِ الْاٰخِرَةِ وَاَتْرَفْنٰهُمْ فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا ۙ— مَا هٰذَاۤ اِلَّا بَشَرٌ مِّثْلُكُمْ ۙ— یَاْكُلُ مِمَّا تَاْكُلُوْنَ مِنْهُ وَیَشْرَبُ مِمَّا تَشْرَبُوْنَ ۟ۙ

३३. आणि जनसमूहाच्या सरदारांनी उत्तर दिले, जे कुप्र (इन्कार) करीत असत आणि आखिरतच्या भेटीस खोटे ठरवित असत आणि आम्ही त्यांना ऐहिक जीवनात सुखी ठेवले होते, म्हणू लागले, हा तर तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. जे तुम्ही खाता तेच तो खातो आणि जे पाणी तुम्ही पिता, तेच तो देखील पितो. info
التفاسير:

external-link copy
34 : 23

وَلَىِٕنْ اَطَعْتُمْ بَشَرًا مِّثْلَكُمْ ۙ— اِنَّكُمْ اِذًا لَّخٰسِرُوْنَ ۟ۙ

३४. आणि जर तुम्ही आपल्यासारख्याच माणसाचे आज्ञापालन मान्य करून घेतले तर निश्चितच तुम्ही मोठ्या तोट्यात आहात. info
التفاسير:

external-link copy
35 : 23

اَیَعِدُكُمْ اَنَّكُمْ اِذَا مِتُّمْ وَكُنْتُمْ تُرَابًا وَّعِظَامًا اَنَّكُمْ مُّخْرَجُوْنَ ۟

३५. काय हा तुम्हाला या गोष्टीचे वचन देतो की जेव्हा तुम्ही मेल्यावर केवळ माती आणि हाडे बनून राहाल, तर तुम्ही पुन्हा जिवंत केले जाल? info
التفاسير:

external-link copy
36 : 23

هَیْهَاتَ هَیْهَاتَ لِمَا تُوْعَدُوْنَ ۟

३६. नव्हे. दूर आणि अतिशय दूर आहे ती गोष्ट, जिचे वचन तुम्हाला दिले जात आहे. info
التفاسير:

external-link copy
37 : 23

اِنْ هِیَ اِلَّا حَیَاتُنَا الدُّنْیَا نَمُوْتُ وَنَحْیَا وَمَا نَحْنُ بِمَبْعُوْثِیْنَ ۟

३७. जीवन तर केवळ याच जगाचे जीवन आहे, ज्यात आम्ही मरत जगत असतो हे नव्हे की आम्हाला (मेल्यानंतर) पुन्हा उठविले जाईल. info
التفاسير:

external-link copy
38 : 23

اِنْ هُوَ اِلَّا رَجُلُ ١فْتَرٰی عَلَی اللّٰهِ كَذِبًا وَّمَا نَحْنُ لَهٗ بِمُؤْمِنِیْنَ ۟

३८. हा तर तो मनुष्य आहे, ज्याने अल्लाहवर असत्य रचले आहे. आम्ही तर याच्यावर ईमान राखणार नाही. info
التفاسير:

external-link copy
39 : 23

قَالَ رَبِّ انْصُرْنِیْ بِمَا كَذَّبُوْنِ ۟

३९. पैगंबराने दुआ (प्रार्थना) केली, हे पालनकर्त्या! यांनी मला खोटे ठरविले आहे, तेव्हा तू माझी मदत कर. info
التفاسير:

external-link copy
40 : 23

قَالَ عَمَّا قَلِیْلٍ لَّیُصْبِحُنَّ نٰدِمِیْنَ ۟ۚ

४०. उत्तर मिळाले की, लवकरच हे आपल्या कृतकर्मांवर पश्चात्ताप करतील. info
التفاسير:

external-link copy
41 : 23

فَاَخَذَتْهُمُ الصَّیْحَةُ بِالْحَقِّ فَجَعَلْنٰهُمْ غُثَآءً ۚ— فَبُعْدًا لِّلْقَوْمِ الظّٰلِمِیْنَ ۟

४१. शेवटी न्यायाच्या नियमानुसार एका भयंकर आवाजाने त्यांना येऊन धरले आणि आम्ही त्यांना केरकचरा करून टाकले. तेव्हा अशा अत्याचारी लोकांकरिता लांबचे अंतर असो. info
التفاسير:

external-link copy
42 : 23

ثُمَّ اَنْشَاْنَا مِنْ بَعْدِهِمْ قُرُوْنًا اٰخَرِیْنَ ۟ؕ

४२. मग त्यांच्यानंतर आम्ही दुसरेही जनसमूह निर्माण केले. info
التفاسير: