ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
49 : 2

وَاِذْ نَجَّیْنٰكُمْ مِّنْ اٰلِ فِرْعَوْنَ یَسُوْمُوْنَكُمْ سُوْٓءَ الْعَذَابِ یُذَبِّحُوْنَ اَبْنَآءَكُمْ وَیَسْتَحْیُوْنَ نِسَآءَكُمْ ؕ— وَفِیْ ذٰلِكُمْ بَلَآءٌ مِّنْ رَّبِّكُمْ عَظِیْمٌ ۟

४९. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला फिरऔनच्या लोकांपासून १ सुटका दिली, जे तुम्हाला खूप वाईट शिक्षा- यातना देत राहिले. तुमच्या पुत्रांची हत्या करीत राहिले आणि तुमच्या मुलींना जिवंत सोडत राहिले. यातून सुटका करण्यात तुमच्या पालनकर्त्याचा मोठा उपकार होता. info

(१) मूळ शब्द ‘आले फिरऔन’शी अभिप्रेत केवळ फिरऔन आणि त्याचे कुटुंबच नव्हे तर फिरऔनचे समस्त साथीदार आहेत.

التفاسير:

external-link copy
50 : 2

وَاِذْ فَرَقْنَا بِكُمُ الْبَحْرَ فَاَنْجَیْنٰكُمْ وَاَغْرَقْنَاۤ اٰلَ فِرْعَوْنَ وَاَنْتُمْ تَنْظُرُوْنَ ۟

५०. आणि जेव्हा आम्ही तुमच्यासाठी समुद्र फाडला आणि त्यातून तुम्हाला पार केले आणि फिरऔनच्या साथीदारांना तुमच्या डोळ्यांदेखत बुडविले. info
التفاسير:

external-link copy
51 : 2

وَاِذْ وٰعَدْنَا مُوْسٰۤی اَرْبَعِیْنَ لَیْلَةً ثُمَّ اتَّخَذْتُمُ الْعِجْلَ مِنْ بَعْدِهٖ وَاَنْتُمْ ظٰلِمُوْنَ ۟

५१. आणि आम्ही मूसाला चाळीस रात्रींचे वचन दिले, मग तुम्ही वासराला उपास्य (दैवत) बनवून घेतले आणि अत्याचारी बनले. info
التفاسير:

external-link copy
52 : 2

ثُمَّ عَفَوْنَا عَنْكُمْ مِّنْ بَعْدِ ذٰلِكَ لَعَلَّكُمْ تَشْكُرُوْنَ ۟

५२. परंतु आम्ही, असे असतानाही तुम्हाला माफ केले, यासाठी की तुम्ही उपकार मानाल. info
التفاسير:

external-link copy
53 : 2

وَاِذْ اٰتَیْنَا مُوْسَی الْكِتٰبَ وَالْفُرْقَانَ لَعَلَّكُمْ تَهْتَدُوْنَ ۟

५३. आणि आम्ही मूसाला, तुमच्या मार्गदर्शनासाठी ग्रंथ (तौरात) आणि ईश-चमत्कार (मोजिजा) प्रदान केला. info
التفاسير:

external-link copy
54 : 2

وَاِذْ قَالَ مُوْسٰی لِقَوْمِهٖ یٰقَوْمِ اِنَّكُمْ ظَلَمْتُمْ اَنْفُسَكُمْ بِاتِّخَاذِكُمُ الْعِجْلَ فَتُوْبُوْۤا اِلٰی بَارِىِٕكُمْ فَاقْتُلُوْۤا اَنْفُسَكُمْ ؕ— ذٰلِكُمْ خَیْرٌ لَّكُمْ عِنْدَ بَارِىِٕكُمْ ؕ— فَتَابَ عَلَیْكُمْ ؕ— اِنَّهٗ هُوَ التَّوَّابُ الرَّحِیْمُ ۟

५४. आणि जेव्हा मूसा आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, हे माझ्या जमातीच्या लोकांनो! तुम्ही वासराला (दैवत) बनवून स्वतःवर मोठा जुलूम केला आहे. आता तुम्ही आपल्या निर्माण करणाऱ्याकडे ध्यान द्या. स्वतःला (गुन्हेगाराला) आपल्या हातांनी ठार करा. अल्लाहच्या दृष्टीने यातच तुमच्यासाठी भलाई आहे. तेव्हा अल्लाहने तुमची तौबा (क्षमायाचना) कबूल केली. निःसंशय तोच तौबा कबूल करणारा आणि दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
55 : 2

وَاِذْ قُلْتُمْ یٰمُوْسٰی لَنْ نُّؤْمِنَ لَكَ حَتّٰی نَرَی اللّٰهَ جَهْرَةً فَاَخَذَتْكُمُ الصّٰعِقَةُ وَاَنْتُمْ تَنْظُرُوْنَ ۟

५५. आणि (तुम्ही त्या गोष्टीचेही स्मरण करा) जेव्हा तुम्ही मूसाला म्हणाले होते की जोपर्यंत आम्ही अल्लाहला (प्रत्यक्ष) समोर पाहून घेत नाही तोपर्यंत कधीही ईमान राखणार नाही (या अवज्ञेची शिक्षा म्हणून) तुमच्यावर, तुमच्या डोळ्यांदेखत वीज कोसळली. info
التفاسير:

external-link copy
56 : 2

ثُمَّ بَعَثْنٰكُمْ مِّنْ بَعْدِ مَوْتِكُمْ لَعَلَّكُمْ تَشْكُرُوْنَ ۟

५६. (परंतु) मग आम्ही तुम्हाला मृत्युनंतर जीवन यासाठी दिले की तुम्ही आभार मानावेत. info
التفاسير:

external-link copy
57 : 2

وَظَلَّلْنَا عَلَیْكُمُ الْغَمَامَ وَاَنْزَلْنَا عَلَیْكُمُ الْمَنَّ وَالسَّلْوٰی ؕ— كُلُوْا مِنْ طَیِّبٰتِ مَا رَزَقْنٰكُمْ ؕ— وَمَا ظَلَمُوْنَا وَلٰكِنْ كَانُوْۤا اَنْفُسَهُمْ یَظْلِمُوْنَ ۟

५७. आणि आम्ही तुमच्यावर ढगांची सावली केली, आणि तुमच्यावर मन्न आणि सलवा उतरविला (आणि फर्माविले) आम्ही प्रदान केलेल्या स्वच्छ शुद्ध वस्तू खा; आणि त्यांनी आमच्यावर अत्याचार नाही केला उलट ते स्वतःच आपल्यावर अत्याचार करीत होते. info
التفاسير: