ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
71 : 15

قَالَ هٰۤؤُلَآءِ بَنَاتِیْۤ اِنْ كُنْتُمْ فٰعِلِیْنَ ۟ؕ

७१. (लूत) म्हणाले, जर तुम्हाला काही करायचेच आहे तर या माझ्या मुली हजर आहेत१ info

(१) अर्थात तुम्ही त्यांच्याशी विवाह करून घ्या, अथवा आपल्या जनसमूहाच्या स्त्रियांना आपल्या मुली म्हटले, म्हणजे तुम्ही समाजातील अविवाहीत मुलींशी विवाह करून घ्या आणि आपली इच्छापूर्ती आपल्या पत्नींकडून करुन घ्या.

التفاسير:

external-link copy
72 : 15

لَعَمْرُكَ اِنَّهُمْ لَفِیْ سَكْرَتِهِمْ یَعْمَهُوْنَ ۟

७२. तुमच्या आयुष्याची शपथ! ते तर आपल्या नशेत धुंद फिरत होते. info
التفاسير:

external-link copy
73 : 15

فَاَخَذَتْهُمُ الصَّیْحَةُ مُشْرِقِیْنَ ۟ۙ

७३. मग सूर्योदय होता होता त्यांना एका भयंकर स्फोटाच्या आवाजाने येऊन धरले. info
التفاسير:

external-link copy
74 : 15

فَجَعَلْنَا عَالِیَهَا سَافِلَهَا وَاَمْطَرْنَا عَلَیْهِمْ حِجَارَةً مِّنْ سِجِّیْلٍ ۟ؕ

७४. शेवटी आम्ही त्या (शहरा) ला उलथेपालथे करून टाकले आणि त्या लोकांवर कंकर पाषाणांचा वर्षाव केला. info
التفاسير:

external-link copy
75 : 15

اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّلْمُتَوَسِّمِیْنَ ۟

७५. निःसंशय, प्रत्येक बोध प्राप्त करणाऱ्याकरिता यात अनेक निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
76 : 15

وَاِنَّهَا لَبِسَبِیْلٍ مُّقِیْمٍ ۟

७६. आणि ही वस्ती अशा मार्गावर आहे, ज्यावर सतत ये-जा होत असते. info
التفاسير:

external-link copy
77 : 15

اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیَةً لِّلْمُؤْمِنِیْنَ ۟ؕ

७७. आणि यात ईमान राखणाऱ्यांसाठी मोठी निशाणी आहे. info
التفاسير:

external-link copy
78 : 15

وَاِنْ كَانَ اَصْحٰبُ الْاَیْكَةِ لَظٰلِمِیْنَ ۟ۙ

७८. आणि अयका वस्तीचे राहणारे लोकही मोठे अत्याचारी होते. info
التفاسير:

external-link copy
79 : 15

فَانْتَقَمْنَا مِنْهُمْ ۘ— وَاِنَّهُمَا لَبِاِمَامٍ مُّبِیْنٍ ۟ؕ۠

७९. ज्यांच्याशी शेवटी आम्ही सूड घेतलाच. ही दोन्ही शहरे खुल्या मार्गावर आहेत. info
التفاسير:

external-link copy
80 : 15

وَلَقَدْ كَذَّبَ اَصْحٰبُ الْحِجْرِ الْمُرْسَلِیْنَ ۟ۙ

८०. आणि हिज्रवाल्यांनीही पैगंबरांना खोटे ठरविले. info
التفاسير:

external-link copy
81 : 15

وَاٰتَیْنٰهُمْ اٰیٰتِنَا فَكَانُوْا عَنْهَا مُعْرِضِیْنَ ۟ۙ

८१. आणि त्यांना आम्ही आपल्या निशाण्या प्रदान केल्या होत्या, परंतु तरी देखील ते त्या निशाण्यांपासून माना फिरवितच राहिले. info
التفاسير:

external-link copy
82 : 15

وَكَانُوْا یَنْحِتُوْنَ مِنَ الْجِبَالِ بُیُوْتًا اٰمِنِیْنَ ۟

८२. आणि हे लोक आपली घरे पर्वतांना कोरून बनवित असत, भय न राखता. info
التفاسير:

external-link copy
83 : 15

فَاَخَذَتْهُمُ الصَّیْحَةُ مُصْبِحِیْنَ ۟ۙ

८३. शेवटी त्यांनाही सकाळ होता होता भयंकर चित्काराने येऊन गाठले. info
التفاسير:

external-link copy
84 : 15

فَمَاۤ اَغْنٰی عَنْهُمْ مَّا كَانُوْا یَكْسِبُوْنَ ۟ؕ

८४. यास्तव त्यांच्या कोणत्याही युक्ती कौशल्याने आणि कामगिरीने त्यांना कसलाही लाभ पोहचविला नाही. info
التفاسير:

external-link copy
85 : 15

وَمَا خَلَقْنَا السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ وَمَا بَیْنَهُمَاۤ اِلَّا بِالْحَقِّ ؕ— وَاِنَّ السَّاعَةَ لَاٰتِیَةٌ فَاصْفَحِ الصَّفْحَ الْجَمِیْلَ ۟

८५. आणि आम्ही आकाशांना आणि धरतीला आणि त्यांच्या दरम्यानच्या समस्त वस्तूंना सत्यासहच बनविले आहे आणि कयामत अवश्य येणार आहे, तेव्हा तुम्ही भल्या रीतीने सहन करून घ्या. info
التفاسير:

external-link copy
86 : 15

اِنَّ رَبَّكَ هُوَ الْخَلّٰقُ الْعَلِیْمُ ۟

८६. निःसंशय, तुमचा पालनकर्ताच निर्माण करणारा आणि जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
87 : 15

وَلَقَدْ اٰتَیْنٰكَ سَبْعًا مِّنَ الْمَثَانِیْ وَالْقُرْاٰنَ الْعَظِیْمَ ۟

८७. निःसंशय आम्ही तुम्हाला सात आयती प्रदान केल्या आहेत ज्यांची पुनरावृत्ती केली जाते, आणि महान कुरआन देखील प्रदान केला आहे. info
التفاسير:

external-link copy
88 : 15

لَا تَمُدَّنَّ عَیْنَیْكَ اِلٰی مَا مَتَّعْنَا بِهٖۤ اَزْوَاجًا مِّنْهُمْ وَلَا تَحْزَنْ عَلَیْهِمْ وَاخْفِضْ جَنَاحَكَ لِلْمُؤْمِنِیْنَ ۟

८८. तुम्ही कधीही आपली नजर त्या गोष्टीवर टाकू नका, जिला आम्ही, त्यांच्यापैकी अनेक प्रकारच्या लोकांना प्रदान केले आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही दुःखही करू नका आणि ईमान राखणाऱ्यांसाठी आपल्या बाजू झुकवा (त्यांना मोठ्या स्नेहाची वागणूक द्या). info
التفاسير:

external-link copy
89 : 15

وَقُلْ اِنِّیْۤ اَنَا النَّذِیْرُ الْمُبِیْنُ ۟ۚ

८९. आणि सांगा की मी उघडपणे भय दाखविणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
90 : 15

كَمَاۤ اَنْزَلْنَا عَلَی الْمُقْتَسِمِیْنَ ۟ۙ

९०. ज्याप्रमाणे आम्ही त्या विभाजन करणाऱ्यांवर उतरविला. info
التفاسير: