ការបកប្រែអត្ថន័យគួរអាន - ការបកប្រែជាភាសាម៉ារ៉ាធិ - ម៉ូហាំម៉ាត់ ស្ហាហ្វៀក អាន់សរី

លេខ​ទំព័រ:close

external-link copy
6 : 14

وَاِذْ قَالَ مُوْسٰی لِقَوْمِهِ اذْكُرُوْا نِعْمَةَ اللّٰهِ عَلَیْكُمْ اِذْ اَنْجٰىكُمْ مِّنْ اٰلِ فِرْعَوْنَ یَسُوْمُوْنَكُمْ سُوْٓءَ الْعَذَابِ وَیُذَبِّحُوْنَ اَبْنَآءَكُمْ وَیَسْتَحْیُوْنَ نِسَآءَكُمْ ؕ— وَفِیْ ذٰلِكُمْ بَلَآءٌ مِّنْ رَّبِّكُمْ عَظِیْمٌ ۟۠

६. आणि जेव्हा मूसा आपल्या जनसमूहाच्या लोकांना म्हणाले, की अल्लाहच्या त्या कृपा देणग्यांची आठवण करा ज्या त्याने तुम्हाला दिल्या आहेत, जेव्हा त्याने तुम्हाला फिरऔनच्या साथीदारांपासून सोडविले जे तुम्हाला फार दुःख पोहचवित होते. तुमच्या पुत्रांची हत्या करीत आणि तुमच्या मुलींना जिवंत सोडून देत. यात तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमची फार मोठी कसोटी होती. info
التفاسير:

external-link copy
7 : 14

وَاِذْ تَاَذَّنَ رَبُّكُمْ لَىِٕنْ شَكَرْتُمْ لَاَزِیْدَنَّكُمْ وَلَىِٕنْ كَفَرْتُمْ اِنَّ عَذَابِیْ لَشَدِیْدٌ ۟

७. आणि जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने सचेत केले की जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तर निःसंशय मी तुम्हाला आणखी जास्त प्रदान करेन आणि जर तुम्ही कृतघ्न व्हाल तर निश्चितच माझी शिक्षा-यातना मोठी सक्त आहे. info
التفاسير:

external-link copy
8 : 14

وَقَالَ مُوْسٰۤی اِنْ تَكْفُرُوْۤا اَنْتُمْ وَمَنْ فِی الْاَرْضِ جَمِیْعًا ۙ— فَاِنَّ اللّٰهَ لَغَنِیٌّ حَمِیْدٌ ۟

८. आणि मूसा म्हणाले, जर तुम्ही सर्व आणि धरतीवर राहणारे समस्त लोक अल्लाहशी कृतघ्न होतील, तरीही अल्लाह निःस्वार्थ आणि प्रशंसनीय आहे. info
التفاسير:

external-link copy
9 : 14

اَلَمْ یَاْتِكُمْ نَبَؤُا الَّذِیْنَ مِنْ قَبْلِكُمْ قَوْمِ نُوْحٍ وَّعَادٍ وَّثَمُوْدَ ۛؕ۬— وَالَّذِیْنَ مِنْ بَعْدِهِمْ ۛؕ— لَا یَعْلَمُهُمْ اِلَّا اللّٰهُ ؕ— جَآءَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَیِّنٰتِ فَرَدُّوْۤا اَیْدِیَهُمْ فِیْۤ اَفْوَاهِهِمْ وَقَالُوْۤا اِنَّا كَفَرْنَا بِمَاۤ اُرْسِلْتُمْ بِهٖ وَاِنَّا لَفِیْ شَكٍّ مِّمَّا تَدْعُوْنَنَاۤ اِلَیْهِ مُرِیْبٍ ۟

९. काय तुमच्याजवळ, तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा वृत्तांत आला नाही? अर्थात नूहच्या जनसमूहाचा, आणि आद व समूदचा आणि त्यांच्यानंतरच्या लोकांचा, ज्यांना अल्लाहशिवाय दुसरा कोणीही जाणत नाही. त्यांच्याजवळ त्यांचे पैगंबर चमत्कार घेऊन आले, परंतु त्यांनी आपले हात आपल्या तोंडावर ठेवून घेतले आणि स्पष्टपणे सांगून टाकले की जे काही देऊन तुम्हाला पाठविले गेले आहे आम्ही ते मानत नाही आणि ज्या गोष्टीकडे तुम्ही आम्हाला बोलवित आहात, आम्हाला तर त्यात फार शंका वाटते (आमचा त्यावर विश्वास नाही). info
التفاسير:

external-link copy
10 : 14

قَالَتْ رُسُلُهُمْ اَفِی اللّٰهِ شَكٌّ فَاطِرِ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— یَدْعُوْكُمْ لِیَغْفِرَ لَكُمْ مِّنْ ذُنُوْبِكُمْ وَیُؤَخِّرَكُمْ اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ؕ— قَالُوْۤا اِنْ اَنْتُمْ اِلَّا بَشَرٌ مِّثْلُنَا ؕ— تُرِیْدُوْنَ اَنْ تَصُدُّوْنَا عَمَّا كَانَ یَعْبُدُ اٰبَآؤُنَا فَاْتُوْنَا بِسُلْطٰنٍ مُّبِیْنٍ ۟

१०. त्यांचे पैगंबर त्यांना म्हणाले की काय अल्लाह (जो सत्य आहे) त्याच्याविषयी शंका आहे, जो आकाशांचा व धरतीचा निर्माण करणारा आहे तो तर तुम्हाला अशासाठी बोलावित आहे की त्याने तुमचे सर्व अपराध माफ करावेत आणि एक ठरलेल्या अवधीपर्यंत तुम्हाला संधी प्रदान करावी ते (लोक) म्हणाले, तुम्ही तर आमच्यासारखेच मानव आहात. तुम्ही हे इच्छिता की आम्हाला त्या दैवतांच्या पूजा-अर्चनेपासून रोखावे, ज्यांची भक्ती-आराधना आमचे वाडवडील करत राहिले, बरे तर आमच्यासमोर एखादे स्पष्ट प्रमाण तरी सादर करा. info
التفاسير: