(१) अर्थात पतीच्या मनात, घटस्फोटित स्त्रीविषयी ओढनिर्माण करील आणि तो तिला पुन्हा ठेवण्यास तयार होईल, जसे की पहिल्या व दुसऱ्या तलाकनंतर पतीला इद्दत (अवधी) च्या आत पुन्हा ठेवण्याचा अधिकार आहे. या सर्व काही भाष्यकारांच्या मते अल्लाहने या आयतीत फक्त एक तलाक देण्याची शिकवण दिली आहे आणि एकाच वेळी तीन तलाक देण्यापासून रोखले आहे. कारण जर त्याने एकाच वेळी तीन तलाक देऊन टाकल्यास (आणि शरीअत नियमाने ते उचितही ठरल्यास) मग हे म्हणणे व्यर्थ आहे की कदाचित अल्लाह एखादी नवीन स्थिती निर्माण करील. (फतहुल कदीर)
(१) अर्थात ज्या स्त्रीशी पतीने सहवास केला असेल आणि तिला तलाक दिला तर तिची इद्दत तीन मासिक पाळीइतकी आहे. जर तिला परत ठेवण्याचा इरादा असेल तर इद्दत पूर्ण होण्याआधीच रुजू करून घ्या, अन्यथा नियमानुसार आपल्यापासून वेगळे करा.
(१) ‘ख़लक़ मिनल् अर्ज़ी मिस्लहुन्न’ अर्थात सात आकाशांप्रमाणे अल्लाहने सात जमिनीही निर्माण केल्या आहेत. काहींनी यास अभिप्रेत सात महाद्वीप घेतले आहे, परंतु हे उचित नाही. ज्याप्रमाणे एकावर एक सात आकाश आहेत, तद्वतच सात जमिनीही आहेत. ज्यांच्या दरम्यान फरक व अंतर आहे आणि प्रत्येक जमिनीवर अल्लाहची सृष्टीनिर्मिती आबाद आहे. (अल् कुर्तबी)