Terjemahan makna Alquran Alkarim - Terjemahan Berbahasa Marathi - Muhammad Syafi' Ansari

Al-Ḥadīd

external-link copy
1 : 57

سَبَّحَ لِلّٰهِ مَا فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ۚ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْحَكِیْمُ ۟

१. आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे (ते सर्व) अल्लाहचे महिमागान करीत आहेत आणि तो मोठा वर्चस्वशाली, हिकमतशाली आहे. info
التفاسير:

external-link copy
2 : 57

لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ۚ— یُحْیٖ وَیُمِیْتُ ۚ— وَهُوَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

२. आकाशांचे आणि धरतीचे (समस्त) राज्य त्याचेच आहे, तोच जीवन देतो आणि मृत्युही आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य राखतो. info
التفاسير:

external-link copy
3 : 57

هُوَ الْاَوَّلُ وَالْاٰخِرُ وَالظَّاهِرُ وَالْبَاطِنُ ۚ— وَهُوَ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمٌ ۟

३. तोच आद्य आणि तोच अंतिम आहे, तोच उघड आणि तोच लपलेला आहे आणि तो प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणणारा आहे.१ info

(१) तोच प्रथम म्हणजे त्याच्या आधी काहीच नव्हते. तोच अंतिम म्हणजे त्याच्या नंतर काहीच नसेल, तोच उघड म्हणजे तो सर्वांवर वर्चस्वशाली आहे. त्याच्यावर कोणी वर्चस्व राखू शकत नाही, तोच गुप्त म्हणजे लपलेल्या सर्व गोष्टी तो चांगल्या प्रकारे जाणतो, ज्या लोकांच्या नजरेपासून आणि त्यांच्या बुद्धीपासून लपलेल्या आहेत. (फतहुल कदीर)

التفاسير: